Kaliyug Kadhi Sampnar आपण अनेकदा हे वाक्य ऐकलं असेल किंवा स्वतःही आपण म्हणत असतो की, घोर कलियुग सुरू आहे. आता या जगाचं काही खरं नाही. मग हे कलियुग नेमकं आहे तरी काय ? आणि हे युग का असतात ? कलियुगाची सुरुवात कशी झाली ? हे कलियुग अजून किती वेळ चालणार ? कलियुगात नेमकं होतं तरी काय ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
आपल्या पुराणानुसार चार युग चक्र आहेत. सर्वात आधी सतयुग आलं, त्यानंतर त्रेतायुग आलं, मग द्वापरयुग आलं आणि सध्या कलियुग सुरू आहे. कलियुग संपल्यानंतर पुन्हा एकदा सतयुग सुरू होईल आणि हे कालचक्र असंच सुरू राहील.
मग सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांमध्ये नेमका फरक आहे तरी काय ? सध्या जे कलियुग सुरू आहे, त्यापेक्षा आधीचे युग कसे वेगळे होते ? Kaliyug Kadhi Sampnar ? यांच्यात नेमका फरक तरी काय आहे ? आपण ते आधी जाणून घेऊया.
Kaliyug Kadhi Sampnar
सर्वात आधी या पृथ्वीवर सतयुगाला सुरुवात झाली. पुराणांनुसार सतयुगाचा काळ जवळपास 4800 दिव्य वर्ष म्हणजेचं आपण जे 365 दिवसांचं वर्ष मानतो, त्यानुसार 17 लाख 28 हजार वर्षांचं होतं.
या सतयुगात माणूस धर्म, देव यांना खूप मानायचा. पृथ्वीवर देवांचं अस्तित्व होतं. ते पृथ्वीवरचं राहायचे. या काळात एका माणसाचं आयुष्य सरासरी जवळपास 10 हजार वर्षांचं होतं. म्हणजे एक माणूस 10 हजार वर्षे जगायचा. त्याचबरोबर प्रत्येक माणसाची उंची जवळपास 32 फूट असायची.
सतयुग संपल्यानंतर या पृथ्वीवर त्रेतायुगाची सुरुवात झाली. त्रेतायुगात हळूहळू माणूस अधर्माच्या बाजूने झुकू लागला. त्रेतायुगाचा काळ 3600 दिव्य वर्षांचा होता, म्हणजेचं जवळपास 12 लाख 96 हजार वर्ष.
या युगात माणसाचं आयुष्यमान 1000 वर्षांचं होतं आणि प्रत्येक माणसाची उंची जवळपास 21 फूट असायची.
त्रेतायुग संपल्यानंतर पृथ्वीवर द्वापरयुगाला सुरुवात झाली. या युगातचं महाभारताचं युद्ध झालं. भगवान श्रीकृष्ण यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. द्वापरयुगाचा काळ जवळपास 2400 दिव्य वर्ष म्हणजेचं 8 लाख 64 हजार वर्षांचा होता. द्वापरयुगात प्रत्येक माणसाचं वय जवळपास 500 वर्ष असायचं आणि उंची 11 फूट होती.
श्रीकृष्ण त्यांचा अवतार संपून वैकुंठात गेल्यानंतर या पृथ्वीवर द्वापरयुगाचा अंत झाला आणि कलियुगाला सुरुवात झाली.
सध्या आपण ज्या युगात जगतोय, Kaliyug Kadhi Sampnar ते कलियुग सुरू आहे. कलियुगाचा काळ 1200 दिव्य वर्षांचा सांगितला जातो. 1200 दिव्य वर्ष म्हणजे 4 लाख 32 हजार वर्ष.
या राजाच्या चुकीमुळे सुरु झालं कलियुग ?
या कलियुगात Kaliyug Kadhi Sampnar धर्माचा समूळ नाश होईल. चुकीच्या भ्रष्टाचारी लोकांना लोक आपला आदर्श मानतील. त्यांचा मोठेपणा करतील आणि चांगल्या पुण्यवान लोकांना त्रास होईल. कलियुगात माणसाचं सरासरी वय फक्त 100 वर्षांचा असेल आणि उंची फक्त 5 फूट.
असंही म्हटलं जातं की, कलियुगाच्या शेवटी माणसाची उंची फक्त चार इंच राहील आणि त्याचं सरासरी वय फक्त 12 वर्षे असेल.
हा तर होता पृथ्वीवर असलेल्या चार युगांमधील फरक. आता आपण जाणून घेऊया की, द्वापरयुग संपून कलियुग Kaliyug Kadhi Sampnar कसं सुरू झालं ? ही गोष्ट सुद्धा खूपच रोमांचक आहे.
महाभारताच्या युद्धानंतर पांडव त्यांच्या शरीराचा त्याग करून स्वर्गात निघून गेले. मग काही वर्षांनी भगवान श्रीकृष्ण यांनीही त्यांचा अवतार संपवला आणि ते वैकुंठात गेले. पांडवांच्या पश्चात अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा राजा परिक्षित संपूर्ण जगावर राज्य करत होते.
राजा परिक्षित यांना माहीत होतं की, लवकरचं द्वापरयुग संपणार आहे आणि कलियुग सुरू होणार आहे. या कलियुगात पृथ्वीवर अधर्म वाढेल हे राजा परिक्षित यांना माहीत असल्यामुळे कलियुगाला येऊ द्यायचं नाही, त्याचा समूळ नाश करायचा, असं राजा परिक्षित यांनी ठरवलेलं. परंतु कलियुग येणार ही विधिलिखित होतं आणि राजा परिक्षित यांच्या एका चुकीमुळे कलियुग संपूर्ण पृथ्वीवर पसरलं आणि आता कलियुगाचे परिणाम आपण सगळे बघतोय.
कलियुग कधी संपणार ?
झालं असं की, कलियुग Kaliyug Kadhi Sampnar एका माणसाच्या रूपात सर्वात आधी राजा परिक्षित यांच्या समोर आलं. एकदा राजा परिक्षित शिकार करण्यासाठी जंगलात गेले, तेव्हा त्यांना दिसलं की एक माणूस काठीने फक्त एक पाय असलेला बैल आणि गाय यांना मारहाण करतोय. हे पाहून राजा परिक्षित यांना खूप राग आला आणि त्यांनी या माणसाला थांबवत विचारलं, तू हे काय करतोय ? तुला तर मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला हवी.
Kaliyug Kadhi Sampnar तेव्हा मानवाच्या रूपात असलेल्या कलियुगाने घाबरण्याचं नाटक केलं आणि तो राजा परिक्षित यांच्या पायावर लोटांगण घालत म्हणाला की, मला माफ करा. राजा परिक्षित यांना लक्षात आलं की, ही सगळी माया आहे आणि हा माणूस म्हणजे कलियुग असून हा बैल धर्माचं प्रतीक आहे आणि गाय या पृथ्वीचं धरती मातेचं प्रतीक आहे.
प्रभू श्रीरामांची बहीण शांताची गोष्ट माहिती आहे का ?
राजा परीक्षित यांना कलियुगाची दया आली आणि ते म्हणाले की मी तुला मृत्यूदंड देत नाही, पण तू आत्ताच्या आत्ता माझ्या राज्याच्या बाहेर निघून जा. तेव्हा कलियुग राजा परीक्षेतला म्हणाला, हा माझ्यावर खूप मोठा अन्याय आहे. कारण संपूर्ण पृथ्वीवर तुमचंच राज्य आहे. मग मी कुठे जाणार आणि विधीलिखितानुसार आता मला या पृथ्वीवरचं राहावं लागेल. त्यामुळे तुम्ही मला या पृथ्वीवरचं स्थान द्या.
Kaliyug Kadhi Sampnar कलियुग पापी असल्याने जेथे पापी लोक जातात तिथेच त्याला स्थान द्यावे, हा विचार करून राजा परिक्षितने त्याला सांगितलं की, तू जुगार, दारू परस्त्रीगमन आणि हिंसा या चार ठिकाणी रहा. तेव्हा कलियुग म्हणाला, हे चारही स्थान तर वाईट समजले जातात. कमीत कमी एक तरी असे स्थान मला द्या, जे चांगलं समजलं जातं. तेव्हा राजा परिक्षित यांना कलियुग आपल्याला फसवतोय हे समजलं नाही आणि ते म्हणाले तू सोन्यातही राहू शकतो.
कलियुगाला हे सांगताना राजा परिक्षित विसरून गेले की, त्यांनी स्वतःही सोन्याचा मुकुट घातला आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन कलियुग सुक्ष्म रूपात त्यांच्या सोन्याच्या मुकूटावर जाऊन बसला.
राजा परिक्षित शिकारीसाठी वनात गेले. वनात गेल्यानंतर राजा परिक्षित यांना खूप तहान लागली. तेवढ्यात त्यांना शामिक ऋषी यांचा आश्रम दिसला. त्यांनी शामिक ऋषींना पाणी मागितलं. परंतु त्यावेळी शामिक ऋषी तपश्चर्या करत होते. ते ध्यानस्थ असल्याने त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही.
राजा परीक्षित कोण होता ?
त्याक्षणी राजा परिक्षित यांच्या डोक्यावरील सोन्याच्या मुकुटात कलियुग असल्याने कलियुगच्या प्रभावाखाली राजा परिक्षित यांना हा स्वतःचा अपमान वाटला की, या ऋषीने मला पाणी दिलं नाही. राजा परिक्षित यांना खूप राग आला आणि त्यांनी चक्क ध्यानस्थ बसलेल्या शामिक ऋषींच्या गळ्यात मेलेला साप टाकला.
Kaliyug Kadhi Sampnar थोड्यावेळानंतर जेव्हा ऋषी शामीक यांचा पुत्र शृंगी आश्रमात परतला. तेव्हा आपल्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप पाहून त्यांना खूप राग आला. त्यांना समजलं हे सगळं राजा परिक्षितने केलंय आणि त्यांनी राजा परिक्षितला श्राप दिला की, येत्या 7 दिवसात नागराज तक्षक तुझा चावा घेईल आणि तुझा मृत्यू होईल आणि घडलेही तसचं. सात दिवसानंतर राजा परिक्षितचा मृत्यू झाला आणि मग त्यानंतर कलियुगानेने पृथ्वीवर पसरायला सुरुवात केली आणि सध्या आपण कलियुगातचं वावरतोय.
पुराणानुसार 4 लाख 32 हजार वर्षांचा कालावधी कलियुगाचा असेल आणि सध्या फक्त 5000 वर्षांपेक्षा जास्त काळ होत आहे. म्हणजे अजूनही 4 लाख 27 हजार वर्ष बाकी आहेत. कलियुगाचे मानव जातीला घोर परिणाम भोगावे लागतील. त्यातील अनेक परिणाम आतापासूनचं आपण बघतोय.
आवडली का तुम्हाला कलियुगाबाबतची ही माहिती ? Kaliyug Kadhi Sampnar ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या चॅनेलवरील इतर पौराणिक कथाही नक्कीचं पहा. अशाच नवीन नवीन पौराणिक कथांसाठीआमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
धन्यवाद !