दूरदर्शनवरील गुमशूदा तलाश केंद्र हा कार्यक्रम आठवतोय का ?

गुमशूदा तलाश केंद्र

गुमशूदा तलाश केंद्र. सध्याच्या काळात मनोरंजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जसं की सिनेमा, टीव्ही, रेडिओ, मोबाईलवरील विविध अप्लिकेशन्स, परंतु काही वर्षांपूर्वी जेव्हा स्मार्टफोन्स नव्हते, तेव्हा सिनेमा आणि टेलिव्हिजन हे मनोरंजनाचे साधन होते.

आज टीव्हीवर शेकडो टीव्ही चॅनेल्स पाहायला मिळतात. त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. परंतु 80 आणि 90 च्या दशकात असं नव्हतं. फक्त दूरदर्शन हे एक सरकारी चॅनल होतं. ज्या चैनलवर मनोरंजनासाठी टीव्ही सिरीयल लागायच्या, चित्रपट दाखवले जायचे, न्यूजही दाखवल्या जायच्या, क्रिकेट सामने दाखवले जायचे, त्याचबरोबर रंगोलीसारख्या कार्यक्रमातून गाणीही दाखवली जायची.

गुमशूदा तलाश केंद्र

आजही त्या काळातील कार्यक्रमाबद्दल कोणी विचारलं किंवा तेव्हाचा एखादा व्हिडिओ पहायला मिळाला तरी लोकांना ते दिवस आठवतात. आता असाचं एक 80 आणि 90 च्या दशकातील दूरदर्शनवरील कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय.

गुमशूदा तलाश केंद्र
गुमशूदा तलाश केंद्र

या कार्यक्रमाचे नाव आहे गुमशुदा तलाश केंद्र. या कार्यक्रमात जे लोक हरवले आहेत, त्यांचे फोटोग्राफ दाखवले जायचे आणि एक नंबर दिला जायचा, ज्यावर कोणाला काही माहीत असेल तर संपर्क साधता येईल. या कार्यक्रमाच्या मदतीने अनेक हरवलेल्या लोकांना पुन्हा आपल्या कुटुंबाला भेटता आलं होतं.

Gumshuda Talash Kendra On Doordarshan

आजच्या काळात जर कुणी असं हरवलं, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली जाते. सगळीकडे ही पोस्ट व्हायरल केली जाते. परंतु 80 आणि 90 च्या दशकात सोशल मीडिया नव्हतं. स्मार्टफोन, इंटरनेट अशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. तेव्हा दूरदर्शनवरील हे गुमशूदा तलाश केंद्र अशा लोकांसाठी खूप महत्त्वाचं आणि फायदेशीर होतं.

गुमशूदा तलाश केंद्र
गुमशूदा तलाश केंद्र

आता टीव्हीवर सुरू असलेले कार्यक्रम असो किंवा न्यूज या सर्वांवरच टीका केली जाते, सगळं पैसा कमवण्यासाठी केलं जात आहे. त्यांना सामाजिक भान नाहीये, पैसे कमावण्याचा धंदा झालाय. अशी टीकाही केली जाते. परंतु 80 आणि 90 च्या दशकात दूरदर्शनवर जे कार्यक्रम दाखवले जायचे, त्यामध्ये सामाजिक भान जपलं जायचं.

जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का ?

आपण समाजाचं काहीतरी देण लागतो अशी भावना होती आणि समाजाला शिक्षित करण्याचं काम या कार्यक्रमांमधून व्हायचं. असाचं हा एक कार्यक्रम होता.

तर तुम्हाला आठवतो का गुमशूदा तलाश केंद्र हा कार्यक्रम ? 80 आणि 90 च्या दशकातील तुमचा फेवरेट कार्यक्रम कोणता ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top