मासिक पाळीमध्ये अनियमितता आणि त्रास महिलांना नवीन नाहीयेत. अनेक महिलांना याबद्दल समस्या असतात. काही महिलांना अनियमित मासिक पाळी येते. तर काहींना मासिक पाळीदरम्यान खूप त्रास होतो. आज आपण या त्रासाची कारणे, त्याचबरोबर त्यावर एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.
मासिक पाळीमध्ये अनियमितता आणि त्रास कारणे
अनियमित मासिक पाळी येणे, त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यान पोटात दुखणे, अतिरक्तस्त्राव होणे, या महिलांबद्दलच्या खूप कॉमन समस्या आहेत. परंतु या समस्या का उद्भवतात ? तर आजकालची तणावपूर्ण जीवनशैली, वेळेवर न खाणे, झोपण्याच्या सवयी, त्याचबरोबर आयुष्यातील ताण तणाव, धूम्रपान आणि दारू पिणं हे या सर्व समस्यांचे कारण आहे.
मासिक पाळीमध्ये अनियमितता आणि त्रास समस्या सोडवण्यासाठी रामबाण उपाय
जर मासिक पाळीदरम्यान खूप जास्त त्रास होत असेल, तर वैद्यकीय सल्ला घेणं हे सर्वात योग्य असतं. परंतु अनेकवेळेस घरगुती उपचारसुद्धा या समस्यांवर तोडगा म्हणून कामाला येतात. असाच एक उपाय आहे आयुर्वेदिक काढा म्हणजेचं हर्बल टी, जो तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवू शकतो.
ही हर्बल टी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक भांड ठेवायचं. या भांड्यात एक कप पाणी टाकून ते उकळून घ्यायचं. हे पाणी उकळायला लागल्यावर त्यात एक चमचा सोफ टाकायची आणि एक चमचा हळद टाकायची. हे सगळं मिश्रण चांगलं उकळू द्यायचं.
उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग गाळणीने हर्बल टी गाळून घ्यायची. ही हर्बल टी नियमित केल्याने तुमच्या मासिक पाळी दरम्यानच्या अनेक समस्या सुटू शकतात.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा या 5 वस्तू
परंतु असा कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेण खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या जबाबदारीवरचं तुम्ही असे घरगुती उपाय करायला हवेत.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !