Jharkhand Antarjatiy Vivah Yojana | झारखंड आंतरजातीय विवाह योजना

Jharkhand Antarjatiy Vivah Yojana

Jharkhand Antarjatiy Vivah Yojana

Jharkhand Antarjatiy Vivah Yojana सध्या आपल्या देशामध्ये आंतरजातीय विवाहांचं प्रमाण वाढलंय. आपल्या देशात प्राचीन काळापासून एका समाजातील किंवा जातीतील मुला-मुलींचीचं लग्न एकमेकांबरोबर होत असतात. जर एका समाजातील मुलाने किंवा मुलीने दुसऱ्या समाजातील मुलगा किंवा मुलीशी लग्न केलं, तर त्या लग्नाला आंतरजातीय विवाह असं संबोधलं जातं.

आज आपण 21 व्या शतकात जगतोय, तरीसुद्धा आंतरजातीय विवाहांना मोठ्या प्रमाणात मान्यता दिली जात नाही. परंतु केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकार यांच्या मते आंतरजातीय विवाह झाल्यामुळे देशातील सामाजिक सलोखा वाढेल. सर्वांमध्ये समानतेची भावना येईल. कुणीही छोटं किंवा मोठं राहणार नाही. त्यामुळे सरकार आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतं. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याना आर्थिक मदत करतं.

आज आपण अशाचं एका आंतरजातीय विवाह योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ही योजना आहे झारखंड सरकारने सुरू केलेली झारखंड आंतरजातीय विवाह योजना (Jharkhand Antarjatiy Vivah Yojana). मग ही योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेचे लाभ काय आहेत ? या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया.

झारखंड आंतरजातीय विवाह योजनेची उद्दिष्टे

समाजात आंतरजातीय विवाह झालीत, लग्न झाली, तर समाजात उच्च आणि निच्च हा भेद संपुष्टात येईल. समाजात सलोखा निर्माण होईल. सगळे समान असतील. या विचारानेचं झारखंड सरकारने झारखंड आंतरजातीय विवाह योजना सुरू केली आहे. या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक मदत देणं, त्यांच्या नवीन संसारात कोणतीही आर्थिक अडचण सतावू नये आणि त्यांचा संसार सुखी व्हावा, हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे.

झारखंड आंतरजातीय विवाह योजनेसाठी पात्रता आणि अटी

या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेचा लाभार्थी होण्यासाठी झारखंड सरकारने काही पात्रता आणि अटी आखून दिल्या आहेत, आपण त्या पाहुयात.

1) आंतरजातीय विवाह केलेलं जोडपं झारखंड राज्याचं मूळ निवासी असावं.

2) या जोडप्यापैकी पती किंवा पत्नी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांपैकी असावं आणि दुसरी व्यक्ती इतर समाजाशी संबंधित असावी.

3) आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याने कायदेशीर पद्धतीने विवाहाची नोंदणी केलेली असावी. त्या संबंधित कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे.

4) जर या जोडप्यापैकी कोणाचंही हे दुसरं लग्न असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

5) या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी या जोडप्याचं बँकेमध्ये जॉईंट अकाउंट असायला हवं.

6) या जोडप्याला जर आधीचं केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत फायदा मिळालेला असेल, तर ते योजनेसाठी पात्र ठरत नाही.

झारखंड आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला काय फायदा मिळतो ? तर या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला झारखंड सरकारतर्फे 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

झारखंड आंतरजातीय विवाह योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेत अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.

1) विवाह प्रमाणपत्र

2) जिल्हा मॅजिस्ट्रेटने दिलेलं चरित्र प्रमाणपत्र

3) लग्न झालेल्या जोडप्याचं जॉईंट बँक अकाउंट पासबुक

4) लग्न झालेल्या जोडप्याचं जाती प्रमाणपत्र

5) जोडप्याचा जन्माचा दाखला

6) जोडप्याचा रहिवासी दाखला

7) लग्न झालेल्या जोडप्याचा एकत्र फोटो

झारखंड आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज कसा करायचा

आंतरजातीय विवाह झालेल्या जोडप्याने जिल्हा मॅजिस्ट्रेटच्या ऑफिसमध्ये संबंधित फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे जोडून या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अर्ज करायचा असतो. अर्ज केल्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत या अर्जाची पडताळणी होते आणि मग लाभार्थींना सरकारी मदत दिली जाते.

झारखंड आंतरजातीय विवाह योजनेचे महत्त्व

झारखंड सरकारने सुरू केलेली ही Jharkhand Antarjatiy Vivah Yojana खूपचं महत्त्वपूर्ण आहे. आपल्या देशात मागील हजारो वर्षांपासून जातीय समाजव्यवस्था आहे. समाज हा विविध धर्म आणि जातींमध्ये विभागला गेला आहे. आणि लग्न एका समाजातील जातींमधील मुला-मुलींमध्ये होतात.

जर एका समाजातील मुलाने किंवा मुलीने दुसऱ्या समाजातील मुलगा किंवा मुलीशी लग्न केलं, तर त्या लग्नाला आंतरजातीय विवाह म्हटलं जातं आणि अजूनही अनेक लोकांचा या आंतरजातीय विवाहाला सक्त विरोध असतो. ही लोक या विवाहांना मान्यता देत नाही. अनेक वेळेस आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांशी त्यांचे कुटुंबीय संबंध तोडून टाकतात. त्यांना कुणीही नातेवाईक राहत नाही. कुणी त्यांच्याशी बोलत नाही. त्यांना कोणती मदत करत नाही.

मग अशा वेळेस आंतरजातीय लग्न केलेलं जोडपं हे खूप एकटं पडतं. नवीन लग्न झाल्यावर या जोडप्याला आधाराची गरज असते. आर्थिक मदतीची गरज असते. कारण नवीन संसार सुरू करणं, हे काही सोपं काम नाहीये.

एखादी मोठी कंपनी सुरू करावी, तसं नवीन संसार करणं हे अवघड असतं. डोक्यावरच्या छतापासून ते घरातील छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत सगळ्या वस्तूंची जमवाजमव करावी लागते आणि याकरिता लागतात पैसे. परंतु या आंतरजातीय विवाह झालेल्या जोडप्याशी तर त्यांच्या कुटुंबाने संबंध तोडून टाकलेले असतात. अशा वेळेस या जोडप्यांना आपण हे लग्न का केलं ? असा पस्तावा होतो. या जोडप्याचा नवीन संसार आनंदात सुरू होण्याऐवजी, दुःखात सुरू होतो आणि त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं.

या सर्व गोष्टींचा विचार करूनचं झारखंड सरकारने झारखंड आंतरजातीय विवाह योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना झारखंड सरकार तर्फे 25 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते आणि ही आर्थिक मदत त्यांचा नवी संसार सुरू करण्यासाठी खूपचं उपयोगी ठरेल, यात तिळमात्र ही शंका नाही.

Shetmal Taran Karja Yojana 2024 | शेतमाल तारण कर्ज योजना

त्याचबरोबर राज्य सरकारद्वारे आपल्या लग्नाला मान्यता मिळाली आहे. ही भावना त्यांच्या मनात दृढ होते आणि संसार सुरू केल्यानंतर ज्या काही अडचणी येतील, त्या अडचणींना सामोरे जाण्याची त्यांच्यात हिम्मत येते.

फक्त झारखंड राज्य सरकारचं नाही, तर देशामध्ये केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकार यांनी सुद्धा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा योजना राबवल्या आहेत. जर एखाद्या जोडप्याने केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेचा लाभ घेता येत नाही.

पण एकूणचं राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार यांनी सुरू केलेल्या या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना Jharkhand Antarjatiy Vivah Yojana खूपचं वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. या योजनांना खूप सामाजिक महत्त्व आहे आणि अशा योजना नक्कीचं सुरू केल्या गेल्या पाहिजेत.

अशा योजना सुरू करण्यामागे सरकारचं हे उद्दिष्ट असतं की, सामाजिक एकता वाढावी. सामाजिक सलोखा वाढावा. समाजामध्ये उच्च आणि नीच हा भेदभाव संपून जावा. हे उद्दिष्ट खूप उत्तम आहे.

FAQ’s About Jharkhand Antarjatiy Vivah Yojana आंतरजातीय विवाह योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : झारखंड आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?

उत्तर : या योजनेअंतर्गत ज्या जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे आणि ते झारखंड राज्याचे मूळनिवासी आहेत, त्या जोडप्यांनाचं या योजनेचा लाभ दिला जातो. या जोडप्यातील एक व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीतील असायला हवी आणि दुसरी व्यक्ती इतर समाजातून असायला हवी.

2) प्रश्न : झारखंड आंतरजातीय विवाह योजनेत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना किती रुपयांचा लाभ मिळतो ?

उत्तर : या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना झरखा6 सरकारतर्फे 25 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

3) प्रश्न : झारखंड आंतरजातीय विवाह योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

उत्तर : या योजनेत अर्ज करण्यासाठी आंतरजातीय विवाह झालेल्या जोडप्याने लग्नाचं प्रमाणपत्र, जातीय प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जन्माचा दाखला, अशी कागदपत्र जमा करणे आवश्यक आहे.

4) प्रश्न : झारखंड आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत जोडप्याला पैसे कसे दिले जातात ?

उत्तर : या Jharkhand Antarjatiy Vivah Yojana योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याच्या जॉईट बँक अकाउंटवर झारखंड सरकार तर्फे 25 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

5) झारखंड आंतरजातीय विवाह योजनेचा फायदा घेतलेलं जोडपं इतर योजनांचा लाभ घेऊ शकतं का ?

उत्तर : नाही, जर आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याने झारखंड सरकारच्या योजनेचा लाभ घेतला असेल, तर ते इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

झारखंड सरकारने सुरू केलेली ही Jharkhand Antarjatiy Vivah Yojana खूपचं कौतुकास्पद आहे, यात तीळमात्र ही शंका नाही. झारखंड सरकारच्या या योजनेचा आदर्श घेऊन देशातील इतर राज्यांनी सुद्धा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी अशी योजना सुरू करायला हवी. यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळेल आणि लग्न केल्यानंतर त्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, संसार सुरू करण्यासाठी त्यांना ज्या आर्थिक अडचणी येतात, त्या नक्कीचं दूर होतील, यात शंका नाही.

राज्य सरकार प्रमाणे केंद्र सरकारची सुद्धा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी एक योजना आहे. या योजनेतही आर्थिक लाभ दिला जातो. आंतरजातीय विवाह केलेले जोडपे या योजनेचा ही लाभ घेऊ शकतात.

तुमच्या मनात झारखंड आंतरजातीय विवाह योजनेबद्दल Jharkhand Antarjatiy Vivah Yojana आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं नवीन नवीन योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top