He Mann Baware 2 : मृणाल दुसानिस आणि शशांक केतकरची 4 वर्षांनंतर भेट

He Mann Baware 2

He Mann Baware 2 कलर्स मराठीवरील काही मोजक्या मालिकांनीचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. अशीच एक मालिका होती हे मन बावरे. अनु आणि सिद्धार्थ या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 2018 मध्ये सुरू झालेली ही मालिका लॉकडाऊननंतर 2020 मध्ये बंद झाली. परंतु आजही प्रेक्षक अनु आणि सिद्धार्थच्या जोडीची आठवण काढतात.

आणि आता अनु सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हे मन बावरे 2 He Mann Baware 2 येणार का ? तर नाही या मालिकेत अनु आणि सिद्धार्थची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस या दोघांची भेट झालीये, तेही तब्बल चार वर्षानंतर.

He Mann Baware 2

आपल्या सर्वांना माहितीये की, हे मन बावरे संपल्यानंतर मृणाल दुसानिस तिच्या नवऱ्याकडे अमेरिकेत गेली होती आणि तेथे स्थायिक झाली. अमेरिकेतचं तिला नुर्वी नावाची मुलगीही झाली. आता चार वर्षानंतर मृणाल भारतात परतली आहे. आता ती भारतातचं राहणार आहे आणि अभिनय क्षेत्रात परतणार आहे.

नव्या नवरींसाठी सुंदर आणि सोपे उखाणे

यानिमित्ताने तिने शशांक केतकरची भेट घेतली. या दोघांनीही आपल्या भेटीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटोज थोड्याचं वेळात सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि सर्वांनाचं हे मन बावरे He Mann Baware 2 या मालिकेची आठवण झाली. सध्या शशांक मुरांबा या मालिकेत काम करतोय. तर मृणाल दुसानिस चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे.

तर तुम्हाला अनु आणि सिद्धार्थला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर He Mann Baware 2 पाहायला आवडेल का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top