Homemade Pimples Removing Face Wash : चेहऱ्यावरील पिंपल्स हटवण्यासाठी हा घरगुती फेसपॅक वापरा

Homemade Pimples Removing Face Wash

Homemade Pimples Removing Face Wash मुलींच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोणता असेल, तर तो आहे चेहऱ्यावरील पिंपल्स. कितीही हाकलून दिलं तरी पिंपल्स पुन्हा पुन्हा येतातचं आणि त्यांची निशाणी काळे डाग मागे सोडून जातात. आणि मग हे पिंपल्स आणि त्यांचे काळे डाग मुलींसाठी एक वाईट स्वप्न बनतात.

हे काळे डाग घालवण्यासाठी मुली काही ना काही तरी उपाय करत असतात. सौंदर्य प्रसाधन वापरत असतात. परंतु कशाचाही फायदा होत नाही. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. एक असा Homemade Pimples Removing Face Wash फेस पॅक जो तुमचे पिंपल्सही कमी करेल. त्याचबरोबर पिंपल्समुळे झालेले डागसुद्धा कमी करण्यास मदत करेल.

Homemade Pimples Removing Face Wash

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टींची गरज पडेल. पहिली आहे कडुलिंबाची पानं, दुसरं पुदिन्याची पानं आणि तिसरं हळद. आता या तिन्ही गोष्टी चेहऱ्यासाठी किती उत्तम आहेत, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. जगातील कोणताही आयुर्वेदिक साबण असो, सौंदर्यप्रसाधन असो, त्यामध्ये कडूनिंब, पुदिना आणि हळद वापरली जाते आणि सांगितलं जातं की, आता तुमच्या चेहऱ्याची निगा आम्ही राखणार. त्यामुळे जर याच वस्तू चेहऱ्यासाठी वापरल्या, तर त्या नक्कीचं फायदेशीर ठरतील यात शंका नाही.

Homemade Pimples Removing Face Wash फेस पॅक तयार करण्यासाठी काही कडुनिंबाची पानं आणि काही पुदिन्याची पानं घेऊन मिक्सरमध्ये त्यांचं मिश्रण तयार करायचं. आता या मिश्रणामध्ये एक चमचा हळद टाकायची आणि थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची.

अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी 200 वर्ष वाट पहा

ही पेस्ट आपण फ्रीजमध्ये ज्या भांड्यामध्ये बर्फ साठवतो, त्या भांड्यात टाकून आपल्याला आईस क्यूब तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजेचं हा आपला फेस पॅक आईस क्यूब तयार झाला आणि मग हळूहळू दिवसातून दोन वेळेस हा आईस्क्यूब तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जेथे खूप पिंपल्स येतात आणि जिथे डाग झाले आहेत, तेथे लावायचा आहे. हळूहळू तुमचे पिंपल्स कमी होतील आणि डाग पुसट होत जातील.

कडूनिंब, पुदिना आणि हळद या तीन गोष्टींचे जे गुणधर्म आहेत, ते या फेस पॅकमध्ये आहेत. त्याचबरोबर थंड असल्यामुळे हे तुमच्या त्वचेलाही थंडावा देतील आणि तुम्हाला हवा तो रिझल्ट लवकरचं मिळेल.

तर मैत्रिणींनो लवकरचं हा फेस पॅक तयार करा आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या पिंपल्स आणि पिंपलच्या डागांपासून सुटका मिळवा. अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top