Kakbhushundi Story आपल्या सर्वांना रामायणाची कथा माहीत आहे. टीव्ही मालिकेच्या रूपात सर्वांनीचं रामायण पाहिलंय. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने रामायण जगभरात पोहोचवण्याचं काम केलं.
रामायणातील अनेक पात्र आपल्याला माहितीयेत. परंतु या रामायणात असं एक पात्र आहे, अशी एक व्यक्ती आहे, जिने एकदा नाही, दोनदा नाही, तर चक्क 16 वेळेस रामायण घडताना पाहिलंय. हे तुम्हाला माहिती आहे का ?
तुम्ही म्हणाल आम्ही सुद्धा टीव्हीवर अनेकदा रामायण पाहिलंय किंवा वाचलंय. परंतु आम्ही ते नाही सांगत आहोत. रामायण खरोखर घडताना, स्वतःच्या डोळ्यांनी एका व्यक्तीने 16 वेळेस पाहिलंय.
तुम्ही म्हणाल असं कसं काय होऊ शकतं ? रामायण तर एकदाच घडलंय. मग 16 वेळेस रामायण प्रत्यक्ष कोण कसं पाहू शकत ? तर मैत्रिणीनो आणि मित्रांनो, ही कथा तुम्हाला सुद्धा अद्भुत वाटेल, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीचं ऐका.
Kakbhushundi Story काकभुशण्डिची कथा
संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामचरित मानस या रामायणावर आधारित महाकाव्यात Kakbhushundi Story काकभुशण्डि या श्रीरामांच्या परम भक्ताबद्दल सांगण्यात आलंय.
असं म्हटलं जातं की, जेव्हा भगवान शंकर यांनी पार्वती मातेला प्रभू श्रीराम यांची कथा सांगितली, त्यावेळेस कैलास पर्वतावर असलेल्या एका कावळ्याने सुद्धा ही गोष्ट ऐकली.
त्यानंतर या कावळ्याचा मनुष्यरुपात पुनर्जन्म झाला. परंतु कावळा असताना त्याने ऐकलेली प्रभू श्रीरामाची गोष्ट त्याच्या लक्षात राहिली आणि त्याने पुढे आपल्या शिष्यांना सुद्धा ही गोष्ट सांगितली.
काकभुशण्डिचा जेव्हा दुसरा जन्म झाला, तेव्हा त्यांनी आपल्या गुरुची निंदा केली. ज्यामुळे त्यांना 1000 योनीमध्ये तुझा जन्म होईल, असा शाप मिळाला.
ठरलं तर मग मालिकेतील संतूर मम्मी
शेवटचा जन्मात जेव्हा ते ब्राह्मण झाले, तेव्हा सुद्धा त्यांनी चूक केल्यामुळे त्यांना कावळ्याच्या जन्मात जाण्याचा शाप मिळाला. लोमस ऋषी यांनी त्यांना कावळ्याचा जन्मात जाशील, असा श्राप दिला होता. परंतु त्याचवेळेस लोमस ऋषींना त्याची दया आली आणि त्यांनी काकभुशण्डिला Kakbhushundi Story तू परम रामभक्त होशील आणि तुला इच्छा मरण घेता येईल, असं वरदानही दिलं.
प्रभू श्रीरामांचा परम भक्त काकभुशण्डि
परंतु काकभुशण्डि यांना कावळ्याचं रूप आवडल्याने ते नेहमी कावळाच बनून राहिले आणि काकभुशण्डि म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाले.
जेव्हा प्रभू श्रीराम यांचा जन्म अयोध्येत झाला आणि ते लहान होते, बाल रूपात होते. तेव्हा काकभुशण्डि कावळ्याच्या रूपात त्यांच्याजवळ आले आणि त्याचवेळेस भगवान श्रीरामांच्या मुखात त्यांना आकाशगंगा आणि ब्रम्हाडाचं दर्शन झालं. श्रीराम हे परमेश्वर आहेत, हे काकभुशण्डिला समजलं. तेव्हा त्यांनी प्रभू श्रीरामांची माफी मागितली की, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. प्रभू श्रीराम यांनी त्यांना वरदान दिलं की, तू अमर राहशील.
असं म्हटलं जातं की, घटना परत परत घडत असतात आणि प्रभू श्रीरामांच्या जवळ राहता यावं, त्यांच्या बाललीला पाहता याव्यात, यासाठीकाकभुशण्डि जेव्हा जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म होतो, तेव्हा तेव्हा त्यांना भेटण्यासाठी तेथे जातो. अशाप्रकारे काकभुशण्डि यांनी 16 वेळेस रामायण घडताना पाहिलय. असं म्हटलं जातं की, त्यांनी पाहिलेल्या रामायणात प्रत्येक वेळेस हे रामायण आधी घडलेल्या रामायणापेक्षा वेगळं असतं. घटना वेगळ्या घडतात.
आपल्याला सर्वांना माहिती आहे की, ऋषी वाल्मिकी यांनी रामायण लिहिलंय. परंतु त्यांच्या आधीच काकभुशण्डि यांना रामायणाची गोष्ट माहीत होती.
जेव्हा लंकेत प्रभू श्रीराम आणि मेघनाथ यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं. तेव्हा मेघनाथने प्रभू श्रीरामांना नागपाश या अस्त्राच्या मदतीने बांधून ठेवलं होतं. तेव्हा नारदाने सांगितल्यानंतर गरुडाने श्रीरामांना नागपाशापासून मुक्त केलं. परंतु तेव्हा गरुडाला संशय आला की, जर प्रभू श्रीराम परमेश्वर आहेत, मग ते नागपाशाला कसे काय बांधले गेले ? त्यांना प्रभू श्रीराम परमेश्वर आहेत का, हा संशय आला आणि हा संशय दूर करण्यासाठी नारद मुनींनी त्यांना परम पिता ब्रम्हाकडे पाठवलं.
परमपिता ब्रह्मा यांनी त्यांना भगवान शंकर यांच्याकडे पाठवलं आणि त्यानंतर भगवान शंकर यांनी गरुडाला काकभुशण्डि Kakbhushundi Story याच्याकडे पाठवलं.
रावणाविरुद्ध युद्धात काकभुशण्डिची प्रभू श्रीरामांना मदत
तेव्हा काकभुशण्डि यांनी गरुडाला भगवान श्रीराम यांची संपूर्ण कथा सांगितली आणि त्यांच्या मनातील संशय दूर केला. हे सगळं ऋषी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणाच्या आधी घडलेलं आहे.
काकभुशण्डि Kakbhushundi Story हे परम रामभक्त आहेत आणि जेव्हा जेव्हा युगातील बदलानुसार रामायण पुन्हा घडतं, प्रभू श्रीराम यांचा जन्म होतो. तेव्हा तेव्हा काकभुशण्डि तेथे कावळ्याच्या रुपात जातात आणि प्रभू श्रीरामांच्या बाल लीला पाहतात. त्यांची गोष्ट, त्यांची ही कथा खूपच रोचक आहे.
काकभुशण्डि Kakbhushundi Story यांच्याबाबतीत आणखीन एक किस्सा सांगितला जातो. जेव्हा रामानंद सागर रामायण या मालिकेची निर्मिती करत होते. मालिकेची शूटिंग सुरू असताना प्रभू श्रीराम यांच्या बालरूपातील लीला चित्रित केल्या जात होत्या. तेव्हा प्रभू श्रीराम एका कावळ्याबरोबर खेळत आहेत, हा सीन शूट करायचा होता.
रामानंद सागर यांना माहीत होतं की, खरोखरचा कावळा तर आपण येथे नाही आणू शकत. त्यामुळे त्यांनी एका कावळ्याचं शिल्प तयार करून घेतलं. परंतु शूटिंग सुरू होण्याआधीचं हे कावळ्याचं शिल्प खाली पडून तुटून गेलं. रामानंद सागर यांना काळजी वाटत होती की, आता शूटिंग कसं पूर्ण होणार ? परंतु त्याच वेळेस तेथे खरोखरचा कावळा आला आणि प्रभू श्रीराम यांच्याशी खेळू लागला. रामानंद सागर यांनी लगेच ही सगळी घटना शूट करून घेतली आणि त्यांना कावळ्याच्या शिल्पाची किंवा कोणत्याही स्पेशल इफेक्ट वापरण्याची गरजच पडली नाही.
मग त्यावेळेस आलेला हा कावळाच काकभुशण्डि Kakbhushundi Story होता का ? काकभुशण्डि अजूनही जिवंत आहेत का ? Kakbhushundi Story कोठे असतात ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतचं आहेत.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आपणही प्रभू श्रीराम यांना नमन करूया. जय श्रीराम.
आणि अशाच पौराणिक कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
धन्यवाद !