KBC 16 Registration Question Today कौन बनेगा करोडपती हा भारतातील प्रसिद्ध कार्यक्रम आहे. मागील 24 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलाय. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य माणूस आपल्या ज्ञानाच्या बळावर येथे पैसे कमावू शकतो, करोडपती बनू शकतो तेही अवघ्या काही तासांमध्ये.
परंतु या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचं एवढंच एक कारण नाहीये, तर अमिताभ बच्चन यांच्यासारखा महानायक ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो, ते पाहण्यासाठीही दररोज लाखों लोक हा कार्यक्रम पाहत असतात.
KBC 16 Registration Question Today
दरवर्षी या कार्यक्रमाचा एक नवीन सीजन येत असतो आणि यावर्षी कोण बनेगा करोडपती 16 (KBC 16 Registration Question Today) या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत. तुम्हाला जर या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, तर दररोज विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यावं लागेल आणि तुम्ही नशिबवान असाल तर तुम्हाला या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात येईल आणि मग पुढील प्रोसेसनंतर तुम्ही हॉट सीटपर्यंत पोहोचू शकतात.
म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी 30 एप्रिल 2024 रोजी विचारला गेलेला कौन बनेगा करोडपती 16 रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा प्रश्न आणि त्याचे उत्तर घेऊन आलो आहोत. तर तुम्हीसुद्धा तुमचं नशीब नक्कीचं आजमावू शकता.
30 एप्रिलला विचारला गेलेला केबीसी रजिस्ट्रेशनचा प्रश्न
प्रश्न : 18 व्या लोकसभेसाठी जर निवडणूक लढवायची असेल, तर संबंधित व्यक्तीचे वय कमीत कमी किती असणे गरजेचे आहे ?
A) 20
B) 25
C) 30
D) 35
या सर्व ऑप्शन्सपैकी ऑप्शन B हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. लोकसभा निवडणूक लढवायची असेल, तर भारतीय व्यक्तीचं वय कमीत कमी 25 वर्ष असायला हवं.
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला Sony LIV हे एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल. हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवरही उपलब्ध आहे. तेथे जाऊन तुम्ही कौन बनेगा करोडपतीसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.
अभिजित खांडकेकरची मालिकेच्या सेटवर उपासमार
एकूणचं मागील 16 सीझनमध्ये अनेक लोक या कार्यक्रमात सहभागी होऊन लखपती आणि करोडपती बनले आहेत. तुम्हालाही तुमच्या ज्ञानावर विश्वास असेल, तर तुम्ही सुद्धा नशीब नक्कीचं आजमावू शकतात.
आम्ही दररोज हे पेज नवीन रजिस्ट्रेशन क्वेशननुसार (KBC 16 Registration Question Today) अपडेट करू. त्यामुळे या पेजला पुन्हा भेट द्यायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !