Iphone 15 Price Drop काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, जगभरात एप्पल कंपनीच्या आयफोनचा सेल कमी झालाय. परंतु भारतात तो दुपटीने वाढलाय. याचं मुख्य कारण म्हणजे आयफोन आपल्या देशात एक स्टेटस सिम्बॉल बनलाय आणि आपल्या देशातील लोकांना मिरवायला किती आवडतं, हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणून पुढील काही वर्ष आयफोनचा सेल वाढतचं जाईल, यात शंका नाही.
Iphone 15 Price Drop
सध्या आयफोनची 15 सिरीज ही सर्वात लेटेस्ट सिरीज आहे, जी मार्केटमध्ये विकली जातेय. परंतु हे फोन खूप महाग आहेत. सर्वात स्वस्त आयफोन १५ घ्यायचा म्हटलं तरी 70000 रुपये लागतात. पण आज आम्ही तुम्हाला तुम्ही आयफोन 15 फक्त 23 हजार रुपयांमध्ये (Iphone 15 Price Drop) कसा विकत घेऊ शकता, त्याबद्दल सांगणार आहोत.
ऍपलचा हा स्मार्टफोन मिळतोय अगदी स्वस्त
भारतातील सर्वात मोठी इ कॉमर्स कंपनी ॲमेझॉन तुम्हाला आयफोन 15 फक्त 23 हजार रुपयांमध्ये विकत घेण्याची संधी देत आहे. पण ही ऑफर कशी मिळवायची, आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
ऍमेझॉनवर आयफोन 15 फक्त 23 हजार रुपयांमध्ये
सध्या ॲमेझॉनवर आयफोन 15 128 जीबी हे मॉडेल 79 हजार 900 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. परंतु ही मॅक्झिमम रिटेल प्राईस म्हणजेचं एमआरपी आहे. ॲमेझॉन सध्या या किमतीवर 12 टक्क्यांचा डिस्काउंट देतोय. ज्यामुळे फोनची किंमत 70 हजार रुपये होते.
आणि ही किंमत सर्वात जास्त कमी करणारी ऑफर म्हणजे एक्सचेंज ऑफर. जर तुमच्याकडे एखादा जुना फोन असेल, तर ॲमेझॉनच्या विविध अटी मान्य केल्यानंतर या फोनची किंमत तुम्हाला जास्तीत जास्त 44 हजार रुपये मिळू शकते.
म्हणजे तुमच्याकडे जर एखादा नवीन, चांगला फोन असेल, तर त्याला जास्तीत जास्त 44 हजार रुपयांचा एक्सचेंज रेट मिळेल. म्हणजेचं आयफोन 15 ची किंमत 26 हजार रुपयांवर येते. परंतु एवढेच नाहीये, तुम्ही या 26 हजार रुपयांवरसुद्धा आयसीआयसीआय क्रेडिट कार्डच्या ऑफरचा लाभ घेऊन 3000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळवू शकता. ज्यामुळे तुम्हाला आयफोन 15 (Iphone 15 Price Drop) फक्त 23 हजार रुपयांमध्ये मिळेल.
आयफोन 15 सिरीज वर येणारी ही आजपर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे. ज्यांना आयफोन 15 खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी तरी ही सुवर्णसंधीचं आहे.
तर तुम्ही विकत घेणार का iphone 15 ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !