Jennifer Mestry Sister Death : तारक मेहता फेम रोशनच्या बहिणीचं दुःखद निधन

Jennifer Mestry Sister Death

Jennifer Mestry Sister Death तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमाबद्दल एक खूपचं दुःखद बातमी समोर येत आहे. या मालिकेत रोशन कोर सोढीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिच्या लहान बहिणीचं दुःखद निधन झालंय.

जेनिफरने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. तिने आपली बहीण डिंपलचा मृत्यू 13 एप्रिलला झाल्याचं सांगितलंय. डिंपलने आयुष्यात नेहमी आनंदी राहायचं आम्हाला शिकवलं. तिच्याशिवाय आता आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. तिच्याशिवाय आता पुढचं आयुष्य जगणं खूपच अवघड आहे, अशा शब्दात तिने आपल्या बहिणीला श्रद्धांजली वाहिली आहे.

Jennifer Mestry Sister Death

काही दिवसांपूर्वीचं जेनिफरने एका वृत्तपत्राला मुलाखत देत तिच्या आयुष्यात किती अडचणी आहेत, याबद्दल सांगितलं होतं. जेनिफर म्हणाली होती, मागील दीड वर्ष माझ्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी खूप खडतर आहेत. काही महिन्यांपूर्वीचं माझ्या लहान भावाचा मृत्यू झाला आहे आणि आता माझी बहीण सुद्धा खूप आजारी असते. ती लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहे.

झपाटलेला 3 तात्या विंचू परतणार

Jennifer Mestry Sister Death आता त्याच बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जेनिफर मागील अनेक वर्षांपासून तिच्या माहेरी असलेल्या सात मुलींची काळजी घेते. त्यांचं पालन पोषण करते. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम करत असताना तिला पैशांची कोणतीही अडचण नव्हती. परंतु जवळपास दीड वर्षांपूर्वी मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याबरोबर तिचा वाद झाल्याने तिने या मालिकेला सोडचिठ्ठी दिली

मालिका सोडताना जेनिफरचा मालिकेच्या निर्मात्यांशी वाद झाले होते. तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रारही केली. त्यामुळे तिचे पैसे दिले गेले नव्हते. तिने कोर्ट केस केल्यानंतर या केसचा निकाल तिच्या बाजूने लागला आणि निर्मात्यांना पाच लाख रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला. परंतु हेही पैसे तिला अजून भेटले नसल्याचं तिने सांगितलं होतं.

जेनिफरने मालिका सोडल्यानंतर मोनाज मेवावाला या अभिनेत्रीने तिची जागा घेतली आहे. परंतु जवळपास मागील तेरा वर्ष जेनिफरने जी रोशनची भूमिका साकारली होती, प्रेक्षक आजही तिची आठवण काढतात. रोशन कोर सोडी म्हणून प्रेक्षकांच्या मनात जेनिफरचं स्थान अढळ राहील, यात शंका नाही.

आपणही जेनिफरच्या बहिणीला श्रद्धांजली वाहूया Jennifer Mestry Sister Death आणि मनोरंजन विश्वाशी निगडित बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top