Karishma Kapoor Marriage बच्चन कुटुंबीय हे बॉलीवूडमधील मोठं प्रस्थ आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही न्यूज सगळ्यांनाचं ऐकायला आणि वाचायला आवडते. नुकताचं करिष्मा कपूर हिचा 50 वा वाढदिवस पार पडला. या निमित्ताने तिच्या आणि बच्चन कुटुंबाच्या कनेक्शनबद्दलसुद्धा चर्चा व्हायला लागलीये.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनचं लग्न ऐश्वर्या रायशी झालंय आज त्यांना आराध्या बच्चन नावाची एक सुंदर मुलगीही आहे. 2007 मध्ये त्यांचं लग्न झालं. परंतु अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न होण्याआधी अभिषेक बच्चनचं लग्न करिष्मा कपूरशी ठरलं होतं. या दोघांचा साखरपुडाही झाला होता. नंतर हे लग्न मोडलं. पण हे लग्न का मोडलं ? याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.
Karishma Kapoor Marriage
जेव्हा अभिषेक बच्चनने चित्रपट विश्वात पदार्पणही केल नव्हतं, तेव्हापासून या दोघांचं अफेअर होतं. तेव्हा करिष्मा कपूर ही बॉलीवूडची मोठी हीरोइन होती. तर अभिषेक बच्चन लवकरचं बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होता. तो अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणे मोठा स्टार बनेल असं प्रत्येकाला वाटत होतं. त्यामुळे या दोघांचा साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीखही ठरली होती. विविध कार्यक्रमांमध्ये करिष्मा कपूर बच्चन कुटुंबीयांबरोबर दिसायची सुद्धा.
परंतु अभिषेक बच्चनची आई जया बच्चन यांनी करिश्माला अट घातली की, लग्नानंतर तू चित्रपटांमध्ये काम करायचं नाही आणि ही अट करिष्मा कपूर आणि त्यांची आई बबीता यांना मान्य नव्हती. तर दुसरीकडे आज बच्चन कुटुंबीय हे ज्या उंचीवर आहेत. त्यांची जेवढी संपत्ती आहे, तशी परिस्थिती त्या काळात नव्हती. अमिताभ बच्चन यांचं एबीसीएल प्रोडक्शन हे तोट्यात होतं. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. त्यामुळे करिश्माची आई बबीता यांना असं वाटलं की लग्नानंतर आपल्या मुलीचे हाल होऊ नये, तिला गरिबीत दिवस काढावे लागू नये.
आणि या सगळ्या गोष्टीमुळे अभिषेक आणि करिष्मा या दोघांचा साखरपुडा मोडला. या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर करिष्मा कपूरचं लग्न एका मोठ्या उद्योगपतीशी झालं. परंतु या दोघांचाही घटस्फोट झाला आणि करिश्माने या उद्योगपतीवर अत्यंत गंभीर आरोप लावले होते. आता करिश्माला दोन मुलं आहेत. पण ती एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करते.
तर तुम्हाला करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल ही गोष्ट माहिती होती का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !