High Interest On FD : या 5 बँका देताय FD वर सर्वाधिक व्याजदर

High Interest On FD

High Interest On FD माझ्याकडे काही पैसे आहेत, ते कोठे गुंतवायचे ? हा प्रश्न तुम्ही अनेकदा ऐकला असेल. तुमच्याकडे कुणी ना कुणी या प्रश्नाचं उत्तर मागितलं असेल. तुमचा सल्ला मागितला असेल. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना अनेक लोक शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवा, असं उत्तर देतात. तेव्हा समोरची व्यक्ती मला एकदम सुरक्षित पर्याय हवा आहे. मला बँकेत एफडी करायचीये, असं उत्तर देतात.

म्हणूनचं आज आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांची High Interest On FD नावे सांगणार आहोत, ज्या पाच बँका फिक्स डिपॉझिट म्हणजेचं एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. मग कोणत्या आहेत त्या बँका आणि त्या किती व्याज देत आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा

High Interest On FD टॉप 5 बँका

1) SBM बँक : SBM म्हणजेचं स्टेट बँक ऑफ मॉरिशसची इंडियन ब्रांच एसबीएम बँक सध्या 3 वर्षाच्या फिक्स डिपॉझिट वर 8.10 % व्याजदर देत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर 8.60 % आहे.

2) DCB बँक : DCB म्हणजेच डेव्हलपमेंट क्रेडिट बँक सध्या 3 वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर 8 % व्याजदर देत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर 8.60% आहे.

3) Yes बँक : देशातील मोठी खाजगी बँक येस बँक सध्या 3 वर्षांच्या फिक्स डिपॉझिट वर 7.75 % व्याजदर देत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर 8.25 % टक्के आहे.

4) Dutch बँक : डच बँक सध्या 3 वर्षाच्या फिक्स डिपॉझिटवर 7.75 % व्याजदर देत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठीही एवढंच व्याजदर दिलं जातंय.

5) इंडसइंड बँक : इंडसइंड बँक 3 वर्षांच्या फिक्स डिपॉझिटवर 7.50 % व्याजदर देत आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 8 % आहे.

तुम्ही म्हणाल की या सर्व High Interest On FD प्रायव्हेट बँका आहेत. जर तुम्हाला तुमचे पैसे एखाद्या सरकारी बँकेत सुरक्षितपणे गुंतवायचे असतील, तर सरकारी बँकाही सध्या फिक्स डिपॉझिटवर चांगलं व्याजदर देत आहेत.

तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील, तर तुम्ही कोठे गुंतवाल ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि गुंतवणुकीच्या इतर पर्यायांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top