Lavang Sheti मित्रांनो तब्बल एक महिना उशिराने राज्यभर पावसाचं आगमन झालंय. पाऊस लांबल्याने सगळेजण खूपच त्रस्त झाले होते. बळीराजासमोर तर मोठं संकट उभं राहिलं होतं.
पुरेसा पाऊस नसल्यामुळे बळीराजाला शेतात पेरणीही करता येत नव्हती आणि ज्यांनी चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अवकाळी पावसावर पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकटही उभं राहिलं होतं.
Lavang Sheti
बळीराजावर नेहमी अस्मानी आणि सुल्तानी संकटांचा वर्षाव होतच असतो. कधी अवकाळी पाऊस, पिकांवरील रोग यामुळे पीक नीट येत नाही आणि पीक हातात आलं तरी त्याला योग्य भाव मिळेलच याची हमी नसते. पण तरीही या सर्व संकटांचा सामना करत बळीराजा चांगलं पीक घेत आपल्या सगळ्यांचं पोषण करत असतो.
काही प्रगत शेतकरी तर आता पारंपरिक पिकांपेक्षा वेगळी पिकं घेत शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. अशीच एक नवीन कल्पना म्हणजे (Lavang Sheti) लवंग शेती. अनेक शेतकरी आजकाल लवंग शेती करत आहेत.
मार्केटमध्ये लवंगला जबरदस्त मागणी आहे त्यामुळे लवंग शेती शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर ठरतेय आणि त्यांना उत्तम नफासुद्धा मिळवून देतेय.
लवंग शेती कशी करायची ?
प्रत्येकाच्या घरात लवंगचा वापर होतच असतो त्यामुळे बाजारात लवंगला भरपूर मागणी आहे. लवंग हे पीक उष्ण हवामानात घेण्यात येतं. 30 ते 35 अंश तापमानात लवंगाचं पीक चांगलं येतं.
लवंगाचं रोप (Lavang Sheti) लावण्यासाठी त्याच्या बिया आदल्या दिवशी पाण्यात भिजवाव्या लागतात आणि मग बियांच्या वरची साल काढून मग बिया पेरल्या जातात.
लवंग पिकासाठी नेहमी सेंद्रिय खताचाच वापर केलेला उत्तम असतो. लवंगाच्या एका झाडापासून 2 ते 3 किलोपर्यंत लवंग निघतात. लवंग गुच्छांमध्ये वाढतात आणि त्याचा रंग लाल गुलाबी असतो.
शेतात 50 लवंगाची रोपे लावली तर त्यापासून दीड दोन लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. आपल्या कोकणात लवंगाची शेती जास्त प्रमाणात केली जाते. लवंगाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्नही मिळतंय.
लवंगाची मागणी प्रत्येक घरात आहे. जेवण बनवताना लवंग वापरला जातो. लवंगपासून अनेक आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य उत्पादने बनवली जातात. आजारपणातसुद्धा लवंग कामाला येते. सर्दी, डोकेदुखीत लवंग उपयोगी पडते. टूथपेस्टमधेही लवंग वापरली जाते.
सगळीकडे लवंगला (Lavang Sheti) भरपूर मागणी असल्यामुळे भावही चांगला मिळतो आणि शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी अशी नवनवीन पिकं घेतली तर नक्कीच त्यांना खूप फायदा होऊ शकतो.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !