हल्दीराम कंपनीची विक्री होणार ? हल्दीराम म्हटलं की, आठवते भारतातील सर्वात मोठी फूड बिजनेस कंपनी. आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमध्ये जन्म झालेली ही कंपनी आज देशातीलचं नाही, तर जगातील एक मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. पण आता चर्चा रंगलीये हल्दीराम कंपनीची विक्री होणार ? जगभरातील मोठ्या कंपन्या हल्दीरामला विकत घेण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
हल्दीराम कंपनीची विक्री होणार ?
हल्दीरामचा जन्म आपल्या नागपुरात झाला असला, तरी सध्या हल्दीराम वेगवेगळ्या ठिकाणावरून ऑपरेट होतेय. हल्दीराममध्ये 3 हिस्से आहेत. पहिला हिस्सा आहे नागपूरचे कमल किशन अग्रवाल यांचा, दुसरा आणि तिसरा हिस्सा आहे दिल्लीच्या मनोहर अग्रवाल आणि मधुसूदन अग्रवाल यांचा.
हल्दीराम विकली जाणार अशी चर्चा रंगली आहे. पण त्याआधी हे तीनही भाग एकत्र येणार आहेत आणि एक मोठी कंपनी तयार होईल, असंही सांगितलं जातंय. असं झालं तर नागपूरच्या कमल किशन अग्रवाल यांचा या मोठ्या कंपनीत 45% वाटा असेल, तर दिल्लीच्या मनोहर अग्रवाल आणि मधुसूदन अग्रवाल यांचा 55%.
काही दिवसांपूर्वी टाटा ही भारतीय कंपनी हल्दीरामला खरेदी करणार, अशी चर्चा रंगली होती. परंतु त्यानंतर त्या अफवा निघाल्या. आता अबुधाबी आणि सिंगापूर मधील मोठमोठ्या कंपन्या हल्दीरामला खरेदी करण्यात रस दाखवत आहेत.
Best Scooty Under Rs 1 Lakh पेक्षा कमी किमतीत टॉप 5 स्कुटी
सध्या हल्दीरामचं मार्केट कॅपिटल जवळपास 70000 कोटी रुपयांचं आहे आणि हल्दीराममध्ये 75 टक्के हिस्सा खरेदी करण्याचं या विदेशी कंपन्यांचं मत आहे. मिठाई तयार करण्यापासून सुरू झालेला हल्दीराम आज देशातील एक मोठा स्नॅक ब्रँड आहे. त्याचबरोबर देशभरात त्यांचे मोठमोठे रेस्टॉरंटसुद्धा आहेत.
तर तुम्हाला हल्दीरामचे कोणते पदार्थ आवडतात ? तुम्ही हल्दीरामच्या रेस्टॉरंटमध्ये कधी जेवण केलं आहे का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !