Kalki 2898 AD Review बॉलीवूडमध्ये सध्या भारताच्या इतिहासावर आधारित असलेल्या चित्रपटांचा ट्रेंड सुरू झालाय आणि या चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात VFX चा वापर केला जातोय आणि असाचं एक बिग बजेट चित्रपट सिनेमा गृहात रिलीज झालाय. या चित्रपटाचं नाव आहे कल्की 2898 AD.
साउथ चित्रपटांचा सुपरस्टार प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि कमल हसन अशा तगड्या कलाकारांची फौज असलेला कल्की साउथचा प्रसिद्ध डिरेक्टर नाग अश्विनने दिग्दर्शित केलाय. चित्रपटाचे बजेट 600 कोटी रुपये आहे. त्यामुळेचं या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. तर मग चला आज आपण या चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेऊया.
Kalki 2898 AD Review
चित्रपटाची कथा आजपासून जवळपास 850 वर्ष पुढे घडते. जेव्हा पृथ्वीवर सगळं काही उध्वस्त झालंय. जे श्रीमंत लोक आहेत, त्यांच्यासाठी एक स्पेशल जागा बनवली गेलीये. जिथे सगळ्या सोयीसुविधा आहेत. परंतु तेथे जाण्यासाठी लाखो रुपयांची गरज लागते आणि ज्यांच्याकडे हे लाखो रुपये नाहीये, ते पृथ्वीवर किड्या मुंगी सारखं जीवन जगताय. त्यांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा काहीही मिळत नाहीये.
राक्षसांचे मानव जातीवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेत आणि आपल्या पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंचा कल्की अवतार लवकरचं पृथ्वीवर जन्म घेणार आहे. दुसरीकडे प्रभासने भैरवाची भूमिका केलीये, ज्याला ते लक्झरी आयुष्य जगायचंय आणि त्यासाठी तो कल्की भगवानच्या होणाऱ्या आईला या राक्षसांच्या तावडीत सोपवण्याचा प्रयत्न करतोय. पण तेथेचं एन्ट्री होते अश्वत्थामाची. मग पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्वतः चित्रपट पहावा लागेल.
अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाचा रोल केलाय. एकूणचं चित्रपटाचा जो इंटरवल आधीचा पार्ट आहे, तो तुम्हाला स्लो वाटतो. थोडा बोर करू शकतो. कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी दिग्दर्शकाने वेळ घेतला आहे. परंतु एकदा का अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाच्या रूपात एंट्री घेतली की मग चित्रपट गती पकडतो आणि मग स्क्रीनवर जे काही घडत राहतं, ते तुम्ही श्वास रोखून पाहत राहतात.
एका भारतीय चित्रपटात या लेवलचे VFX, CGI आणि सेट डिझाईन होऊ शकतं, यावर तुमचा विश्वासचं बसत नाही. हॉलीवुड चित्रपटांना पछाडेल या लेव्हलचं काम नाग अश्विन यांनी आपल्या चित्रपटात उभ केलंय आणि ते पाहताना प्रेक्षक अक्षरशः चक्राऊन जातात.
परंतु चित्रपटाचा हाय पॉइंट येतो शेवटच्या 30 मिनिटात क्लायमॅक्समध्ये. जेथे तुम्हाला स्क्रीनवर जे काही दिसतं, ते फक्त तुम्ही स्वतःच अनुभव करायला हवं, ते दुसऱ्याने सांगून फायदा नाही.
मुंज्या चित्रपट एवढा का चालतोय ?
एकूणचं ही सगळी कमाल केलीये चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी. त्यांनी अशा लोकांची टीम गोळा केलीये, की त्यांचं काम स्क्रीनवर तुम्ही एकटक पाहत राहतात. त्यामुळे हा एक आयुष्यातील वेगळा अनुभव आहे असं तुम्हाला वाटत राहतं.
जर तुम्हालाही आपल्या देशाचा इतिहास आणि सायन्स फिक्शन यांचा संगम पाहायचा असेल, जबरदस्त ॲक्शन पहायची असेल, काहीतरी वेगळं पाहायचं असेल, असं काही तरी पहायचं असेल, जे आजपर्यंत भारतीय चित्रपटात कधी घडलं नाही, तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे एवढं मात्र नक्की.
तर तुम्ही कल्की 2898 AD चित्रपट पाहिलाय का ? तुम्हाला आवडला की नाही ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन अपडेटसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !