High Interest Rate Saving Schemes भारतीय माणूस बचतीवर खूप विश्वास करतो. दोन रुपये कमावले, तर एक रुपया खर्च करायचा आणि एक रुपया वाचवायचा, अशी प्रत्येक भारतीय माणसाची मानसिकता असते. भविष्यासाठी बचत करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. बचत आपला मोठा भाऊ असतो. जो वेळेवर कामाला येतो.
High Interest Rate Saving Schemes
परंतु बचत करून ती तशीचं बँक अकाउंटमध्ये किंवा घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे. बचत फायदेशीरही ठरली पाहिजे. त्यावर आपल्याला व्याज किंवा परतावा मिळाला पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळेचं आज आम्ही तुम्हाला सर्वात सुरक्षित आणि सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बचत योजनांबद्दल (High Interest Rate Saving Schemes) सांगणार आहोत. ज्या तुम्हाला नक्कीचं फायदेशीर ठरतील.
सरकारी बँकेमध्ये एफडी
आजकाल सरकारी आणि प्रायव्हेट बँका एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट ऑफर करतात. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारी बँकेत एफडी करणं, हे जास्त फायदेशीर आहे.
2023 मध्ये अनेक सरकारी बँकांनी त्यांचे एफडी इंटरेस्ट रेट वाढवलेले आहेत. एक वर्षांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या एफडीवर तुम्हाला जवळपास सात टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकतं
त्याचबरोबर जर तुम्ही वरिष्ठ नागरिक असाल, तर तुम्हाला आठ टक्क्यांपर्यंतही व्याज मिळू शकतं.
आता घरबसल्या असं उघड बँक अकाउंट
सरकारी बँकेमध्ये एफडी सर्वात सुरक्षित आणि जास्त व्याज देणारी बचत योजना मानली जाते. हा पर्याय तुमच्यासाठी नक्कीचं फायदेशीर ठरू शकतो.
पोस्टातील बचत योजना (High Interest Rate Saving Schemes)
सरकारी बँका जितक्या सुरक्षित आहे, तितकचं भारतीय पोस्टसुद्धा. पोस्टाच्याही अशा अनेक बचत योजना आहेत, ज्यामध्ये तुमचा पैसा सुरक्षित राहील आणि त्यावर तुम्हाला चांगला परतावाही मिळेल.
भारतीय पोस्ट अशा अनेक बचत योजना चालवतं. ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील, त्या खालीलप्रमाणे आहेत
१) पोस्टची मुदत ठेव योजना
बँकेतील एफडीप्रमाणेचं तुम्ही पोस्टात एक, दोन, तीन, चार वर्षांच्या मुदत ठेवीवर पैसे ठेवू शकता आणि सहा टक्क्यांपेक्षा जास्त व्याज तुम्हाला मिळू शकतं.
२) आरडी
पोस्टाची ही सर्वात प्रसिद्ध अशी बचत योजना आहे. येथे तुम्ही दरमहा पैसे जमा करू शकता आणि त्यावर तुम्हाला सात टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं.
किसान विकास पत्र या योजनेत तुम्हाला एक रकमी पैसे जमा करावे लागतात आणि जवळपास दहा वर्षांमध्ये ती रक्कम दुप्पट होते. एका ठराविक कालावधीनंतर तुम्ही तुमचे पैसे या योजनेतून काढून घेऊ शकता.
या (High Interest Rate Saving Schemes) योजनेत तुम्हाला सर्वाधिक व्याज मिळतं. तुम्ही एका वरिष्ठ नागरिकाच्या नावावर 15 लाख रुपयापर्यंत ठेवू शकतात आणि वार्षिक आठ टक्के व्याज मिळवू शकतात.
वरील योजनांबरोबरचं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफ या योजनांवरही तुम्ही जास्त व्याजदर मिळवू शकतात.
या सर्व बचत योजना सरकारी आहेत, सुरक्षित आहेत आणि चांगला व्याजदरही देतात
या High Interest Rate Saving Schemes लेखातील माहिती तुम्हाला फायदेशीर वाटली असेल, तर नक्कीच कमेंट करुन सांगा आणि आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !