Home Remedy To Remove Tanning : घरातील या पदार्थाच्या साहाय्याने तुम्ही टॅनिंगला पळवून लावू शकता

Home Remedy To Remove Tanning

Home Remedy To Remove Tanning आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो. या उन्हामुळे सर्वात जास्त नुकसान होतं आपल्या स्किनला. कामानिमित्त प्रत्येकाला घराबाहेर निघावं लागतं आणि जेव्हा हा सूर्यप्रकाश आपल्या त्वचेवर पडतो, तेव्हा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि असाच एक दुष्परिणाम आहे टॅनिंग.

टॅनिंगमुळे आपल्या शरीराचा जो ओरिजनल कलर असतो, तो काळवंडतो. त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम चेहऱ्यावर, हातांवर, पायावर आणि मानेवर होतो. त्यामुळे तुमची सुंदरता कमी होऊ शकते.

Home Remedy To Remove Tanning

मार्केटमध्ये उन्हामुळे झालेलं टॅनिंग (Home Remedy To Remove Tanning) हटवण्यासाठी खूप प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. अनेक कॉस्मेटिक आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही टॅनिंग दूर करू शकतात. पण जर तुम्हाला या वस्तूंवर विश्वास नसेल किंवा तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील आणि तुम्हाला घरगुती उपचार करायचे असतील, तर आज आम्ही तुमच्यासाठी असा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या स्किनवरचं टॅनिंग नक्कीचं दूर होईल.

टॅनिंग घालवण्यासाठी हा घरगुती उपाय करा

आपल्या प्रत्येकाच्या घरात बटाटा असतो. बटाट्याचा वापर आपण प्रत्येक दुसऱ्या दिवशी एखादी भाजी बनवण्यासाठी किंवा पराठे बनवण्यासाठी नक्कीचं करतो आणि आता हाचं बटाटा तुमची टॅनिंग दूर करेल.

बटाट्यामध्ये असे अनेक औषधीय गुण असतात, जे त्वचेसाठी खूपचं फायदेशीर आहेत. जर तुम्हाला तुमच्या शरीरावरील टॅनिंग कमी करायचं असेल, तर विविध पद्धतीने बटाटा वापरून तुम्ही हे साध्य करू शकता.

Forehead Tanning Home Remedies 
Forehead Tanning Home Remedies 

पहिली पद्धत आहे, तुम्हाला बटाट्याचा रस काढून घ्यावा लागेल आणि हा रस तुम्ही कापसाच्या साह्याने तुमच्या टॅन झालेल्या स्किनवर लावून थोड्यावेळाने धुतल्याने टॅनिंग कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात AC विकत घ्यायचाय मग या गोष्टींचा नक्की विचार करा.

त्याचबरोबर तुम्ही या बटाट्याच्या रसाचा वापर फेस पॅक बनवण्यासाठीही करू शकतात. बटाट्याच्या रसामध्ये मुलतानी माती आणि गुलाब जल टाकून त्याचा फेसवॉश बनवायचा आणि तो चेहऱ्याला आणि मानेला लावून थोड्यावेळाने धुवून टाकायचा.

बटाट्याच्या रसामध्ये तुम्ही दूध आणि हळदही मिक्स करू शकतात. त्याचाही फायदा तुम्हाला टॅनिंग (Home Remedy To Remove Tanning) कमी करण्यासाठी होईल.

ज्या लोकांना कॉस्मेटिक्सपेक्षा घरगुती उपायावर जास्त विश्वास आहे, त्या लोकांसाठी नक्कीचं हे फायदेशीर आहे, यात शंका नाही.

तर तुम्हाला या उपायाबद्दल माहित होतं का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top