लग्नाची बेडी मालिकेतील हा अभिनेता या नवीन मालिकेत दिसणार

लग्नाची बेडी

लग्नाची बेडी ही सर्वांचीच आवडती मालिका आहे. राघव आणि सिंधुची ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच आवडली. या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांना आवडलेत. या मालिकेत रायाचं पात्र साकारणारा अभिनेता सिद्धेश प्रभाकर हा लवकरच आपल्याला एका नवीन मालिकेत एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. तो आपल्याला ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवर ‘पुन्हा कर्तव्य आहे‘ ही नवीन मालिका सुरू झालीय. या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर मुख्य भूमिकेत आहेत. ही आकाश आणि वसुंधराची गोष्ट आहे. आकाशच्या पत्नीचा मृत्यू झालाय आणि वसुंधराचा घटस्फोट झालाय. हे दोघेही आपल्या मुलांसाठी दुसरं लग्न करत आहेत. पण आता या मालिकेची कथा खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन ठेपली आहे.

लग्नाची बेडी  

लवकरच मालिकेत आता एक मोठं वादळ येणार आहे. ते म्हणजे वसुंधराचा पहिला नवरा शार्दूल मालिकेत एन्ट्री करणार आहे. शार्दूलच्या एन्ट्रीनंतर मालिकेत काय ट्विस्ट येतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

आता शार्दूलच्या भूमिकेत कोण दिसणार हा सर्वच प्रेक्षकांना प्रश्न पडला होता. याही प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. अभिनेता सिद्धेश प्रभाकर हा शार्दूलच्या भूमिकेत दिसणार आहे. शार्दूल आल्यानंतर आकाश आणि वसुंधराच्या नात्यावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बनी हा त्याचाच मुलगा आहे हे शार्दूलला कळेल का ? हे कळल्यावर तो काय पाऊल उचलणार ? हेसुद्धा प्रेक्षकांना लवकरच कळेल. या सर्व ट्विस्टमुळे मालिकेचे पुढील काही भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत.

पुन्हा कर्तव्य आहे मालिकेत नव्या अभिनेत्याची एंट्री 

सध्या आकाश आणि वसुंधराच्या लग्नाचे भाग मालिकेत सुरू आहेत मग आता शार्दूल आल्यानंतर पुढे काय होईल हाच मोठा प्रश्न आहे.

पण अभिनेता सिद्धेश प्रभाकर या मालिकेत दिसणार त्यामुळे त्याचे फॅन्स खूपच आनंदात आहेत. लग्नाची बेडी या मालिकेनंतर त्याचे फॅन्स त्याला खूप मिस करत होते आणि त्याला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्स अतिशय उत्सुक आहेत.

नवरी मिळे हिटलरला मालिकेतील या अभिनेत्याने दिली गुडन्यूज

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !  

Scroll to Top