Honar Sunn Mi Hya Gharchi : होणार सून मी ह्या घरची फेम ओवी आता दिसते खूप सुंदर

Honar Sunn Mi Hya Gharchi

Honar Sunn Mi Hya Gharchi होणार सुन मी या घरची ही मालिका तुम्हाला नक्कीच आठवत असेल. श्री आणि जानवी या दोघांची जोडी तर संपूर्ण जगभरात गाजली होती. पण या मालिकेत आणखीन एक अशी कलाकार होती, जी सर्वांची फेवरेट होती.

आम्ही बोलतोय ओवीबद्दल. मालिका संपून अनेक वर्ष झाली आहेत. मग आता ही ओवी काय करते ? ती मोठी झाली असेल ना ? आता ती कशी दिसते ? आज आपण तिच्याबद्दलच जाणून घेऊया. ओवीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचं नाव होतं क्रितिना वर्तक.

Honar Sunn Mi Hya Gharchi 

बालकलाकार क्रीतिना वर्तकने साकारली ओवीची भूमिका. क्रीतीना एक बालकलाकार आहे. तिने फक्त होणार सून मी या घरची, नाही तर अनेक मराठी, हिंदी मालिका तसेच चित्रपटातही काम केलंय. इथेच टाका तंबू या चित्रपटातही दिसून आली होती. त्याचबरोबर कनिका आणि द शाडो यांसारख्या भयपटातसुद्धा ती दिसून आली होती.

Honar Sunn Mi Hya Gharchi क्रीतीना सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असते आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवीन नवीन फोटो शेअर करत असते. ती आता मोठी झालीये आणि खूपच सुंदर दिसते.

होणार सून मी मालिकेचे इतर कलाकार काय करतात ?

या Honar Sunn Mi Hya Gharchi  मालिकेतील बाकीच्या कलाकारांविषयी बोलायचं झाल्यास श्री आणि जानवीची भूमिका साकारणारे कलाकार होते शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान. हे दोघे खूपच लोकप्रिय झाले. त्यांना सगळीकडे श्री आणि जान्हवी हीच ओळख मिळाली. पडद्यावर दिसणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी, अशी सर्वांची इच्छा होती आणि घडलंही तसंच.

शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान मालिकेत एकत्र काम करत असतानाचं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचं लग्न झालं, तो दिवस त्यांच्या फॅन्ससाठी खूप आनंदाचा होता. त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं होतं. परंतु हा आनंद फक्त काही काळचं टिकला. कारण लग्नाच्या अवघ्या काही महिन्यांमध्येचं तेजश्री आणि शशांक या दोघांनी घटस्फोट घेतला. ते एकमेकांपासून वेगळे झाले.

शशांक केतकर आणि तेजश्री प्रधानचा घटस्फोट

Honar Sunn Mi Hya Gharchi हे सगळं घडत असताना मालिका सुरूचं होती. परंतु तेजश्री आणि शशांकने आपलं प्रोफेशनल रिलेशनशिप जपलं आणि मालिकेत काम करणं सुरूच ठेवलं. परंतु काही महिन्यानंतर मालिका बंद करण्यात आली. आणि या दोघांच्या वाटा कायमच्या एकमेकांपासून वेगळ्या झाल्या.

शशांक केतकर त्यानंतर झी मराठीच्या पाहिले न मी तुला या मालिकेत दिसून आला. तर तेजश्री प्रधानने झी मराठीच्या अगबाई सासुबाई या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली. शशांक आणि तेजश्री हे दोघे हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही दिसून येत होते.

अभिनेत्री शशिकला जीवनकहानी

त्यांना घटस्फोटाबद्दल नेहमीच प्रश्न विचारण्यात आले. परंतु त्यांनी कधीही सार्वजनिक जीवनात याबद्दल काही सांगितलं नाही. सोशल मीडियावर शशांकला खूप ट्रोल करण्यात आलं. तेव्हा तेजस्वी प्रधानने त्याची बाजू घेतली आणि कोणालाही ट्रोल करण योग्य नाही, असं आपलं मत मांडलं होतं

तेजश्री आणि शशांक स्टार प्रवाहच्या मालिकेत एकत्र काम करताय

हा Honar Sunn Mi Hya Gharchi योगायोगच म्हणावा लागेल, परंतु दोघेही सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेत काम करत आहेत. शशांक  मागील वर्षभरापासून मुरंबा या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारतोय. तर तेजश्री प्रधानची मालिका प्रेमाची गोष्ट नुकतीचं सुरू झालीये.

प्रशांत आणि तेजश्रीव्यतिरिक्त होणार सुन मी या घरची मालिकेत इतरही अनेक कलाकार होते. मुख्यत्वे शशांकने साकारलेल्या श्री या पात्राच्या सहा आया. आई आज्जी म्हणजेच रोहिणी हट्टंगडी. यांना आपण सगळेच ओळखतो. त्या काही दिवसांपूर्वीच बाईपण भारी देवा या चित्रपटात दिसून आल्या होत्या आणि हा चित्रपट खूपच गाजला.

आज प्रेक्षकांना आठवते होणार सून मी ह्या घरची मालिका

Honar Sunn Mi Hya Gharchi मालिकेतील इतर अभिनेत्रीही सध्या मालिका विश्वात दिसून येत आहेत. मालिकेतील ओवी म्हणजेच कृतीना सुद्धा काही मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करते. एकूणच एखाद्या मालिकेवर प्रेक्षक खूप प्रेम करतात. या मालिकेतील सगळे कलाकार आपल्या घरातीलच आहे, असं त्यांना वाटू लागतं. परंतु शेवटी ती एक मालिका असते, जी एका विशिष्ट कालावधीनंतर संपते.

मालिका जरी संपली असली, तरी त्यातील कलाकार, त्यांची पात्र हे नेहमीच प्रेक्षकांच्या हृदयात घर करून राहतात. होणार सुन मी या घरची मालिकेबद्दलही असं झालंय. आजही श्री, जानवी, आईआजी, पिंट्या, जानवीची सावत्र आई ही सगळी पात्र, त्यांना साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या आठवणीत तसेच ताजे आहेत.

मित्रांनो, तुम्हाला आठवते का ओवी ? आणि होणार सुन मी या घरची मालिका मालिकेतील सगळे कलाकार  ? नक्कीच कमेंट करुन सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top