IPL 2024 MI vs CSK : आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध चेन्नई आजच्या सामन्यात कोण जिंकणार ?

IPL 2024 MI vs CSK

IPL 2024 MI vs CSK आज 14 एप्रिल 2024 रोजी आयपीएल 2024 मधील सर्वात मोठा सामना रंगणार आहे. आयपीएलमध्ये एकमेकांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांशी भिडणार आहेत. 2024 च्या सिझनमध्ये या दोघांचा हा पहिलाचं आमना सामना असेल. मग चेन्नई बाजी मारणार की मुंबई पुन्हा एकदा बाजी पलटवणार, हे पाहणं खूपचं उत्सुकतेचं असेल.

मागच्या सीजनपेक्षा या सीजनमध्ये खूप गोष्टी बदलल्या आहेत. जसं की चेन्नई सुपर किंगचा कॅप्टन आता महेंद्रसिंग धोनी नसून मराठमोळा ऋतुराज गायकवाड आहे. तर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा नसून हार्दिक पांड्या आहे.

IPL 2024 MI vs CSK

परंतु तरीही महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दोघांवरचं या दोन्ही संघांची धुरा अवलंबून आहे. मुंबई आणि चेन्नई IPL 2024 MI vs CSK या दोघांसाठीही हे सीजन तितकसं चांगलं राहिलेलं नाहीये. सुरुवातीचे सामने जिंकल्यानंतर चेन्नईला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तर हार्दिक पांड्याच्या कॅप्टनसीखाली मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले. परंतु त्यानंतर दोन सामन्यांमध्ये त्यांना सलग विजय मिळाला आहे. आरसीबीविरुद्ध तर त्यांनी कहरच केला होता. त्यांची बॅटिंग पाहून भल्याभल्यांना घाम फुटला होता, यात शंका नाही.

पण मुंबईच्या तगड्या बॅटिंगला रोखण्यासाठी चेन्नईची तंगडी बॉलिंग लाईनअप सुद्धा सज्ज आहे. मुंबईची बॉलिंगसुद्धा कमी नाहीये आणि चेन्नईची बॅटिंगसुद्धा कमी नाहीये. म्हणजेचं हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि आजचा सामना खूपच रंजक होईल, यात शंका नाही.

आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध चेन्नई

रोहित शर्माला मागच्या सामन्यामध्ये चांगला सूर गवसला होता. तो आजच्या सामन्यात मोठी खेळी करतो की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. तर सूर्यकुमार यादवची चौफेर फटकेबाजी पाहायला सुद्धा प्रेक्षक खूपचं उत्सुक आहेत.

महेंद्रसिंग धोनीला आज तरी बॅटिंग करण्याची संधी मिळते की नाही, याबद्दलही प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. धोनीला चार-पाच चेंडू जरी खेळताना पाहिलं, तरी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील, यात शंका नाही.

भाऊ आणि बहिणीची इमोशनल मराठी कथा

मुंबई आणि चेन्नई IPL 2024 MI vs CSK या दोन्ही संघांचा सध्याचा फॉर्म पाहता मुंबई इंडियन्स हा सामना जिंकेल, वरचढ ठरेल, असंच दिसतंय. परंतु खेळामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन असतो. मागच्या कामगिरीपेक्षा त्यादिवशी कोण कशी कामगिरी करतो, त्याला जास्त महत्त्व असतं. म्हणूनचं आजचा सामना कोण जिंकेल हे सांगता येत नाही. परंतु दोन्ही टीमचे फॅन्स मात्र हा सामना आम्हीचं जिंकणार, असं छातीठोकपणे सांगताय.

तर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल, मुंबई विरुद्ध चेन्नई IPL 2024 MI vs CSK हा सामना ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top