Google Pay अकाऊंट कसं ब्लॉक करायचं. काही वर्षांपूर्वी एखादी वस्तू खरेदी करायची असेल, घराबाहेर पडायचं असेल, तर सर्वात आधी आपण आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये, खिशात किती पैसे आहेत, सुट्टे पैसे किती आहेत, हे चेक करायचो. परंतु आता त्याची जागा मोबाईल फोनने घेतली आहे. आपल्या खिशात मोबाईल फोन तर आहे ना, त्यामध्ये इंटरनेट सुरु आहे ना, मग फोन पे किंवा google पे च्या मदतीने पेमेंट करता येईल. सुट्टे पैसे बाळगायची गरज नाही, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची गरज नाही, असा काळ आता आलाय.
यूपीआय पेमेंटने इतर प्रत्येक पेमेंटची जागा घेतली आहे. अवघ्या एक रुपयासाठीही आता यूपीआय पेमेंट करता येतं, ते हजारोंच्या पटीतही पेमेंट करण्यासाठी यूपीआय, फोन पे आणि गुगल पे चा वापर केला जातो.
Google Pay अकाऊंट कसं ब्लॉक करायचं
पण जर अचानक तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर या या पेमेंट ऍप्सचं काय करायचं ? एखादी अनोळखी व्यक्ती किंवा चोर तुमच्या या ऍप्सचा वापर करून पेमेंट तर करणार नाही ना, तुमचे पैसे सुरक्षित राहतील ना, याबद्दल अनेकांना काळजी वाटते. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर, फोन कर आणि गुगल पे कसं बंद करायचं याबद्दलची माहिती घेऊन आलो आहोत.
अशा परिस्थितीत जर तुम्ही फोन पे वापरत असाल, तर तुम्हाला फोन पे च्या कस्टमर केअर सर्विसला कॉल करायचा आहे.
8068727374 या फोन पे हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुम्हाला कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्हला माझा फोन हरवला आहे आणि फोन पे अकाउंट बंद करायचंय याबद्दल माहिती सांगायची.
या भाज्या खाऊन कमी करा वाढतं पोट
त्यानंतर ते तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी काही प्रश्न विचारतील, जसं की तुमचा मोबाईल नंबर, बँक अकाउंट संबंधित माहिती, फोन पेवर शेवटचं केलेलं ट्रांजेक्शन, आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर. या माहितीचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं फोन पेचं अकाउंट तात्पुरत्या स्वरूपात बंद केले जाईल.
तसंच जर तुम्ही गुगल पे वापरत असाल, तर गुगलचा टोल फ्री नंबर 18004190157 वर कॉल करून तुम्ही आपली सगळी माहिती देऊन गुगल पे चं अकाउंट आहे तात्पुरत्या स्वरूपात बंद करू शकता.
एकूणचं कोणतीही गोष्ट वापरत असताना सर्व माहिती असणं हे आवश्यक आहे, एवढे मात्र नक्की. तर तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी कोणते ॲप वापरतात ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !