Iphone 14 In Cheap Price आयुष्यात एकदा तरी आयफोन विकत घ्यायचा, आपल्या हातात आयफोन घेऊन मिरवायचा, असं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न पूर्ण करणं काही सोपी गोष्ट नाहीये. कारण आयफोन खूप प्रीमियम फोन आहे आणि या फोनच्या किमती खूप जास्त असतात. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर.
परंतु आता सर्वसामान्यांना सुद्धा आयफोन विकत घेता येतील, कारण आयफोनच्या किमतीमध्ये मोठी घट झाली आहे. एक असा सेल सुरू झाला आहे, जिथे तुम्ही आयफोन स्वस्तात खरेदी (Iphone 14 In Cheap Price) करू शकता. तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकतात. मग कोणता आहे हा सेल, आज आपण त्याबद्दलचं जाणून घेऊया.
Iphone 14 In Cheap Price
3 मे पासून फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर बिग सेविंग डे सेल सुरू होतोय आणि या सेलमध्ये आयफोन 14 आणि आयफोन 12 या दोन आयफोनच्या मॉडेलवर भरपूर सूट देण्यात आली आहे.
सर्वात आधी आपण आयफोन 14 बद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल, तर 70 हजार रुपयांच्या किमतीस लॉन्च झालेला हा फोन सध्या फ्लिपकार्टवर 54 हजार रुपयांना मिळतोय. त्याचबरोबर तुम्हाला इतर अनेक ऑफर्स मिळतात.
जसं की तुमच्याकडे सिटी बँकेचं क्रेडिट कार्ड असेल, तर दीड हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतो आणि तुम्हाला जर तुमचा जुना फोन एक्सचेंज करायचा असेल, तर त्यावरही भरगोस सूट देण्यात आली आहे.
स्वस्तात आयफोन १४ खरेदी करण्याची संधी
परंतु तुमचं बजेट जर कमी असेल, तुम्ही आयफोन 14 घेऊ शकत नसाल, तर तुमच्यासाठी आणखीन एक ऑप्शन आहे आणि तो म्हणजे आयफोन 12. मागील वर्षी ॲपल कंपनीने हा फोन दिस डिसकंटिन्यू केला होता. परंतु मार्केटमध्ये अजूनही तो मिळतोय आणि लोक खरेदी करत आहेत.
फ्लिपकार्टवर हा (Iphone 14 In Cheap Price) आयफोन 12 फक्त 40 हजार रुपयांमध्ये लिस्टेड आहे. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर 2 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतोय आणि जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करत असाल, तर तब्बल 38 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळते. आता तुम्ही कोणता फोन एक्सचेंज करताय यावर ही सूट अवलंबून आहे.
विवोचा हा स्मार्टफोन मिळतोय अगदी स्वस्त
म्हणजे एकूणचं फ्लिपकार्टचा हा सेल तुमचं आयफोन घेण्याचं स्वप्न नक्कीचं पूर्ण करू शकतो, असं वाटतंय. तर तुम्ही आयफोन विकत घेणार का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेख नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !