Inspirational Marathi Story “अगं आई उठ ना, अशी का शांत पडून राहिली आहेस ? पहा आम्ही चौघी बहिणी आलोय तुला भेटायला. नेहमी आम्ही आलो की, कशी तू आमचं स्वागत करायचीस. परत परत विचारायची, पोरींनो काही खायला करू का ? काहीतरी स्पेशल बनवू का तुमच्यासाठी आणि आता अशी का निपचित पडून राहिली आहेस ? आई उठणा गं.”
पल्लवी आपल्या आईचा हात हातात घेऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती. तिला आर्त हाक मारत होती. परंतु आता आई परत कधीचं उठणार नाही, कारण आता ती या जगात नव्हती.
Inspirational Marathi Story
पल्लवी बरोबरचं तिच्या तीन बहिणी योगिता, सीमा आणि राखीही रडत होत्या. आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण आई त्यांना कायमची सोडून निघून गेली होती.
गावची मोठी माणसं पुढे येतात आणि म्हणतात, “बस झालं पोरींनो. आता अंत्यसंस्काराची वेळ झाली आहे. सावरा स्वतःला. नका रडू.” जमलेल्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, “आता या बाईला खांदा कोण देईल ?” Inspirational Marathi Story तसं तर पार्वतीबाईला चार मुलं आणि चार मुली. परंतु आईचा मृत्यू झाल्यानंतर फक्त चार मुलीचं आल्या होत्या. पार्वतीबाईंची चार मुलं कुठेही दिसत नव्हती.
चारही मुलांची लग्न झाल्यानंतर काही काळचं ती गावात राहिली. Inspirational Marathi Story नोकरी धंद्यानिमित्त मुलं शहरात निघून गेली आणि हळूहळू त्यांनी आपल्या आईशी संपर्क तोडला.
शेवटच्या वेळेस ही चारही मुलं आईला तेव्हा भेटायला आली होती, जेव्हा आईने आपलं राहतं घर विकावं, अशी त्यांची इच्छा होती. परंतु पार्वती बाईंनी त्यांना ठणकावून सांगितलं होतं की, “जोपर्यंत मी जिवंत आहे, हे घर मी विकू देणार नाही. Inspirational Marathi Story आणि मी मेल्यानंतर सुद्धा माझ्या मुलींनाचं हे घर मिळेल. कारण त्यांनीच आजपर्यंत माझा सांभाळ केला आहे. त्या तुमच्यासारख्या नालायक नाहीत.”
हे ऐकून या चारही मुलांचा खूप तिळपापड झाला होता आणि यानंतर आई मेली तरी परत तिचं तोंड पाहायचं नाही, Inspirational Marathi Story असा विचार करूनचं ती गेली होती आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि आता आपली आई मेल्यानंतरसुद्धा ते आले नव्हते.
मागील अनेक वर्षांपासून तर या चार मुलीचं आईला सांभाळायच्या. तिला काय लागेल ते पहायच्या. Inspirational Marathi Story अनेक वेळेस या मुलींनी आईला आपल्याबरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण आई जुन्या संस्कारात वाढलेली, त्यामुळे जावयांच्या घरचं पाणी प्यायचं नाही, असं म्हणून ती गावातचं राहिली.
गावातील लोकांना आशा होती की, पार्वती बाईची मुलं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येतील. परंतु पार्वतीबाईंच्या चारही मुलींना मात्र माहीत होतं की, Inspirational Marathi Story आपले भाऊ खूप नालायक आहेत, ते काही येणार नाहीत.
गावचे सरपंच पुढे येऊन म्हणतात, “आता पार्वती बाईंची चारही मुलं येथे नाहीत. Inspirational Marathi Story त्यामुळे गावातील माणसांनीच पार्वती बाईंवर अंत्यसंस्कार करूया. त्यांच्या पार्थिवाला खांदा देऊया.”
गावातील चार माणसं पुढे येतात. तेवढ्यात पार्वती बाईंची सर्वात लहान मुलगी राखी पुढे येते आणि म्हणते, Inspirational Marathi Story “माफ करा गावकऱ्यांनो, तुम्ही सगळ्यांनी नाही, तर आम्हीचं आमच्या आईला खांदा देणार. तिच्यावर अंत्यसंस्कार करणार.”
राखीचं हे वाक्य ऐकून गावातील सर्वांनाचं आश्चर्य वाटतं आणि हे लोक कुजबूज करू लागतात, Inspirational Marathi Story “मुली पार्थिवाला खांदा देत नाही. अंत्यसंस्कार करत नाही.”
पार्वती बाईंची दुसरी मुलगी योगिता पुढे येते आणि म्हणते, ” आम्ही का नाही करू शकत आमच्या आईवर अंत्यसंस्कार ? तिच्या पार्थिवाला का खांदा देऊ शकत नाही ? अंत्यसंस्कार करण्याचा हक्क फक्त मुलांनाच आहे का ? Inspirational Marathi Story माझ्या आईला चार मुलंही होती. परंतु त्यांनी आईचा सांभाळ केला नाही आणि आता आमची आई देवाघरी गेल्यानंतरसुद्धा ते आले नाहीत. मग आमचाचं हक्क आहे, आमच्या आईवर अंत्यसंस्कार करण्याचा.
जरी आज आमचे भाऊ येथे आले असते, तर आम्ही त्यांना आईचं तोंडही पाहू दिलं नसतं. तिचा अंत्यसंस्कारही करू दिला नसता. कारण जिवंत असेपर्यंत त्यांना आईची किंमत नव्हती. त्यांनी आईचा सांभाळ केला नाही. Inspirational Marathi Story तिची साधी कधी विचारपूसही केली नाही आणि आता समाजाच्या भीतीने जर ते येथे आले असते, तर त्यांना आम्ही काही किंमत देणार नाही.”
गावचे सरपंच या मुलींना समजवण्याचा प्रयत्न करतात की, “आपली तशी रीतचं आहे.” पार्वतीबाईंची मुलगी सीमा म्हणते, “रीत तर अशी पण आहे की, Inspirational Marathi Story ज्या मुलांना आई-बाबांनी जन्म दिला, त्यांना वाढवण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्या आई बापाला मुलांनी सांभाळावं.
परंतु आमच्या भावांनी तसं नाही केलं. तेव्हा तुम्ही त्यांना नाही समजावून सांगितलं की, हे तुमचं कर्तव्य आहे. Inspirational Marathi Story मग आता आम्हालाही समजवण्याचा प्रयत्न करू नका.
आमच्या आईचीसुद्धा अशीच इच्छा असेल की, तिच्यावर अंत्यसंस्कार आम्ही मुलींनीच करावा. कारण ती नेहमी म्हणायची की, तुम्ही मुली माझ्या मुलासारख्या आहात. ज्यांनी मला आधार दिला. Inspirational Marathi Story माझा सांभाळ करत आहात.
आजकाल आपण पाहतो की, अनेक मुलं आपल्या आई बापाला सांभाळत नाहीत. मुलांना आई बापाकडून सगळं काही हवं असतं. त्यांची प्रॉपर्टी हवी असते, पैसा अडका हवा असतो. परंतु म्हातारपणात त्यांना सांभाळायचं म्हटलं की, त्यांना ते जड जातं. Inspirational Marathi Story त्यांना प्रायव्हसी नाही मिळत, म्हणून आई बापाला गावाकडेचं ठेवलं जातं आणि मुलं शहरात त्यांच्याचं पैशावर ऐश करतात.
परंतु आपला समाज त्यांना कधीही जाब विचारत नाही. मुलींना मात्र जाब विचारतात. जेव्हा आम्ही आमच्या आई बापासाठी काही करायचं ठरवतो. आणि जर आम्ही आमच्या आईला तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळू शकतो Inspirational Marathi Story तर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचासुद्धा आमचा हक्क आहे ना.
त्यामुळे कुणी काहीही म्हंटलं, तरी आम्ही आमच्या आईचा अंत्यसंस्कार करणारचं. असं म्हणून या चारही मुली आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा देतात. मुखागणीसुद्धा या चार मुलीचं आपल्या आईला देतात. तेव्हा त्यांच्या आर्त हाकेने, त्यांच्या रडण्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं.
या चारही मुली देवाकडे प्रार्थना करतात की पुढच्या जन्मी आम्हाला आमच्या आईच्याचं पोटी जन्म दे आणि या जन्मात तिच्या मुलांमुळे आईला जो त्रास झालाय, Inspirational Marathi Story तो पुन्हा कधीही व्हायला नको.
आजच्या या जगात, शहरीकरणाच्या काळात, जिथे माणसांपेक्षा जास्त किंमत पैशांना आहे. प्रत्येक माणूस हा पैसा कमावण्याच्या मागे धावताना दिसतो. Inspirational Marathi Story जिथे नात्यांना कोणतीही किंमत नाही. अशा वेळेस आपल्याला जन्म दिलेल्या आई बापाची सुद्धा अनेकांना किंमत राहत नाही.
मग पोटचा मुलगा असो किंवा मुलगी, अनेक वेळेस त्यांना फक्त आई-बाबांकडून आपल्याला काय मिळतं याचीचं हाव असते. जोपर्यंत आई बापाकडून संपत्ती, Inspirational Marathi Story पैसा मिळत असतो, तोपर्यंतचं त्यांना आदर दिला जातो. त्यांच्याशी गोड वागलं जातं आणि ज्या दिवशी त्यांच्याकडे हे काही उरत नाही. त्यानंतर आई-बाबा आणि मुलांचं नातंही उरत नाही.
मग अशा वेळेस आई-बापावर, त्यांच्या शेवटच्या अंत्यसंस्कारांवर त्यांचाचं हक्क असला पाहिजे, ज्यांनी जिवंतपणी त्यांनी सुख दिलं. त्यांचा सांभाळ केला. Inspirational Marathi Story जर त्या आई बापालाही विचारलं की, तुमच्यावर अंत्यसंस्कार कोणी करावेत, तर त्यांचही हेचं उत्तर असेल की, अशा मुलांना आमच्या अंत्यदर्शनाची संधी मिळू नये. हे मात्र खरं.
मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा, नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !