Lakhat Ek Aamcha Dada Serial Cast मराठी वाहिनीवर नुकतीच ‘लाखात एक आमचा दादा’ या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली. ही मालिका चार बहिणी आणि त्यांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या दादाची आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्यावर आधारित या नवीन मालिकेची कथा असणार आहे. आधी या मालिकेचं फक्त पोस्टर समोर आलं होतं त्यात चार बहिणींच्या खांद्यावर हात ठेवलेला दादा असं चित्र होतं.
आता या मालिकेचा जबरदस्त प्रोमोसुद्धा समोर आला आहे. प्रोमोमध्ये खंडोबाचं देऊळ दाखवलं आहे. त्यानंतर घंटानाद सुरू होतो. खंडोबा देवाचं दर्शन होतं. मग मालिकेचा नायक दादाची झलक पाहायला मिळते. त्यानंतर तो देवासमोर लोटांगण घालून नमस्कार करतो. भक्तांची भरपूर गर्दी असते. मोठमोठ्याने तुताऱ्या वाजवल्या जातात आणि भक्तजन भंडारा उडवत खंडोबाच्या नावाचा जयघोष करतात. या मोहक वातावरणात हाताने भंडारा उडवत खंडोबाच्या नावाचा जयघोष करत आपल्याला दादाची झलक पाहायला मिळते. त्याची एन्ट्री खूपच जबरदस्त आहे.
Lakhat Ek Aamcha Dada Serial Cast
आज आपण ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत कोणते कलाकार (Lakhat Ek Aamcha Dada Serial Cast) दिसणार आहेत हे जाणून घेऊया.
1. नितीश चव्हाण – नितीश या मालिकेत दादाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो मालिकेचा नायक आहे. याआधी तो ‘लागिरं झालं जी‘ या मालिकेतील आज्या या भूमिकेमुळे खूप लोकप्रिय झाला होता.
आता दादाच्या बहिणींच्या भूमिकेत कोण असेल ही माहिती लवकरच समोर येईल.
या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाणच्या एन्ट्रीने सगळेच खूप खुश झाले आहेत. तो ‘लागिरं झालं जी’ या मालिकेनंतर अनेक वर्षांनी या मालिकेत दिसणार आहे.
येड लागलं प्रेमाचं मालिकेतील कलाकार
या मालिकेची निर्मिती वज्र प्रोडक्शन हाऊस अंतर्गत निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे करणार आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या मालिकेची घोषणा करण्यासाठी फोटो पोस्ट केला होता आणि नितीशसोबत पाठमोरा फोटोसुद्धा टाकला होता.
या मालिकेत दादा कोण असणार त्याची ओळख तर करून देण्यात आलीय पण त्याच्या चार बहिणींची ओळख देण्यात आलेली नाही. तेसुद्धा लवकरच समोर येईल. याशिवाय मालिका कधीपासून सुरू होणार हेसुद्धा लवकरच कळेल.
पण अभिनेता नितीश चव्हाण हा अनेक वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन करतोय त्यामुळे त्याचे फॅन्स खूप आनंदात आहेत आणि त्याच्या या नवीन मालिकेलासुद्धा ‘लागिरं झालं जी’ प्रमाणेच प्रेक्षकांचं प्रेम मिळतं का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मनोरंजनविश्वातील अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.