Jharkhand School Chhatra Cycle Yojana | झारखंड स्कूल छात्र सायकल योजना

Jharkhand School Chhatra Cycle Yojana

Jharkhand School Chhatra Cycle Yojana

Jharkhand School Chhatra Cycle Yojana 90 च्या दशकात आणि 2000 च्या दशकात सर्व शाळेत जाणारी मुलं आणि मुली आपल्या घरापासून शाळेपर्यंत सायकलवरचं प्रवास करायचे. सायकलवर शाळेत जाण्यात एक वेगळीचं मजा होती. परंतु आताची मुलं ही स्कूल बसमध्ये स्कूलमध्ये जातात किंवा त्यांचे आई वडील त्यांना गाडीवर शाळेत सोडतात. अनेक मोठी मुलं मुली तर स्वतःच्या गाडीने टू व्हीलरने शाळेत जाताना दिसतात.

परंतु ही गोष्ट झाली महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये. परंतु आपल्या देशात अशी काही राज्य आहेत, असे काही एरिया आहेत, जेथे अजूनही खूप गरीबी आहे. जेथे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाण्यासाठी दहा बारा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. अनेकदा त्यांच्या गावांमध्ये सरकारी बसची सोय नसते. ही मुलं ज्या सरकारी शाळांमध्ये जातात, त्या शाळांकडूनही त्यांना ने आण करण्याची सुविधा पुरवली जात नाही.

घरी गरीबीची परिस्थिती असल्यामुळे घरी एखादं वाहन तर सोडा, परंतु सायकल ही नसते. ज्याने ही मुलं शाळेत जाऊ शकतील. त्यामुळे अनेक मुलं मध्यात शाळा सोडून देतात. आपलं शिक्षण पूर्ण करत नाही. मुलींना या परिस्थितीचं जास्त नुकसान होतं. म्हणूनचं आता झारखंड सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, या योजनेचे नाव आहे झारखंड स्कूल छात्र सायकल योजना (Jharkhand School Chhatra Cycle Yojana).

मग ही झारखंड स्कूल छात्र सायकल योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेचे फायदे काय आहेत ? या योजनेत कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल ? या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? या योजनेत अर्ज कसा करायचा ? आज आपण याबद्दलचं जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया .

झारखंड स्कूल छात्र सायकल योजना

2023 मध्ये झारखंड सरकारने या Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजनेला सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील 9 लाख विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येईल.

जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांच्या बँक अकाउंटवर 4500 रुपये डीबीटीद्वारे पाठवण्यात येतील आणि मग ते या पैशातून सायकलची खरेदी करू शकतील.

झारखंड स्कूल छात्र सायकल योजनेची वैशिष्ट्ये

ही Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजना खूपचं वैशिष्ट्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण आहे. आपण या योजनेच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

1) विद्यार्थ्यांची शाळेतील गळती रोखण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात झारखंड सरकारने केली आहे.

2) या योजनेअंतर्गत झारखंड राज्यामध्ये जे विद्यार्थी सरकारी शाळेत शिकतात आणि त्यांनी आठवीची परीक्षा पास केली आहे. त्यांना ही मोफत सायकल देण्यात येईल.

3) या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्यांक वर्गातील विद्यार्थ्यांना दिला जाईल.

4) राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेने आपल्या शाळेतील आठवी पास झालेल्या आणि या वर्गाशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांची यादी सरकारला पाठवायची आहे. या यादीमध्ये विद्यार्थ्यांशी निगडित सर्व माहिती लिहिलेली असेल. जसं की, त्यांचं बँक अकाउंट आणि मग सरकार या विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटवर डीबीटी द्वारे 4500 रुपयांची रक्कम पाठवेल. या पैशांचा उपयोग त्यांना सायकल घेण्यासाठी होईल.

5) सरकारने ही Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजना सुरू करण्यामागे अनेक उद्दिष्ट ठेवली आहेत. जसं की, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची तर इच्छा आहे, परंतु घरापासून शाळा लांब असल्यामुळे त्यांना शाळेपर्यंत पोहोचणे कठीण जातंय. त्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास सहजता मिळावी. ते सोप्या पद्धतीने शाळेपर्यंत पोहोचावे, शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं, अशी सरकारची योजना आहे.

झारखंड स्कूल छात्र सायकल योजनेच्या पात्रता आणि अटी

1) या Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजनेचा लाभार्थी होण्यासाठी विद्यार्थी झारखंड राज्याचा मूळनिवासी असावा.

2) लाभार्थी विद्यार्थी झारखंडमधील सरकारी शाळेत शिक्षण घेत असावा.

3) लाभार्थी विद्यार्थीने आठवीची परीक्षा पास केलेली असावी.

4) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

5) विद्यार्थ्याकडे आधार कार्ड आणि बँक अकाउंट पासबुक असणं बंधनकारक आहे.

Pradhanmantri Kusum Yojana 2024 | प्रधानमंत्री कुसुम योजना

झारखंड स्कूल छात्र सायकल योजनेची आवश्यक कागदपत्रे

या Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजनेत पात्र होण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याकडे खालील प्रमाणे कागदपत्र असणे आवश्यक आहे.

1) विद्यार्थ्यांचं आधार कार्ड

2) विद्यार्थी आठवी पास झाला आहे याचा दाखला

3) विद्यार्थी जात प्रमाणपत्र

4) विद्यार्थी पासपोर्ट साईज फोटो

5) विद्यार्थी बँक अकाउंट पासबुक

झारखंड स्कूल छात्र सायकल योजनेसाठी अर्ज कसा करायचा

या Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजनेत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही परिश्रम घेण्याची गरज नाहीये. या योजनेची संपूर्ण जबाबदारी सरकारने शाळांवर सोपवली आहे. शाळा आपल्या येथे शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची यादी सरकारला पाठवतील आणि या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर सरकारद्वारे डीबीटी मार्फत पैसे पाठवले जातील.

फ्री सायकल योजनेची गरज काय आहे

तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, आजच्या काळात सायकलची आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांसाठी फ्री सायकल योजनेची काय गरज आहे.

शहरात राहणाऱ्या लोकांना अनेक सुविधा उपलब्ध असतात. मग सायकल, रिक्षा, मोटरसायकल, गव्हर्नमेंट बसेस, टॅक्सी, स्कूल बस असे अनेक दळणवळणाचे पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतात. या पर्यायांचा वापर करून शहरातील विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकतात

परंतु आपल्या देशात अजूनही अशी अनेक ठिकाण आहेत. जेथे दळणवळणाची साधने पोहोचू शकलेली नाहीयेत. तेथे सरकारी एसटी बसही पोहोचत नाही. मग इतर दळणवळणाची साधने असणं तर दूरचं. येथे चांगले रस्तेही नाहीयेत.

परंतु अशा ठिकाणीही विद्यार्थी असतात, शाळा असतात. आपलं भविष्य चांगलं घडवण्यासाठी विद्यार्थी मेहनत करतात. शाळा शाळेतील शिक्षक सुद्धा त्यांच्यावर मेहनत घेत असतात.

अनेकदा विद्यार्थ्यांना दूरच्या वाड्या वस्तीवरून शाळेमध्ये येण्यासाठी दहा पंधरा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. परंतु घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्याकडे दळणवळणाचं कोणतंही साधन नसतं.

शाळेमध्ये येण्यासाठी त्यांना इतका मोठा प्रवास पायी करावा लागतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी मध्येचं शाळा सोडून देतात. त्यांची शिकण्याची इच्छा असते, परंतु शाळा जवळ नसल्यामुळे, दळणवळणाची साधने नसल्यामुळे, त्यांना हा कठोर निर्णय घ्यावा लागतो आणि त्यांची स्वप्न विसरून जावी लागतात.

हे खूप चुकीचं आहे. शिक्षण घेणं हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि फक्त शाळा लांब असल्याने कोणालाही शिक्षण न मिळणं कोणत्याही देशासाठी, कोणत्याही सरकारसाठी खूप दुःखद आहे.

अशा विद्यार्थ्यांच्या घराजवळचं शाळा उपलब्ध करून देणे किंवा त्यांना दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. या विचारानेचं झारखंड सरकारने झारखंड स्कूल छात्र सायकल योजनेची (Jharkhand School Chhatra Cycle Yojana) सुरुवात केली आहे.

सरकारने राज्यातील नऊ लाख विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्याचा ठरवलंय. या सायकल मिळाल्यानंतर अनेक विद्यार्थी जे इच्छा असतानाही शाळेपासून दूर जात होते. त्यांच्या जवळ आता शाळा पोहोचणार आहे आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा मिळेल.

फक्त झारखंड नाही, तर देशातील इतर राज्यांनी सुद्धा या Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजनेचा आदर्श घ्यायला हवा. फक्त सायकलचं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी इतर दळणवळणाच्या सोयीही उपलब्ध झाल्या पाहिजेत. याचा विचार नक्कीचं करायला हवा. कारण शिक्षण घेण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, ते सोडवणं हे सरकारचं कर्तव्य असतं.

FAQ’s About Jharkhand School Chhatra Cycle Yojana

1) प्रश्न : Jharkhand School Chhatra Cycle Yojana कधी सुरू करण्यात आली ?

उत्तर : ही योजना झारखंड सरकारने 2023 मध्ये सुरू केली आहे.

2) प्रश्न : झारखंड स्कूल छात्र सायकल योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

उत्तर : या योजनेअंतर्गत झारखंड सरकार राज्यातील नऊ लाख विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणं सोईस्कर होईल आणि शाळेतून होणारी विद्यार्थ्यांची गळती ही थांबेल.

3) प्रश्न : झारखंड स्कूल छात्र योजनेत विद्यार्थ्यांना सायकल कशी देण्यात येईल ?

उत्तर : या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटवर डीबीटी मार्फत 4500 रुपयेची मदत केली जाईल. या पैशातूनचं विद्यार्थी नवीन सायकल खरेदी करू शकतात.

4) प्रश्न : झारखंड स्कूल छात्र योजनेत सर्वचं विद्यार्थ्यांना सायकल मिळणार आहे का ?

उत्तर : नाही, या Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजनेअंतर्गत सर्वच विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळणार नाहीये. झारखंड राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या आठवी पास झालेल्या अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना या सायकल योजनेचा लाभ मिळेल.

5) प्रश्न : झारखंड स्कूल छात्र योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

उत्तर : या योजनेत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची गरज नाहीये. शाळा आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थ्यांची यादी सरकारला पाठवतील आणि मग विद्यार्थ्यांना सायकलचे पैसे मिळतील.

झारखंड सरकारने खरंच एक खूप उल्लेखनीय आणि कौतुकास्पद योजना सुरू केली आहे. या Jharkhand School Chhatra Cycle Yojana योजनेचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल यात शंका नाही. या योजनेचा आदर्श घेऊन देशातील इतर राज्यांनीही विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी अशा योजना सुरू करायला हव्यात यात शंका नाही.

तुमच्या मनात झारखंड स्कूल छात्र सायकल योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि सरकारी योजनांबद्दल अशाच माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top