Kaju Katli Marathi Recipe
Kaju Katli Marathi Recipe काजू कतली ही आपल्याकडील अत्यंत स्वादिष्ट आणि लोकप्रिय मिठाई आहे. काजूपासून बनवली जाणारी ही मिठाई सर्वांचीच खूप आवडती आहे. एखादा आनंदाचा प्रसंग असो मग नाहीतर दिवाळीचा सण सगळेजण काजू कतली खाऊन हा आनंदाचा क्षण साजरा करत असतात.
दिवाळीला तर सगळ्यांच्या घरी काजू कतली खाण्याची प्रथाच आहे. फटाके फोडण्यासोबत मिठाईमध्ये काजू कतली खाण्याची मजा काही औरच असते. लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत काजू कतली सर्वचजण मस्त खातात.
काजू कतलीला काहीजण काजू बर्फी असंही म्हणतात. काजू भरपूर महाग असल्याने काजू कतलीसुद्धा अतिशय महाग मिठाई आहे त्यामुळे अनेकदा ती आपल्या बजेटच्या बाहेर असते.
अनेकजण दिवाळीच्या सीजनमध्ये होलसेलमधेही बाहेरून काजू कतली आणि दुसऱ्या मिठाई बनवून घेतात म्हणजे त्या काही प्रमाणात स्वस्तात पडतात. पण आपण मिठाई किती शुद्ध आहे त्याची गॅरेंटी देऊ शकत नाही. अनेकदा मिठाईमध्ये भरपूर प्रमाणात भेसळसुद्धा केली जाते. या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी तुम्ही अगदी बाहेरच्या सारखी स्वादिष्ट काजू कतली ही घरच्याघरी सुद्धा सोप्यात बनवू शकता. अगदी शुद्ध आणि स्वादिष्ट काजू कतली आपण घरी बनवू शकतो.
आज आम्ही तुमच्यासाठी अगदी सोप्यात बनवता येणारी काजू कतलीची रेसिपी Kaju Katli Marathi Recipe घेऊन आलो आहोत.
काजू कतली बनवण्याचं साहित्य :
Kaju Katli Marathi Recipe बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया.
- 2 कप काजू
- 1 कप साखर
- 1 कप पाणी
- 2 चमचे तूप
- बटर पेपर
- चांदीचा वर्क
काजू कतली बनवण्याची कृती :
- Kaju Katli Marathi Recipe बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यात 2 कप फ्रेश काजू घ्यायचे. एखादं काळं साल असेल तर ते काढून टाकायचं. हे काजू आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत.
- मिक्सर चालू करायचं बंद करायचं असं 4 ते 5 वेळा करून काजू बारीक करायचे. मिक्सर सलग नाही फिरवायचं. एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 1-2 वेळा फिरवून बारीक करायचं आणि ही काजूची पूड एका भांड्यात काढून घ्यायची.
- ही काजू कतली आपण चाळून घेणार नाही. न चाळतादेखील आपल्या काजू कतलीचं टेक्सचर एकदम बरोबर आहे.
- आता एका पसरट पॅनमध्ये आपल्याला 1 कप साखर घ्यायचीय. जेवढे काजू घेतले त्याच्या अर्ध्या प्रमाणात साखर घ्यायची. त्यात 1 कप पाणी टाकायचं. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवायचा आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय.
- साखर विरघळल्यानंतर मिडीयम फ्लेमवर 4-5 मिनिटे असंच शिजू द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून आपण तयार केलेली काजूची पूड त्यात टाकायची. चमच्याच्या साहाय्याने गुठळ्या मोडत मोडत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं.
- गॅस कमी फ्लेमवर ठेवायचा आणि गुठळ्या मोडत मोडत सलग आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आणि शिजवून घ्यायचं. मिश्रणाला उकळी आली की गॅस कमी फ्लेमवरच ठेवत शिजवून घ्यायचं कारण गरम झाल्यामुळे ते जळण्याची भीती असते.
- काही वेळाने आपलं मिश्रण दाटसर व्हायला लागलंय. आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि 4 ते 5 मिनिटे कमी फ्लेमवर आणखी शिजवून घ्यायचं. आपलं मिश्रण योग्य झालं का हे ओळखायचं असेल तर थोडं मिश्रण घेऊन गोल गोळा करायचा आणि तो थंड पाण्यात टाकायचा. सेट होत असेल तर आपलं मिश्रण योग्य बनलंय.
- आपला हा गोळा हाताला अजिबात चिकटायला नको. जर तो हाताला चिकटत असेल तर समजायचं की आपला पाक कच्चा आहे त्यामुळे त्याला आणखी काही मिनिटे शिजवून घ्यायचं.
- गॅस बंद करायचा आणि पॅनमध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं कारण आपला पॅन अजून गरम आहे. गॅस बंद केल्यावर 3 ते 4 मिनिटे असंच ते परतून घ्यायचं. आपला पाक आता सेट व्हायला लागलाय. जर तुमचा पाक दाटसर होत नसेल तर तो अजून कच्चा आहे असं समजायचं.
- आता एका बटर पेपरवर हे मिश्रण आपण काढून घेणार आहोत. आपला गोळा छान सेट झालेला आहे. आता बटर पेपरवर आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत. हे मिश्रण गरम आहे त्यामुळे बटर पेपरच्या साहाय्याने मळून चांगलं मिक्स करून घ्यायचं.
- आपलं हे मिश्रण अजिबात चिकटत नाहीये आपण जे तूप वरून घातलं होतं तेसुद्धा हा गोळा शोषत नाही उलट तूप सुटत आहे. आपला हा गोळा बटर पेपरला चिकटायला नको. जर तो बटर पेपरला चिकटला तर तो आणखी काही वेळ शिजवून घ्यायचा. जर तुमचा पाक कच्चा राहिला तर तुम्ही जेव्हा वडी सेट कराल ती कडक होणार नाही तशीच राहील त्यामुळे हा पाक 4 ते 5 मिनिटे आणखी शिजवून घ्यायचा.
- आपण हे मिश्रण पोळपाटावर ठेवून त्यावरच वड्या कापून घेणार आहोत. लाटण्याला तूप लावून घ्यायचं. पोळपाटाला तूप लावायचं नाही कारण आपलं मिश्रण तूप सोडतंय त्यामुळे तूप लावण्याची गरज नाही.
- तुमचा पाक जर कच्चा राहिला तर तो पोळपाटावर चिकटेल आणि तुमचं मिश्रण खराब होईल त्यामुळे ते बटर पेपरवरच घालायचं. नीट शिजेलेलं आहे का चेक करायचं. सेट होतंय का चेक करायचं आणि व्यवस्थित असेल तर वड्या थापून घेऊ शकता.
- आता पोळपाटावर हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये लाटायचं. त्यानंतर यावर चांदीचा वर्क लावून घ्यायचा आणि चाकूने काजू कतलीच्या वड्या कट करायच्या. कट केल्यानंतर या वड्या 30 मिनिटे तशाच राहू द्यायच्या आणि मग प्लेटमधून काढून घ्यायच्या.
अर्ध्या तासाने सेट झाल्यानंतर या वड्या चवीला आणि दिसायला अगदी बाहेरच्या सारख्या वाटतात.
आपली Kaju Katli Marathi Recipe तयार आहे. या तुम्ही घरच्यांना टेस्ट करायला देऊ शकता.
Paneer Biryani Recipe In Marathi | पनीर बिर्याणी रेसिपी मराठी
Important Tips For Kaju Katli Marathi Recipe
- Kaju Katli Marathi Recipe बनवण्यासाठी काजू मिक्सरमध्ये ग्राइंड करताना मिक्सर चालू करायचं बंद करायचं असं करून बारीक करायचं सलग मिक्सर फिरवायचं नाही.
- काजूची पूड चाळण्याची काहीच गरज नाही न चाळताही याचं टेक्सचर अगदी बरोबर आहे.
- आपण बनवलेलं काजू कतलीचं मिश्रण चिकटायला नको. जर ते चिकटलं तर आपला पाक कच्चा आहे असं समजायचं. जर पाक कच्चा राहिला तर आपण वडी सेट करू तेव्हा ती तशीच राहील कडक होणार नाही त्यामुळे हा पाक आणखी 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायचा.
- लाटून घेतल्यानंतर अर्ध्या तासाने या वड्या चवीला आणि दिसायला मार्केटसारख्या होतील.
- आपण पॅनमध्ये काजू कतलीचं मिश्रण तयार करतो तेव्हा जर आपल्याला मिश्रण बरोबर शिजलंय की नाही ते कळत नसेल तर गॅस बंद करून परतत राहायचं. थंड झाल्यावर जर न चिकटणारा गोळा तयार झाला तर आपलं मिश्रण बरोबर शिजलंय. पण जर मिश्रण तसंच असेल हाताला चिकटत असेल तर अजून थोडावेळ शिजवून घ्यायचं.
या सर्व टिप्स वापरून तुम्ही छान Kaju Katli Marathi Recipe बनवू शकता.
FAQ’s About Kaju Katli Marathi Recipe
- Kaju Katli Marathi Recipe कशापासून बनवली जाते ?
काजू कतली ही खूपच स्वादिष्ट मिठाई आहे. काजू कतली ही काजू, साखर, तूप, पाणी टाकून बनवली जाते आणि त्यावर चांदीचा वर्क लावला जातो. काजू कतली ही अत्यंत टेस्टी आणि महाग मिठाई आहे.
- काजू खाण्याचे फायदे कोणते आहेत ?
ड्रायफ्रूटस खायला सगळ्यांनाच खूप आवडतं. काजू खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. काजू आपल्या शरीरातील ब्लड प्रेशरला योग्य ठेवतं, वजन कमी करतं, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून सुरक्षित ठेवते. काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात.
- Kaju Katli Marathi Recipe किती दिवसापर्यंत खराब होत नाही ?
काजू कतली सगळ्यांची खूप आवडती मिठाई आहे त्यामुळे मार्केटमध्ये या मिठाईला भरपूर मागणी असते. त्याचबरोबर आपण टेस्टी काजू कतली आपल्या घरातसुद्धा बनवू शकतो. काजू कतली ही थंडीच्या दिवसांमध्ये 15 दिवस खराब होत नाही. तर उन्हाळ्यात 7 ते 10 दिवस खराब होत नाही.
- Kaju Katli Marathi Recipe एवढी महाग का आहे ?
काजू कतली ही एक प्रीमियम कॅटेगरीची मिठाई आहे. यासोबतच काजू कतलीची किंमतही जास्त आहे. याचं कारण काजू कतली ही काजूपासून बनते त्यामुळे जर काजूच महाग आहेत तर काजू कतलीसुध्दा महागच असणार.
- काजू कतली फ्रीजमध्ये ठेवली पाहिजे का ?
काजू कतली जास्त काळ टिकवायची असेल तर आपण हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. यामुळे काजू कतलीची शेल्फ लाईफ वाढते. काजू कतली बाहेरच्या वातावरणात 1-2 आठवडे टिकू शकते तर फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात 1 महिनादेखील टिकू शकते.
- जास्त काजू खाण्याचे काय नुकसान आहेत ?
काजू आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला आहे. काजूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे आपलं पचन चांगलं होतं. पण जास्त प्रमाणात काजू खाल्ले तर पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात. पोट फुगणं, गॅस आणि जुलाबसारखे त्रास होऊ शकतात.
आपण अगदी मार्केटसारखी Kaju Katli Marathi Recipe घरच्याघरी बनवली आहे. ही काजू कतली तुमच्या कुटुंबातील सर्वजण खूप आनंदाने मनभरून खातील आणि तुमचं खूप कौतुकदेखील करतील. काजू कतलीची ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल.
दिवाळीसाठी अशाप्रकारे आपण घरच्याघरीच Kaju Katli Marathi Recipe बनवू शकतो आणि खाण्याचा मनसोक्त आनंदसुद्धा घेऊ शकतो. तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून पहा आणि घरातील सर्वांना ही टेस्टी काजू कतली मनभरून खाऊ घाला.
तुम्हाला ही Kaju Katli Marathi Recipe आवडली का नक्कीच सांगा. अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.