Kalki On OTT अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला कल्की हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रेषकांची गर्दी ओढतोय. जिथे पहावं तेथे या चित्रपटाची चर्चा आहे. अनेक लोक थेटरमध्ये जाऊन कल्की चित्रपट पाहताय. परंतु लॉकडाऊननंतर अनेकांना ओटीटीवर चित्रपट पाहण्याचीही सवय लागली आहे. त्यामुळे कल्की ओटीटीवर कधी येतोय, याचीही अनेकजण वाट पाहत आहेत आणि आता त्याबद्दलचं एक मोठी अपडेट समोर येतेय.
Kalki On OTT
झालं असं की, कल्की चित्रपट रिलीज होण्यासाठी या चित्रपटाचे ओटीटी राइट्स ॲमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सला विकण्यात आले होते. सुरुवातीला असं ठरलं होतं की, कल्की जुलै महिन्याच्या शेवटी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येईल. परंतु आता चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत असल्यामुळे या चित्रपटाची ओटीटी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ॲमेझॉन प्राईमने कल्की चित्रपटाचे तेलगू, तमिल आणि मल्याळम राईट खरेदी केले असून हा चित्रपट जुलै महिन्यात नाही तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ऍमेझॉन प्राईम ओटीटीवर येईल.
तर हिंदी प्रेक्षकांना कल्की पाहण्यासाठी नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट येण्याची वाट पहावी लागेल.येथेही सप्टेंबरच्या शेवटी कल्की रिलीज होईल.
मुंज्या चित्रपट एवढा का चालतोय ?
एकूणच कल्की चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाय आणि रिलीजनंतर अवघ्या काही दिवसांतच चित्रपट 1000 कोटी रुपये कमावण्याच्या दिशेने आगेकूच करतोय.
तर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला की OTT वर येण्याची वाट पाहताय नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !