कुशल बद्रिके ‘चला हवा येऊ द्या’ या शोनंतर सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसला होता. मराठीप्रमाणेच हिंदीमधेही त्याने आपल्या जबरदस्त विनोदबुद्धी आणि उत्तम कॉमेडी टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना आपलं फॅन बनवलं.
कुशल बद्रिके च्या जोडीला या शोमध्ये अभिनेत्री हेमांगी कवी दिसतेय. कुशल आणि हेमांगीची जोडी प्रेक्षकांची खूपच फेव्हरेट बनली आहे. या शोमध्ये अनेक दुसरे हास्य कलाकारदेखील चाहत्यांचे आवडते आहेत. हुमा कुरेशी या शोमध्ये परीक्षक आहे.
कुशल बद्रिके
पण आता या शोबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ‘मॅडनेस मचाएंगे’ हा शो लवकरच बंद होणार आहे असं बोललं जातंय. हा शो बंद होण्यामागचं कारण कमी टीआरपी आहे. कमी टीआरपीमुळे हा शो वेळेआधीच बंद केला जातोय.
सोनी टीव्हीने कपिल शर्मा शोच्या विरोधात हा कार्यक्रम सुरू केला होता. या शोचे एपिसोडसुद्धा ठराविकच होते. चॅनल हा शो संपल्यानंतर आणखी मोठा शो घेऊन परतणार होतं पण कमी टीआरपीमुळे हा शो वेळेआधीच बंद होत आहे.
गौरव मोरे दिसणार हिंदी कॉमेडी शो मध्ये
हा प्रसिद्ध कॉमेडी शो लवकरचं बंद होणार
चॅनलकडून या शोचं भरपूर प्रमोशनही करण्यात येत होतं. सोशल मीडियाचाही उपयोग करून घेण्यात येत होता पण कमी टीआरपी हे शो बंद करण्यामागे एकमेव कारण आहे.
कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि गौरव मोरे हे तीन मराठीतील टॉपचे हास्यकलाकार या शोमध्ये दिसत आहेत. या तिघांचेही भरपूर चाहते आहेत. या तीनही मराठी कलाकारांचा वेगळा चाहतावर्ग या शोला मिळत होता. कुशल बद्रिके, हेमांगी आणि गौरवचे फॅन्स मराठी शोमध्ये त्यांना मिस करायचे त्यामुळे हा हिंदी शो बघायचे. पण आता हा शो बंद होणार असल्यामुळे त्यांचे फॅन्स दुःखी झालेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !