Khasdar Salary आपल्या भारत देशात नुकतीचं लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत संपूर्ण देशाने 543 खासदार निवडून संसदेत पाठवले. असेही अनेक खासदार आहेत, जे पहिल्यांदाचं संसदेत गेले आहेत. त्यांचा शपथविधीही झालाय. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का आता या खासदारांना दरमहा किती पगार मिळेल ? त्यांना कोण कोणते भत्ते मिळतील ? त्यांना काय काय सवलती मिळतील ? आज आपण त्या त्याबद्दल जाणून घेऊया.
Khasdar Salary
यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये 543 पैकी 280 असे खासदार आहेत जे पहिल्यांदा खासदार बनलेत, पहिल्यांदाच संसदेत गेले आहेत. यापैकी 45 खासदार हे उत्तर प्रदेश मधून आहेत, तर 33 खासदार हे महाराष्ट्रमधून आहेत.
2020 मध्ये बदललेल्या नियमानुसार प्रत्येक खासदाराला 1 लाख रुपये दरमहा पगार मिळतो. या पगाराव्यतिरिक्त त्यांना अनेक सवलती आणि विविध भत्तेही मिळतात. या भत्यांमध्ये 20 हजार रुपये भत्ता समाविष्ट आहे. त्याचबरोबर लेखन सामग्रीसाठी 4 हजार रुपये आणि पत्रांसाठी 2 हजार रुपयांचा वेगळा भत्ता मिळतो.
प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदार संघासाठी 70 हजार रुपये भत्ता आणि ऑफिससाठी 60 हजार रुपयांचा भत्ता अधिक मिळतो. या भत्या व्यतिरिक्तही त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स, मेडिकल अलाउंस, त्याचबरोबर टोल नाका देण्यापासूनही सवलत मिळते.
खासदारांना प्रवास करायचा असल्यास त्यांना रेल्वेच्या फर्स्ट क्लासमध्ये फ्री प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर जेव्हा संसद अधिवेशन सुरू आहे, तेव्हा दर दिवसाचा त्यांना 2 हजार रुपये भत्ताही वेगळा मिळतो.
तसंच तुम्ही जर एकदा संसद सदस्य राहिले तरीसुद्धा तुम्हाला पुढील आयुष्यभर माजी खासदार म्हणून पेन्शनही मिळत राहते.
लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे 3 उपाय
एकूणचं आपल्या देशातील खासदार असणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणं, स्वप्न पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी एक मोठ दिव्य असतं. परंतु त्यासाठी त्यांना सरकारकडून विविध भत्ते आणि पगारही मिळतो. त्याचबरोबर मतदार संघाच्या विकासासाठीही दरवर्षी त्यांना कोट्यावधींचा निधीही दिला जातो.
तर खासदारांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती होती का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !