Jui Gadkari Fake Account जुई गडकरी ही मराठी मालिकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ती अभिनेत्री तर खास आहेच पण माणूस म्हणूनही खूपच निर्मळ मनाची आहे.
जुई गडकरी सोशल मीडियावरही खूपच लोकप्रिय आहे. तिचे लाखों फॉलोअर्सदेखील आहेत. ती नेहमी आपल्या पर्सनल लाईफबद्दल आणि कामाबद्दलचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.
Jui Gadkari Fake Account
मागील अनेक वर्षांपासून जुई अभिनयक्षेत्रात काम करते त्यामुळे फॅन्सनी तिचे अनेक फॅनपेज बनवलेत.
काही दिवसांपूर्वी जुईला सोशल मीडियावर वाईट अनुभव आला होता. तिला इंस्टाग्रामवर एका तरुणीकडून धमकीचा मेसेज आला होता तेव्हा तिने संतप्त होऊन इंस्टाग्राम स्टोरीला स्क्रीनशॉट शेअर करत याबद्दल सर्वांना माहिती दिली होती.
आतासुद्धा जुईने इंस्टाग्राम स्टोरीला एक स्क्रीनशॉट शेअर करत धक्कादायक माहिती शेअर केली आहे. जुईने दिलेल्या माहितीनुसार, जुई गडकरीच्या नावाने एका युजरने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट (Jui Gadkari Fake Account) बनवलं आहे आणि तो जुईच्या फॅन्सशी तिच्या नावाने चॅटिंग करत त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती समोर आलीय.
जुई गडकरीचं सोशल मीडियावर बनावट अकाऊंट
जुईने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला या बनावट अकाउंटचा स्क्रीनशॉट शेअर केलाय आणि त्यावर लिहलंय की, फॅनपेज बनवणं चांगली गोष्ट आहे पण माझ्या नावाचं बनावट अकाउंट बनवून दुसऱ्या फॅन्सशी जुई गडकरी बनून चॅटिंग करणं खूप वाईट गोष्ट आहे. मित्रांनो (Jui Gadkari Fake Account) @juigadkariofficial हे खोटं अकाउंट आहे जे मी असल्याचं म्हणून फसवतंय. मित्रांनो या अकाउंटला उत्तर देऊ नका. कृपया या अकाउंटला रिपोर्ट करा.
जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का ?
माझं एकमेव खरं अकाउंट हे ब्ल्यूटिक व्हेरिफाईड आहे. माझं युजरनेम @juigadkariofficial आहे.
जुईने शेअर केलेल्या या इंस्टाग्राम स्टोरीमुळे फॅन्स सतर्क झाले आहेत आणि भविष्यात त्यांच्यासोबत होणाऱ्या फसवणुकीपासून ते नक्कीच वाचतील यात शंका नाही. जुईने आपल्या फॅन्सच्या बचावासाठी हे पाऊल उचललं आहे त्यामुळे सगळेजण तिचं खूप कौतुक करताय.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !