Jan Dhan Yojana
Jan Dhan Yojana मागील काही वर्षात आपल्या देशात जर एखाद्या योजनेची सर्वात जास्त चर्चा करण्यात आली असेल, तर ती म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. सुरुवातीला या योजनेबद्दल खूप शंका कुशंका काढण्यात आल्या.
परंतु आज नऊ वर्षानंतर जर मागे वळून पाहिलं, तर प्रधानमंत्री जनधन योजना ही मागील काही दशकातील कोणत्याही सरकारद्वारे राबवली जाणारी सर्वात यशस्वी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेने एखाद्या पायासारखं म्हणजेचं फाउंडेशनसारखं काम केलं आणि त्या फाउंडेशनवर अवलंबून सरकारने मागील काही वर्षात अनेक योजना राबवल्या.
प्रधानमंत्री जनधन योजना (Jan Dhan Yojana) एक गेमचेंजर योजना आहे. मग ही योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेतून भारतीय लोकांना काय फायदा झाला ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली ?
15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणातून प्रधानमंत्री जनधन योजनेची (Jan Dhan Yojana) घोषणा केली होती.
त्यानंतर 28 ऑगस्ट 2014 ला या योजनेची सुरुवात करण्यात आली.
प्रधानमंत्री जनधन योजना नेमकी काय आहे ?
या Jan Dhan Yojana योजनेअंतर्गत भारतातील ज्या व्यक्तींची अजूनही बँकेमध्ये खाते नाहीयेत, त्यांची खाती उघडण्यात आली. 2014 पर्यंत असे अनेक भारतीय होते, ज्यांचं बँकेमध्ये अकाउंट नव्हतं. त्यामुळे एक विशिष्ट उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून भारत सरकार ने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली होती. बँकेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या भारतीय नागरिकांना या योजनेने मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं.
28 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री जनधन योजना (Jan Dhan Yojana) लॉन्च करण्यात आली आणि पहिल्या दिवशी 1 कोटी 50 लाख लोकांची अकाउंट बँकेमध्ये उघडण्यात आली.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हा एक विक्रम म्हणून प्रस्थापित झाला आहे की, एकाचं दिवशी दीड कोटींपेक्षा जास्त लोकांचं बँक अकाउंट उघडण्यात आलं.
आज नऊ वर्षानंतर जवळपास 50 कोटी लोकांचे बँक अकाउंट प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आले आहेत.
Jan Dhan Yojana प्रधानमंत्री जनधन योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
आपल्या सर्वांना माहिती आहे की, बँकेत अकाउंट उघडायचं असेल तर काही ठराविक रक्कम भरावी लागते. त्याचबरोबर बँकांनी आता मिनिमम अकाऊंट बॅलन्स हा नियम सुद्धा आणलाय. महिनाभरात तुमच्या अकाउंटवर काही हजार रुपयांचा बॅलन्स मेंटेन असायला हवा. नाहीतर त्या बदल्यात तुम्हाला दंड भरावा लागतो.
परंतु (Jan Dhan Yojana) प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जी बँक खाती उघडली गेली, ती झिरो बॅलन्स खाती आहेत. या खात्यांमध्ये सुरुवातीला कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाहीये, त्याचबरोबर मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठेवण्याचीही गरज नाहीये.
प्रधानमंत्री जनधन योजनेचे फायदे
प्रधानमंत्री जनधन योजनेचे (Jan Dhan Yojana) फायदे खालीलप्रमाणे आहेत.
1) या योजनेअंतर्गत भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीचं झिरो बँक बॅलन्स अकाउंट उघडलं जातं
2) प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बँक अकाउंटला मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठेवण्याची कोणतीही अट नाहीये.
3) या Jan Dhan Yojana योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीही दिली जाते.
हेही वाचा : PM Awas Yojana 2024 | प्रधानमंत्री आवास योजना माहिती
4) ज्या व्यक्तीचं प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक अकाउंट आहे, त्यांना एटीएम किंवा डेबिट कार्ड म्हणून रूपे हे डेबिट कार्ड दिलं जातं.
5) 2018 आधी उघडलेल्या जनधन अकाउंटला जे डेबिट कार्ड दिले गेले, त्यामध्ये एक लाख रुपयांचा अपघात विमा आहे.
6) 2018 नंतर जे जनधन (Jan Dhan Yojana) अकाउंट उघडले गेले, त्यामध्ये जे डेबिट कार्ड मिळतं, त्याद्वारे तुम्हाला दोन लाख रुपयांचा अपघात विमा निशुल्क मिळतो.
प्रधानमंत्री जनधन योजनेचे अकाउंट कसे उघडायचं ?
Jan Dhan Yojana प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक अकाउंट उघडणं खूपचं सोप्प आहे. तुम्ही तुमच्या नजीकच्या कोणत्याही सरकारी बँकेमध्ये हे अकाउंट उघडण्यासाठी फॉर्म भरू शकता.
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या कमतरता काय आहेत ?
प्रधानमंत्री जनधन योजनेचे जसे लाभ आहेत की, तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट उघडू शकता आणि मिनिमम अकाऊंट बॅलन्सची कोणतीही अट नाहीये. तसंच या योजनेत काही कमतरताही आहेत. जसं की या अकाउंटवर तुम्ही एका महिन्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्तचे ट्रांजेक्शन म्हणजेचं व्यवहार करू शकत नाही.
त्याचबरोबर या जनधन अकाउंटवर तुम्ही एकाचं वेळेस 50 हजार रुपये रक्कम ठेवू शकत नाही.
प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
या Jan Dhan Yojana योजनेअंतर्गत जर तुम्हाला बँक अकाउंट उघडायचं असेल, तर तुमच्याकडे खालीलप्रमाणे कागदपत्र असायला हवेत.
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) रहिवासी दाखला
4) पासपोर्ट साईज फोटो
5) मोबाईल नंबर
प्रधानमंत्री जनधन योजना गेम चेंजर कशी ठरली
ही Jan Dhan Yojana जेव्हा सुरू केली गेली होती, तेव्हा या योजनेचं सगळ्यात मोठ वैशिष्ट्य होतं की, समाजातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं बँकेत झिरो बॅलन्स अकाउंट उघडून देणे.
तेव्हा या निर्णयावर अशी टीका करण्यात आली की, जर झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यात येईल आणि अशा लोकांकडे या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी पैसे नसतील, तर हा बँकिंग व्यवस्थेवर एक मोठा बोजा असेल. हे अकाउंट मेंटेन करण्यासाठी बँकांना त्यांचं मनुष्यबळ आणि आर्थिक पाठबळ खर्च करावा लागेल आणि हा एक तोट्याचा व्यवहार असेल.
पण जेव्हा ही Jan Dhan Yojana राबवण्यात आली आणि या योजनेअंतर्गत लाखो करोडो जनधन अकाउंट उघडण्यात आले, तेव्हा असं दिसून आलं की, ज्या गरीब लोकांची बँकेत जनधन अकाउंट उघडण्यात आली आहेत, त्यांनी हजारो कोटी रुपये या अकाउंटमध्ये जमा केले. ज्याचा बँकिंग व्यवस्थेला खूप मोठा फायदा झाला.
त्याचबरोबर प्रधानमंत्री जनधन योजनाने फाउंडेशनचं काम केलं, ज्यावर आधारित सरकारने पुढे अनेक नवीन नवीन योजना राबवल्या.
जसं की, आपल्या देशात सरकार ज्या योजना राबवतं, त्या गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं राबवल्या जातात. मग या लोकांना पेन्शन देण असो किंवा सबसिडी देणं असो. या सगळ्या गोष्टी आता या व्यक्तींचे बँक अकाउंट असल्यामुळे त्यांच्या अकाउंटवरच त्यांचे पेंशन किंवा सबसिडीचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे अकाउंटवर जमा केले जाऊ लागले. ज्यामुळे भ्रष्टाचाराला मोठा आळा बसला.
जसं की याआधी, आपल्या देशात गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जायची. परंतु ही सबसिडी लोकांपर्यंत न पोहोचता भ्रष्टाचाराला बळी पडायची.
परंतु सरकारने जनधन बँक अकाउंट उघडल्यानंतर ही सबसिडी डायरेक्ट त्या लोकांच्या अकाउंटवर जमा करायला सुरुवात केली. ज्याचा फायदा भ्रष्टाचार रोखण्यात झाला.
त्याचबरोबर वृद्ध महिला पुरुष असो किंवा विधवा महिला यांना जी पेन्शन दिली जाते किंवा इतर अनेकही योजना, मग त्या शेतकऱ्यांसाठी योजना असो, त्या योजनांचे पैसेही त्या त्या लाभार्थी व्यक्तीच्या अकाउंटवर डीबीटी द्वारे पाठवले जाऊ लागले. ज्यामुळे लाभार्थी व्यक्तींना आपल्या पैशांवर हक्क सांगता येतो. त्यांच्याबरोबर कोणतीही फसवणूक केली जात नाही आणि भ्रष्टाचारालाही आळा बसतो.
प्रधानमंत्री जनधन योजनेचे फायदे
भारतातील सामान्य जनतेला प्रधानमंत्री जनधन योजनेचे (Jan Dhan Yojana) मोठ्या प्रमाणात फायदे झाले.
1) जे गरीब आणि सामान्य भारतीय बँकिंग व्यवस्थेतून दूर होते, ते या योजनेद्वारे बँकिंग व्यवस्थेत आले. त्यांचं बँक अकाउंट सुरू झालं.
2) बँक अकाउंट उघडल्यानंतर अनेक लोकांनी त्यांची रोजची कमाई बँकेत जमा करायला सुरुवात केली. ज्यामुळे खर्चांवर आळा बसला आणि त्यांना बचत करण्याची सवय लागली.
3) प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यांना सरकारने पुढे मुद्रा योजनेशी जोडलं. त्यामुळे ज्या लोकांना स्वतःचा नवीन व्यवसाय करायचा आहे, त्यांना कर्ज देण्यासही मदत झाली.
4) ज्या लोकांना सरकारच्या इतर योजनांचा फायदा मिळतो, सबसिडी किंवा आर्थिक मदत मिळते. ती आर्थिक सबसिडी किंवा मदतसुद्धा जनधन अकाउंटमध्ये जमा करण्यात आली.
5) उदाहरणार्थ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवतं. जनधन योजनेअंतर्गत अनेक भारतीयांची अकाउंट बँकेमध्ये उघडल्यामुळे ही मदत लाभार्थ्यांच्या अकाउंटवर पाठवणं खूप सोपं झालं.
6) अशी अनेक उदाहरणं आहेत. जसे की महाराष्ट्र सरकारची वयोश्री योजना, लेक लाडकी योजना, सिलेंडरवर सबसिडी दिली जाणारी योजना, उज्वला योजना, या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटी म्हणजेच डायरेक्ट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवले जातात आणि त्यासाठी त्यांचे जनधन योजनेअंतर्गत उघडलेले बँक अकाउंट खूप उपयोगी पडले.
FAQ About Jan Dhan Yojana प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक अकाउंट उघडण्यासाठी किती पैसे लागतात ?
उत्तर : या Jan Dhan Yojana बँक अकाउंट उघडण्यासाठी पैसे लागत नाही. झिरो बॅलन्स अकाउंट उघडले जातात.
2) प्रश्न : या Jan Dhan Yojana उघडलेल्या बँक अकाउंटवर मिनिमम बॅलन्स अमाऊंट ठेवावी लागते का ?
उत्तर : नाही, या योजनेअंतर्गत उघडलेल्या बँक अकाउंटला अशी कोणतीही अट नाही.
3) प्रश्न : प्रधानमंत्री जनधन अकाउंटला एटीएम किंवा डेबिट कार्ड दिले जाते का ?
उत्तर : हो, या योजनेअंतर्गत उघडलेल्या बँक अकाउंटवर रूपे डेबिट कार्ड दिले जाते.
4) प्रश्न : प्रधानमंत्री जनधन योजनेवर दुर्घटना विमाही दिला जातो का ?
उत्तर : हो, या योजनेअंतर्गत उघडल्या जाणाऱ्या बँक अकाउंटवर जे रूपे डेबिट कार्ड दिले जातं, त्यावर दोन लाख रुपयांचा अपघात विमा असतो.
एकूणचं Jan Dhan Yojana प्रधानमंत्री जनधन योजना खूपचं फायदेशीर आहे. या योजनेने समाजातील गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात जोडण्याचं काम केलंय. ज्यामुळे त्यांची आर्थिक प्रगतीही झाली.
कदाचित ही अशी एकमेव योजना असेल, ज्या योजनेचा फायदा सरकारला इतर अनेक योजना राबवण्यासाठीही झाला. त्याबद्दल आपण चर्चा केलीचं आहे.
तुमच्या मनात या योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंट करुन विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि अशा सरकारी योजनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
धन्यवाद !