सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत माहितेय का ? तरचं टाळता येईल टॅनिंग

सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत

सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत. सध्या संपूर्ण देशात वाढत्या उन्हाने हाहाकार माजवलाय. या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घराबाहेर निघू नका, असं सांगितलं जातं. परंतु अनेक लोकांना कामासाठी उन्हात घराबाहेर निघावंच लागतं. अशावेळेस तुमची त्वचा टॅन होऊ शकते. या टॅनिंगपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन हा सर्वात चांगला उपाय आहे. परंतु अनेक लोकांना सनस्क्रीन कसं वापरायचं, तेच माहीत नसतं. आज आपण ते जाणून घेऊया.

सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत

1) सनस्क्रीन वापरण्याआधी सर्वात आधी तर कोणती सनस्क्रीन विकत घ्यावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ज्या सनस्क्रीनमध्ये SPF 30 पेक्षा जास्त आहे, तेच वापरणं योग्य.

2) जर तुम्हाला ऊन असताना घराबाहेर पडायचं असेल, तर घराबाहेर पडण्याच्या 15 मिनिट आधी सनस्क्रीन लावायला हवी. म्हणजे मी तुमच्या त्वचेशी चांगली मिक्स होईल आणि उन्हातील सूर्याच्या घातक किरणांचा त्वचेवर परिणाम होणार नाही.

सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत
सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत

3) सनस्क्रीन महाग असते. त्यामुळे अनेक वेळेस ती कमी प्रमाणात वापरण्यावर अनेकांचा भर असतो. परंतु आवश्यक प्रमाणात सनस्क्रीन त्वचेवर लावली, तरचं टॅनिंगपासून बचाव होऊ शकतो.

4) आता तुम्ही चांगली सनस्क्रीन विकत घेतली, योग्य प्रमाणात चेहऱ्यावर लावली, परंतु सनस्क्रीन कोठे लावायची हा प्रश्न असतो. अनेकदा फक्त चेहऱ्यावर आणि मानेवर सनस्क्रीन लावली जाते. परंतु तुमच्या शरीराचा जो भाग कपड्याने झाकला गेला नाहीये, तेथे सनस्क्रीन लावायला हवी.

सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत
सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत

5) अनेकदा काही लोक दिवसभर उन्हात राहतात. परंतु घरातून बाहेर निघतानाचं ते सनस्क्रीन लावतात. परंतु जे लोक दिवसभर उन्हात आहेत, त्यांचा घातक किरणांशी संबंध येतोय, त्यांनी दर दोन-तीन तासात सनस्क्रीन लावायला हवी. नाहीतर तुमची त्वचा टॅन होऊ शकते.

कपाळावरचं टॅनिंग दूर करण्यासाठी करा हे उपाय

एकूणचं सनस्क्रीन वापरणे खूप फायदेशीर आहे. परंतु सनस्क्रीन वापरण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी. तेव्हाचं जास्त फायदा होतो, एवढं मात्र नक्की.

तर तुम्ही सनस्क्रीन लावता का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top