Kothimbir Vadi Recipe In Marathi | कोथिंबीर वडी रेसिपी मराठी 2024

Kothimbir Vadi Recipe In Marathi

Kothimbir Vadi Recipe In Marathi

Kothimbir Vadi Recipe In Marathi कोथिंबीर वडी हा आपल्या महाराष्ट्रातील अतिशय रुचकर आणि लोकप्रिय पदार्थ आहे. खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी ही सर्वांनाच आवडते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही स्वादिष्ट कोथिंबीर वडी खाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.

जसं बाकीच्या लोकांना पकोडे खायला खूप आवडतात तसंच आपल्याकडे महाराष्ट्रात कोथिंबीर वडी खूप आवडीने खाल्ली जाते. लग्न समारंभात किंवा मग पावसाळ्यात कोथिंबीर वडी आवर्जून बनवली जाते. संध्याकाळच्या चहाबरोबरसुद्धा स्नॅक्स म्हणून आपण कोथिंबीर वडी खाऊ शकतो. जसे चहाबरोबर भजे खातात तसंच चहा आणि Kothimbir Vadi Recipe In Marathi जोडी बनू शकते.

सध्या अनेक मिठाईच्या दुकानांमध्ये आणि हॉटेलमध्ये कोथिंबीर वडी बनवली जाते. अनेकजण तिथे आवर्जून कोथिंबीर वडीचा आस्वाद घेताना दिसतात. पण आपण ही कोथिंबीर वडी घरीच बनवू शकलो तर उत्तमच आहे.

कोथिंबीर वडी घरच्याघरी बनवण्यासाठी एकदम सोपी Kothimbir Vadi Recipe In Marathi आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवल्यानंतर खूपच खमंग आणि खुसखुशीत बनेल.

कोथिंबीर वडी बनवण्याचं साहित्य :

  • 1 कप बेसनपीठ
  • पाव कप तांदळाचं पीठ
  • चवीनुसार मीठ
  • पाव कप आंबट दही
  • अडीच कप पाणी
  • पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 5-6 लसणाच्या पाकळ्या
  • 2 मोठे चमचे तेल
  • 1 चमचा जिरे
  • 2 चमचे तीळ
  • थोडंसं किसलेलं आलं
  • पाव चमचा हिंग
  • अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड
  • 1 चमचा धनेपूड
  • अर्धा चमचा हळद
  • 1 मोठा चमचा साखर
  • 2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 चमचा मीठ
  • 1 चमचा रेड चिली फ्लेक्स
  • कुटलेले धने
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • 4-5 मोठे चमचे तेल

Kaju Katli Marathi Recipe | काजू कतली रेसिपी मराठी 2024

कोथिंबीर वडी बनवण्याची कृती :

  1. Kothimbir Vadi Recipe In Marathi बनवण्यासाठी एका भांड्यात 1 कप बेसनपीठ घ्यायचं त्यात पाव कप तांदळाचं पीठ घालायचं. तांदूळ हे घरीच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून हे रवीने मिक्स करून घ्यायचं.
  2. त्यानंतर यामध्ये पाव कप आंबट दही घ्यायचं. पण जर दही आंबट नसेल तर अर्धा कप दही टाकायचं. हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं.
  3. आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. जेवढं आपण बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलंय म्हणजे आपण सव्वा कप घेतलंय तर त्यात दुप्पट म्हणजेच अडीच कप पाणी टाकायचंय.
  4. सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून रवीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. मग त्यानंतर पूर्ण 2 कप पाणी यामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. उरलेलं अर्धा कप पाणी आपण नंतर वापरणार आहोत.
  5. पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये करून घ्यायचा. आता आपल्याला 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्यांचा मिक्सरमध्ये ठेचा करून घ्यायचाय. मिरच्या जर कमी तिखट असतील तर तुम्ही जास्तदेखील घेऊ शकता.
  6. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यात 1 चमचा जिरे, मिरची लसणाचा ठेचा, 2 चमचे तीळ, शेंगदाण्याचा कूट, थोडंसं किसलेलं आलं टाकून कमी फ्लेमवर परतून घ्यायचं.
  7. मग त्यात पाव चमचा हिंग, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद टाकून कमी फ्लेमवर परतून घ्यायचं. यात 1 मोठा चमचा साखर टाकायची म्हणजे आंबट गोड तिखट अशी छान चव येते.
    शेंगदाण्याचा कूट टाकल्याने कोथिंबीर वडी कुरकुरीत आणि जास्त चविष्ट बनते.
  8. मिश्रण थोडा वेळ छान परतून झाल्यावर त्यात 2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून अगदी बारीक चिरलेली आहे. ही कोथिंबीर आपल्याला थोडावेळ कमी फ्लेमवर परतून घ्यायचीय.
  9. 3 ते 4 मिनिटे कोथिंबीर परतून घेतल्यावर यामध्ये आपण भिजवलेलं बेसन आणि तांदळाचं पीठ टाकायचं आणि आपलं राहिलेलं अर्धा कप पाणी यामध्ये मिक्स करून टाकून द्यायचं. आता हे मिश्रण कमी फ्लेमवर सलग ढवळत शिजवून घ्यायचंय. यासाठी थोडा वेळ लागतो कारण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय.
  10. आपलं मिश्रण दाटसर व्हायला लागलंय. यात 1 चमचा मीठ, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, कुटलेले धने, अर्धा चमचा गरम मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं आणि आणखी शिजवून घ्यायचं. हा गोळा घट्टसर करून घ्यायचा. वडी कुरकुरीत हवी असेल तर मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करायचं.
  11. आपला घट्टसर गोळा तयार झालाय. मिश्रण चांगलं शिजलंय तरीही 4-5 मिनिटे आणखी शिजवून घ्यायचं. आता एका प्लेटमध्ये तेल लावून घ्यायचं आणि हे मिश्रण टाकून थापून घ्यायचं आहे.
  12. आपल्याला चौकोनी आकाराच्या वड्या करायच्या आहेत त्यानुसार या मिश्रणाला आकार देऊया. मिश्रण चांगलं घट्ट करायचं चांगलं शिजवायचं ओलसर राहू द्यायचं नाही नाहीतर वड्या खाताना आपल्याला पिठलं खाल्ल्यासारखं वाटेल.
  13. मिश्रण प्लेटमध्ये थापून झाल्यावर 1 तास थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे चांगलं सेट होईल. थंड झाल्यावर आपल्याला चाकूने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आपल्या वड्यांचे काप करून झाले आहेत. आता ते आपण तेलात तळून घेऊया. आपण डीप फ्राय किंवा मग शॅलो फ्राय करू शकतो.
  14. आपल्या वड्या तेलात तळून घ्यायच्या आहेत. कमी वेळात आणि कुरकुरीत टेस्टी वड्या हव्या असतील तर त्या डीप फ्राय करून घ्यायच्या. चवही चांगली लागते आणि वेळसुद्धा कमी लागतो.

आपल्या खमंग खुसखुशीत Kothimbir Vadi Recipe In Marathi तयार आहेत. या तुम्ही टोमॅटो सॉस, पुदिन्याची चटणीसोबत खाऊ शकता. बरेचजण पोळीसोबतही खातात. काहीजण भातामध्ये कुस्करूनदेखील कोथिंबिरीच्या वड्या खातात.

तुम्ही आपल्या कुटुंबियांना या कुरकुरीत कोथिंबीर वड्या (Kothimbir Vadi Recipe In Marathi) सर्व्ह करू शकता. लहान मुलांना नेहमी काहीतरी चटपटीत खाण्यासाठी हवं असतं त्यामुळे तुम्ही त्यांना नाश्त्यासाठी देऊ शकता आणि त्यांना डब्यामधेही या वड्या बनवून देऊ शकता.

Important Tips For Kothimbir Vadi Recipe In Marathi
  1. Kothimbir Vadi Recipe In Marathi बनवताना त्यात दही घालायचं पण दही आंबट नसेल तर जास्त दही घ्यायचं.
  2. कोथिंबीर वडी बनवताना आपण जेवढं बेसन आणि तांदळाचं पीठ घेतलं त्याच्या दुपटीने पाणी टाकायचं. हे पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आहे त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही.
  3. नेहमीच्या कोथिंबीर वडीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकत नाहीत पण शेंगदाण्याचा कूट घातला तर आपल्या वड्या छान कुरकुरीत होतात आणि चव आणखीन वाढते.
  4. जर तुम्हाला कोथिंबीर वडी कुरकुरीत हवी असेल तर मिश्रण चांगलं शिजवायचं. गोळा घट्टसर झाला पाहिजे आणि त्यातील पाण्याचं प्रमाण कमी करायचं.
  5. Kothimbir Vadi Recipe In Marathi मिश्रण तयार झाल्यानंतर वड्या पाडण्याच्या आधी ते 1 तास थंड होऊ द्यायचं म्हणजे ते नीट सेट होईल.

या सर्व एकदम सोप्या आणि फायदेशीर टिप्स वापरून तुम्ही टेस्टी कोथिंबीर वड्या (Kothimbir Vadi Recipe In Marathi) आपल्या घरीच बनवू शकता.

FAQ’s For Kothimbir Vadi Recipe In Marathi
  1. Kothimbir Vadi Recipe In Marathi कशापासून बनवली जाते ?

कोथिंबीर वडी हे खूपच चविष्ट स्नॅक्स आहे. हे कोथिंबीर, बेसनपीठ, तांदळाचं पीठ, दही, शेंगदाण्याचा कूट, मिरच्या आणि खूप सारे मसाले टाकून बनवली जाते. त्यानंतर तेलामध्ये तळून या वड्या खाण्यासाठी सर्व्ह करतात. कोथिंबीर वडी खाण्यात खूपच कुरकुरीत लागते.

  1. कोथिंबीर वडी आरोग्यासाठी चांगली आहे का ?

कोथिंबीर वडी चवीला खूपच रुचकर लागते पण ती आपल्या आरोग्यासाठी तितकीशी चांगली नाही. कोथिंबीर वडी ही तेलामध्ये डीप फ्राय केलेली असते आणि असे तेलात तळलेले पदार्थ तब्येतीसाठी जास्त काही चांगले नसतात.

  1. कोथिंबीर वडी फ्रीजमध्ये साठवू शकतो का ?

कोथिंबीर वडी जास्त काळ टिकवण्यासाठी आपण फ्रीजमध्ये साठवू शकतो. आपण कोथिंबीरच्या वड्या एका तेल लावून घेतलेल्या हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. या वड्या 1 आठवड्यापेक्षा जास्त चांगल्या टिकू शकतात. डब्यात ठेवण्यापूर्वी कोथिंबीर वड्या थंड करून ठेवायच्या.

  1. कोथिंबीर वडीचे शेल्फ लाईफ काय आहे ?

कोथिंबीर वडी जर स्टीमवर बनवली असेल तर ती फ्रीजमध्ये 4-5 दिवस चांगली टिकते त्यामुळे अनेकजण स्टीमवर कोथिंबीर वडी बनवतात. पण कोथिंबीर वडी जर डीप फ्राय केलेली असेल तर ती लवकर खाल्लेली चांगली असते.

  1. Kothimbir Vadi Recipe In Marathi किती काळ टिकते ?

कोथिंबीर ही स्वयंपाक करताना खूप जास्त उपयोगात येते. जर तुम्ही कोथिंबीर बाहेरच खोलीच्या तापमानात ठेवली तर जास्तीत जास्त 1 आठवडा टिकू शकते पण जर तुम्ही कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवली तर ती 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. फ्रीजमधील कमी तापमानात कोथिंबीर जास्त काळ टिकते.

  1. कोथिंबिरीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत ?

कोथिंबीरचा आपण अनेक पदार्थांची गारनिशिंग करण्यासाठी उपयोग करतो. कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन के असतं जे तुमच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. आपल्या शरीरातील हाडं दुरुस्त करतं, हृदयरोग होण्यापासून संरक्षण करतं आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून वाचवतं.

आपल्या टेस्टी आणि चटपटीत कोथिंबीर वड्या (Kothimbir Vadi Recipe In Marathi) तयार आहेत. या कोथिंबीर वड्या तुमच्या घरच्यांना मस्त खायला द्या. सगळ्यांना खूपच आवडतील. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खमंग कोथिंबीर वड्या खायला तर खूप मजा येते. चहाबरोबरसुद्धा स्नॅक्स म्हणून आपण या खुसखुशीत कोथिंबीर वड्या खाऊ शकतो. तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी एकदा बनवून पहा.

तुम्हालासुद्धा ही कोथिंबीर वडीची रेसिपी (Kothimbir Vadi Recipe In Marathi) आवडली का नक्कीच सांगा. अशाच चटपटीत रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.  

Scroll to Top