Indira Gandhi National Widow Pension Scheme
Indira Gandhi National Widow Pension देशातील केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार प्रत्येक सरकारचं एक कर्तव्य असतं की, देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांची मदत करणं, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, आर्थिक स्वावलंबत्व मिळवून देणे. त्या दृष्टीने अनेक राज्य सरकारे आणि केंद्र सरकार आपल्या राज्यातील लोकांसाठी विविध योजना राबवत असतात.
अशीचं एक योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना राज्यातील असहाय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विधवा महिलांना दरमहा आर्थिक मदत पेन्शन मिळवून देते. मग ही योजना नेमकी आहे तरी काय ? इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजनेची पात्रता आणि अटी काय आहेत ? या Indira Gandhi National Widow Pension योजनेसाठी अर्ज कसा करायचा आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना
ही योजना भारत सरकारने 1995 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना दरमहा पेन्शन दिली जाते. जेणेकरून त्यांना आर्थिक स्वावलंबत्व मिळेल आणि त्यांना कोणावरही पैशांच्या गरजेसाठी अवलंबून राहावं लागणार नाही.
ही Indira Gandhi National Widow Pension योजना भारत सरकारने सुरू केली असून प्रत्येक राज्य सरकारने आपल्या राज्यात लागू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी विधवा महिलांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते. या पेन्शनचा उपयोग त्या आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी करू शकतात.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना पात्रता आणि अटी
या Indira Gandhi National Widow Pension योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही पात्रता आणि अटी आखून दिल्या आहेत.
1) अर्जदार महिला दारिद्र रेषेखालील असावी.
2) अर्जदार महिलेचे वय 40 ते 70 या वयोगटात असावं.
3) अर्जदार महिलेच्या पतीचा मृत्यूचा दाखला असणं आवश्यक आहे.
4) अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ निवासी असावी.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना आवश्यक कागदपत्रे
या Indira Gandhi National Widow Pension योजनेत अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
1) अर्जदार महिलेचं आधार कार्ड आणि इतर ओळखपत्र
2) अर्जदार महिलेचा वयाचा दाखला
3) अर्जदार महिलेचा रहिवासी दाखला
4) अर्जदार महिलेच्या पतीचा मृत्यूचा दाखला
5) अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो
6) अर्जदार महिलेचं बँक अकाउंट पासबुक
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना अर्ज कसा करायचा
या Indira Gandhi National Widow Pension योजनेत अर्ज करायचा असल्यास अर्जदार महिलेस नजीकच्या तहसील कार्यालयास भेट द्यावी लागेल. येथून तिला या योजनेसाठीचा अर्ज भेटेल. या अर्जावर सर्व वैयक्तिक माहिती लिहून आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज जमा करता येईल.
अर्ज जमा केल्यानंतर या अर्जाची छाननी होईल. अर्ज योग्य आढळल्यास या महिलेला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन दिली जाईल.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये
1) या Indira Gandhi National Widow Pension योजनेअंतर्गत समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विधवा महिलांना दरमहा पेन्शन मिळते.
2) विधवा महिलांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते.
3) ही पेन्शन विधवा महिलांच्या बँक अकाउंटवर जमा केली जाते. पैसे त्यांच्या हातात मिळतात आणि त्या आपल्या गरजांसाठी ते खर्च करू शकतात.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजनेचे महत्त्व
ज्या देशातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सशक्त असतात. तो देशही आर्थिक प्रगती करतो. परंतु आपल्या देशामध्ये महिलांबद्दल अनेक कुप्रथाही आहेत. जसं की, विधवा महिलांना समाजाकडून अनेक गोष्टींमध्ये त्रास दिला जातो. त्यांना स्वतःच्या घरातही समानतेची वागणूक दिली जात नाही. त्यामुळे त्या सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागे राहून जातात.
अशातचं जर विधवा महिलेचं कुटुंब हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल. त्यांचं आर्थिक उत्पन्न खूप कमी असेल, ते दारिद्र्यरेषेखालील असतील, तर मात्र अशा विधवा महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतं. त्यांच्या रोजच्या दैनंदिन गरजा भागणेसुद्धा खूप अवघड असतं.
या समस्यांना सोडवण्यासाठीचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना सुरू केली आहे. या Indira Gandhi National Widow Pension योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील विधवा महिलांना दरमहा 1500 रुपयांची पेन्शन दिली जाते. या पैशांचा उपयोग त्या आपलं घर चालवण्यासाठी, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकता.
देश किंवा राज्य कोणत्याही सरकारचं प्रथम कर्तव्य देशातील कमकुवत वर्गाला आर्थिक दृष्ट्या संपन्न बनवण, सक्षम बनवणं, हेच असतं आणि या योजनेअंतर्गत सरकार तेच उद्देश ठेवून पुढे जात आहे.
आपल्या देशामध्ये फक्त सरकारी नोकरांना निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळते. ज्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह भागू शकतो. परंतु इतर लोकांना पेन्शन मिळत नाही. अशावेळेस निवृत्तीनंतर त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार, हा खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.
सरकारने विविध वयोगटातील लोकांसाठी दरमहा पेन्शन योजना सुरू केली आहे. जसं की इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना. ही योजना दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांसाठी आहे. तर 65 वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील, वरिष्ठ नागरिकांसाठी सरकारने श्रावणबाळ योजना सुरू केली आहे आणि या योजनेतील लाभार्थी नागरिकांना दरमहा १५०० रुपयांची पेन्शन दिली जाते.
हेही वाचा : PM SHREE Yojana | PM श्री योजनेची संपूर्ण माहिती मराठीत
देशाध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मोठ्या गाजावाजाने सुरू आहे. देशातील महिलांचा आर्थिक स्थर उंचावणं, त्यांना स्वावलंबी बनवणं, शिक्षणासारख्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हाच या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गतचं देशातील विविध राज्य सरकारेसुद्धा आपल्या वेगवेगळ्या योजना सुरू करत आहेत.
आपल्या सर्वांना माहीतचं आहे की, आपल्या महाराष्ट्रात लेक लाडकी योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जन्मणाऱ्या मुलींना अठरा वर्षांची होईपर्यंत सरकार एक लाख एक हजार रुपयांचा आर्थिक लाभ देते. तर आपल्या शेजारी राजस्थान राज्यामध्ये मुख्यमंत्री राजश्री योजनेच्या नावाने ही योजना सुरू आहे. जिथे राज्यात जमलेल्या मुलींना अठरा वर्षांची होईपर्यंत 50 हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.
असंच वेगवेगळ्या वयोगटातील महिलांना सरकारतर्फे विविध योजनांचा लाभ दिला जातोय. ज्यामुळे महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावला जाईल. महिलांबद्दल समाजात ज्या कुप्रथा आहेत, चालीरीती आहेत, त्यांचा समूळ नाश होईल आणि त्यांना सगळीकडे आदर मिळेल, सन्मान मिळेल.
अनेकदा असं होतं की, सरकार समाजातील विविध वयोगटातील महिलांसाठी योजना राबवत असतं. परंतु या योजनांबद्दल त्यांना माहितीचं नसते. त्यामुळे त्या या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणूनचं एक समाज म्हणून ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, अशा लोकांपर्यंत या योजनेबद्दलची माहिती पोहोचली पाहिजे. जेणेकरून त्यांना त्यांचा हक्क मिळेल.
FAQ’s इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
उत्तर : या योजनेचा लाभ राज्यातील दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना मिळतो.
2) प्रश्न : Indira Gandhi National Widow Pension योजनेत दरमहा किती पेन्शन मिळते ?
उत्तर : या योजनेअंतर्गत विधवा महिलांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते.
3) प्रश्न : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजनेचा उद्देश काय आहे ?
उत्तर : दारिद्र रेषेखालील विधवा महिलांचं आर्थिक सशक्तिकरण करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पातळीवर कोणावरही अवलंबून राहावं लागू नये, यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
4) प्रश्न : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना कधी सुरू करण्यात आली ?
उत्तर : ही योजना 1995 मध्ये भारत सरकारने सुरू केली होती.
5) प्रश्न : इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ?
उत्तर : या Indira Gandhi National Widow Pension योजनेसाठी जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज करायचा असतो.
सरकारने या योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शन योजना असं ठेवलं आहे. याचा अर्थ विधवा महिलांना निवृत्तीनंतर रिटायरमेंटनंतर पेन्शन देता यावी, हा सरकारचा उद्देश आहे. कारण रिटायरमेंटनंतर मिळालेली पेन्शन ही सर्वांनाचं खूप प्रिय असते.
तुम्ही एखाद्या निवृत्तीवेतन घेणाऱ्या सरकारी नोकरास विचारलं की, तुम्हाला नोकरी करत असताना मिळालेला पगार जास्त प्रिय होता की, आता निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन, तर त्यांचं उत्तर हेचं असेल की, निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन ही जास्त उपयोगी असते.
कारण तोपर्यंत आयुष्यातील जबाबदाऱ्यांचा ओझंही कमी झालेलं असतं आणि कोणतंही काम न करता, ऑफिसला न जाता, तुम्हाला दरमहा पेन्शन भेटते आणि याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करू शकतात.
तशीच काहीशी सोय आता या Indira Gandhi National Widow Pension योजनेअंतर्गत सरकारने विधवा महिलांनाही करून दिली आहे. विधवा महिला त्यांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ स्वतःचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी करू शकतात आणि ही योजना त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवते. नाहीतर त्यांना दुसऱ्या कोणावर तरी आपल्या दैनंदिन खर्चासाठी अवलंबून राहावं लागायचं. ही योजना खरच खूप कौतुकास्पद आहे आणि या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा.
तुमच्या मनात इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती पेन्शनबद्दल Indira Gandhi National Widow Pension आणखी काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच नवीन नवीन योजनांच्या माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !