Idli Sambar Marathi Recipe
Idli Sambar Marathi Recipe इडली सांबर ही सर्वांचीच खूप आवडती साऊथ इंडियन डिश आहे. ही खूपच टेस्टी आणि हेल्दी डिश मानली जाते. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी इडली सांबर हमखास बनवले जाते. पचण्यासाठीही इडली सांबर खूप हलके असते आणि वजन कमी करण्यासाठीही हे खाल्लं जाते.
अनेक साऊथ इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंटमधेही इडली सांबर मिळते. अनेकजण तिथे इडली सांबर खाण्यासाठी गर्दी करत असतात. पण इडली सांबरची रेसिपी अतिशय सोपी असते त्यामुळे ती तुम्ही सहज घरीसुद्धा बनवू शकता.
आज आपण टेस्टी आणि हेल्दी इडली सांबर घरच्याघरी बनवण्याची Idli Sambar Marathi Recipe रेसिपी शिकणार आहोत.
Ingredients For Idli Sambar Marathi Recipe इडली सांबर बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
इडली आणि सांबरमध्ये दोन पदार्थ वेगवेगळे बनवावे लागतात. पाहिलं आहे इडली आणि दुसरं आहे सांबर
आपल्याला ४ ते ५ जणांसाठी इडली सांबर बनवायचं असेल तर लागणारं साहित्य पाहूया.
इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
- ४ ग्लास तांदूळ
- १ ग्लास उडीद डाळ
- २-३ चमचे दही
- १ चमचा सोडा
- चवीनुसार मीठ
सांबर बनवण्यासाठी लागणारं साहित्य :
- १ वाटी तूरडाळ
- २ शेवग्याच्या शेंगा
- १ बटाटा
- १ दुधी भोपळा
- १ तुकडा बीट
- थोडंस खोबऱ्याचा तुकडा
- ५-६ लसणाच्या पाकळ्या
- आल्याचा तुकडा
- २ टोमॅटो
- २ कांदे
- ३ चमचे सांबर मसाला
- २ चमचे लाल तिखट
- ५-६ सुकलेल्या लाल मिरच्या
- २ चमचे कसुरी मेथी
- १ चमचा कांदा लसूण मसाला
- १ चमचा जिरे
- १ चमचा मोहरी
- थोडीशी चिंच
- २ चमचे किसलेला गूळ
खोबऱ्याची चटणीसाठी लागणारं साहित्य :
- अर्धी वाटी पुदिना
- थोडीशी कोथिंबीर
- ४-५ पाकळ्या लसूण
- आल्याचा तुकडा
- १ वाटी ओलं खोबरे
- अर्धी वाटी डाळ्या
- मूठभर शेंगदाणे
- अर्धी वाटी दही
- २ चमचे साखर
- अर्धा चमचा जिरे
- अर्धा चमचा मोहरी
Procedure For Idli Sambar Marathi Recipe इडली सांबर बनवण्याची कृती :
इडली बनवण्याची कृती :
1. एका पातेल्यात ४ ग्लास तांदूळ आणि १ ग्लास उडीद डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची. धुतल्यानंतर पाण्यात ४-५ तासांसाठी भिजत ठेवायची.
2. यानंतर ते तांदूळ आणि डाळीचं मिश्रण पाण्यातून काढून मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायचं. सगळं मिश्रण बारीक झाल्यावर त्यात 2 चमचे मीठ टाकायचं आणि मिक्स करून रात्रभर तसंच ठेवायचं.
Sindhi Style Dal Pakwan Recipe | दाल पकवान रेसिपी
3. मग सकाळी ते पीठ चांगलं फुगून येतं. त्यात एक चमचा सोडा आणि २-४ चमचे दही टाकून मिक्स करून घ्यायचं.
आता एक इडली पात्र गॅसवर ठेवायचं. त्यातील डिशला तेल लावून घ्यायचं आणि आपण जे इडलीचं पीठ तयार केलं त्या डिशमध्ये इडली पीठ टाकून गॅसवर 10 मिनिटांसाठी ठेवायचं.
4. या पात्राच्या झाकणावर वजन ठेवायचं म्हणजे त्यात हवा जाणार नाही. 10 मिनिटांनंतर हे झाकण उघडून पहा. आपली इडली छान फुगलेली दिसेल. इडली तयार झालीय आता पात्रातून बाहेर काढा आणि एका भांड्यात सर्व इडली काढून घ्या.
आपली इडली तयार आहे.
सांबर बनवण्याची कृती :
1. सगळ्यात आधी कुकरमध्ये १ वाटी स्वच्छ धुतलेली डाळ भिजत टाकायची. त्यात १ बारीक चिरलेला बटाटा, १ बारीक कापलेला दुधी भोपळा, २ बारीक केलेले टोमॅटो, १ तुकडा बीट, तुकडे केलेल्या शेवग्याच्या शेंगा त्या डाळीत टाकायचे. आणखी त्यात हळद टाकून मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून २-३ शिट्ट्या होऊ द्यायच्या.
2. डाळ शिजवून झाल्यावर हाटून घ्यायची. एका कढईमध्ये २-४ पळ्या तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर त्यात १ चमचा मोहरी, १ चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा छान फ्राय करून घ्यायचा. नंतर आलं लसूण आणि खोबरे मिक्सरमधून बारीक वाटून त्या कांद्यात टाकायचं.
3. ५-६ वाळलेल्या लाल मिरच्या तेलात टाकायच्या आणि छान फ्राय करून घ्यायच्या. ३ चमचे सांबर मसाला, २ चमचे लाल तिखट, २ चमचे कसुरी मेथी, १ चमचा कांदा लसूण मसाला टाकून फ्राय करून घ्यायचं.
4. या मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये हाटलेलं वरण टाकून द्यायचं आणि त्यात २-३ ग्लास पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. चिंचेचं पाणी तयार करून त्यात टाकायचं आणि २ चमचे गूळ टाकायचं.
5. सांबरला ५ मिनिटे उकळी येऊ द्यायची.
आपलं आंबट गोड सांबर तयार आहे.
खोबऱ्याची चटणी बनवण्याची कृती :
1. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये १ वाटी बारीक किसलेलं खोबरं, अर्धी वाटी डाळ्या, मूठभर भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी पुदिना, थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, २-४ हिरव्या मिरच्या, साखर टाकायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं.
2. एका पातेल्यात ही चटणी ओतून घ्यायची. आता एका कढईमध्ये १ पळी तेल टाकून त्यात जिरे मोहरीची फोडणी करून ती या चटणीमध्ये ओतून घ्यायची. आता आपली चटणी तयार झाली.
आपली टेस्टी आणि स्पंजी इडली सांबर आणि त्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार आहे. तुम्ही एका प्लेटमध्ये इडली सांबर आणि खोबऱ्याची चटणी सर्व्ह करू शकता.
बाहेरचं इडली सांबर खाण्यापेक्षा आपण अशा सोप्या पद्धतीने घरच्याघरी बाहेरच्यापेक्षा टेस्टी आणि हेल्दी इडली बनवू शकतो. अगदी पोट आणि मन भरेपर्यंत आपण Idli Sambar Marathi Recipe इडली सांबर खाऊ शकतो.
Important Tips For Idli Sambar Marathi Recipe | महत्वाच्या टिप्स :
1. इडलीचं पीठ जाडसर काढायचं त्यामुळे आपली इडली स्पंजी बनते.
2. इडलीच्या पीठामध्ये रात्रीच मीठ टाकून ठेवलं तर पीठ चांगलं फुगून येतं.
3. सांबरमध्ये बीट टाकल्यावर सांबरला कलर चांगला येतो.
4. सांबरमध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्यामुळे सांबरला चांगली चव येते.
5. Idli Sambar Marathi Recipe खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहे. इडली सांबर आपलं वजन वेगाने कमी करू शकतं कारण यामध्ये कमी कॅलरीज असतात. हे पचण्यासाठी खूप हलकं असतं त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी आपल्या जेवणात इडली सांबर नक्की खावं.
6. इडली सांबर खाण्याचे अनेक फायदे आहेत. इडली सांबर खूप हलका आहार आहे आणि पचनसुद्धा लवकर होतं कारण त्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. वजन कमी करायचं असेल तर इडली सांबर खूप उपयुक्त आहे. यात कमी कॅलरीज असतात.
इडली सांबर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात नेहमी ऊर्जा राहते. आपल्या हार्टसाठीही खूप चांगलं आहे.
7. सांबर हे आपण नेहमी आंबट गोड करतो त्यामुळे खाण्यात खूप स्वाद येतो पण कधीकधी सांबर जास्त आंबट बनते त्यासाठी त्यात एक चमचा साखर टाकायची. साखर टाकल्यामुळे सांबरचा आंबटपणा कमी होतो आणि चव आणखी छान होते.
8. इडली चांगली फुगावी यासाठी इडलीचं पीठ तयार करताना त्यात एक वाटी भिजवलेले पोहे टाकावेत. भिजवलेले पोहे टाकल्यामुळे इडली चांगली फुगते आणि स्पंजी होते.
9. इडली खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. यामध्ये रवा इडली, पोहा इडली, ओट्स इडली, पनीर इडली, नाचणी इडली, ज्वारी इडली, मुंग इडली, मिक्स डाळ इडली अशा अनेक प्रकारच्या इडली लोक खूप आवडीने खातात.
या सर्व टिप्सचा वापर करून तुम्ही खूप टेस्टी Idli Sambar Marathi Recipe इडली सांबर बनवू शकता.
FAQ For Idli Sambar Recipe | काही महत्त्वाचे प्रश्न :
१. Idli Sambar Marathi Recipe ही डिश कुठे जास्त प्रसिद्ध आहे ?
इडली सांबर ही एक साऊथ इंडियन डिश आहे. विशेषतः नाश्त्यामध्ये सर्वजण इडली सांबर खातात. साऊथमधील कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यामध्ये इडली सांबर खूपच प्रसिद्ध आहे आणि दोन्ही राज्यातील लोक आपण पहिल्यांदा ही डिश बनवल्याचं बोलतात.
२. Idli Sambar Marathi Recipe कशापासून बनवले जाते ?
इडली सांबर बहुतेक सर्वजण आवडीने खातात. इडली ही तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवली जाते तर सांबर हे तूरडाळ, शेवग्याच्या शेंगा, बटाटा, दुधी भोपळा आणि खूप साऱ्या मसाल्यांपासून बनवलं जातं.
इडली आणि सांबर ही खूपच स्वादिष्ट रेसिपी आहे.
३. Idli Sambar Marathi Recipe आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का ?
Idli Sambar Marathi Recipe हा खूपच पौष्टिक आहार आहे. ते तेलकट नाही आणि पचण्यासाठी खूप हलकं आहे. इडली सांबर हलकं असल्यामुळे आणि त्याचं पीठ आंबवल्यामुळे पचन होण्यास सोपं असतं. पीठ आंबवल्यामुळे यात असणारे बॅक्टेरिया आणि यीस्ट आपल्या शरीराच्या पचन प्रक्रियेसाठी खूप उपयोगी असतात.
४. आपण इडली रोज खाऊ शकतो का ?
नाही तुम्ही रोज इडली खायला नको. तुम्ही जर रोज जास्त प्रमाणात इडली खाल्ली तर जास्त कॅलरीजमुळे तुमचं वजन वाढू शकतं. कोणताही अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाणं चांगलं नसतं हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं.
५. Idli Sambar Marathi Recipe हे जंक फूड आहे का ?
इडली सांबर जंक फूड नाही. इडली ही वाफ देऊन बनवली जाते आणि यामध्ये फॅट्सदेखील नाहीत त्यामुळे इडली सांबर खूप हेल्दी आहे. याउलट जंक फूडमध्ये जास्त कॅलरीज आणि फॅट्ससुद्धा असतात.
आपली टेस्टी Idli Sambar Marathi Recipe रेसिपी तयार आहे. ती तुम्ही एका प्लेटमध्ये आपल्या कुटुंबाला सर्व्ह करा. हे इडली सांबर सर्वांना नक्कीच आवडेल आणि ते तुमच्याकडे वारंवार ही रेसिपी बनवण्याची फर्माईश नक्की करतील यात शंका नाही. घरी बनवलेली इडली सांबर रेसिपी बाहेरच्यापेक्षा नक्कीच खूप छान बनेल.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्कीच वाचा. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.