Kush Shah Left TMKOC News तारक मेहता का उल्टा चश्मा हा कार्यक्रम नेहमीचं कोणत्यातरी कारणाने चर्चेत असतो. आताही या कार्यक्रमाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मागील सोळा वर्षांपासून गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शहाने मालिका सोडल्याचं वृत्त आहे.
सध्या मालिकेमध्ये दाखवण्यात येतंय की, टप्पू सेना ही पुण्यात होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी गेलीये आणि जेव्हा टप्पू, सोनू आणि गोगी पुण्याला जात होते तेव्हा त्यांच्याबरोबर पिंकू आणि गोली नव्हता आणि आता एका फेसबुकवरील फॅन पेजने गोली म्हणजे कुश शहाने मालिका सोडली आहे, अशी बातमी दिलीये.
Kush Shah Left TMKOC News
झालं असं की, एक भारतीय व्यक्ती जो तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचाचा फॅन आहे. त्याला गोली म्हणजेचं कुश शहा अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी येथे फिरताना दिसला. जेव्हा त्याने त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा कुश शहाने त्याला सांगितलं की, मी माझं अमेरिकेतील शिक्षण घेण्यासाठी येथे आलोय. त्यासाठी मी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडलीये.
ही बातमी सोशल मीडियावर समजल्यानंतर सगळीकडे मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण कुश हा मालिकेच्या पहिल्या भागापासूनचं मालिकेत होता. डॉक्टर हाथी आणि कोमल हाथी यांचा मुलगा गोलीची भूमिका त्याने साकारली होती. त्याची अशी मालिका सोडून जाण्याने चाहत्यांना जबर धक्का बसलाय.
जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि कुश रहा या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपचं आवडायची. टप्पू सेनेमधील तो एक महत्त्वाचा मेंबर होता आणि जर त्याने खरंच मालिका सोडली असेल, तर पेक्षक त्याला खूप मिस करतील यात शंका नाही.
मुक्ता सगळ्यांसमोर सागरच्या गालावर किस करणार
मागील काही वर्षात या मालिकेतील अनेक कलाकारांनी कार्यक्रमाला सोडचिठ्ठी दिली आहे. मग दिशा वकानी, भव्य गांधी, राज अनाडकट, शैलेश लोढा, निधी भानुशाली यांसारखे दिग्गज कलाकार आधीचं तारक मेहता का उल्टा चश्मा सोडून गेलेत.
आणि आता कुश शहा सुद्धा मालिका सोडणार म्हटल्यावर प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे, एवढं मात्र नक्की. जर ही बातमी खरी असेल, तर तुम्ही कुश शहाला गोलीच्या भूमिकेत मिस करणार का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !