Green Card Of America आपल्या देशात अनेकांना अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याची इच्छा आहे. अमेरिकेत नोकरी मिळवायची, मग तेथील ग्रीन कार्ड मिळवायचं आणि तेथेचं स्थायिक व्हायचं. अशा अनेकांच्या अपेक्षा आहेत. परंतु आता या अपेक्षांना एक खूप मोठा धक्का बसला आहे. मग हे प्रकरण नेमकं आहे तरी काय ? आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
सध्या कोणीही भारतीय अमेरिकेत नोकरीला जाऊ शकतं, तेथे नोकरीसाठी लागणारा विजा तुम्हाला मिळेल. शिक्षणासाठी लागणारा विजा तुम्हाला मिळेल. पण जर तुम्हाला अमेरिकेत स्थायिक व्हायचं असेल, अमेरिकेचा नागरिक व्हायचं असेल, अमेरिकेचं रेशन कार्ड म्हणजेचं ग्रीन कार्ड Green Card Of America मिळवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला आजपासून 200 वर्षांची वाट पाहावी लागणार आहे.
Green Card Of America
तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, माणसाचं आयुष्यमान एवढं नसतं. 200 वर्षे वाट कशी पाहणार ? मग हे सगळं का होतंय ? हे सगळं होतंय अमेरिकेतील एका कायद्यामुळे. सध्या अमेरिकेत काम करत असलेल्या 12 लाख भारतीयांनी अमेरिकेचं ग्रीन कार्ड Green Card Of America मिळावं म्हणून अर्ज केला आहे आणि 2030 पर्यंत ही संख्या 22 लाखांपर्यंत जाईल अशी शक्यता आहे.
परंतु अमेरिकेच्या कायद्यानुसार दरवर्षी फक्त 1 लाख 40 हजार इतर देशातील नागरिकांना अमेरिकेची नागरिकता म्हणजे ग्रीन कार्ड देता येतं. या 1 लाख 40 हजार लोकांपैकी काही देशांना 7 टक्के एवढा कोटा देण्यात आला आहे. भारतासाठी सुद्धा एवढाचं कोटा आहे.
अमेरिकेचं ग्रीन कार्ड कसं मिळवायचं ?
म्हणजेच या 1 लाख 40 हजार लोकांपैकी जवळपास 10 हजार भारतीयांना दरवर्षी अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळू शकतं. सध्या 12 लाख लोकांनी ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. या हिशोबाने पुढील 10 वर्षात फक्त 1 लाख लोकांना ग्रीन कार्ड मिळेल आणि आता जे 12 लाख लोक आहेत, त्यांना पुढील 120 वर्षांमध्ये ग्रीन कार्ड मिळू शकतं.
आजपासून पुढील काही वर्षात जे लोक ग्रीन कार्डसाठी अर्ज करणार आहेत, त्यांना जवळपास 200 वर्षे वाट पाहावी लागेल. त्याशिवाय त्यांना ग्रीन कार्ड मिळणार नाही. अमेरिका सरकारने आपला हा नियम बदलला, तरच त्यांना ग्रीन कार्ड मिळणं शक्य होईल. नाहीतर अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवणं आता जवळपास अशक्यचं आहे.
तर तुम्हाला अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचंय का ? तुम्हाला या नियमाबद्दल माहिती होती का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खुप खुप धन्यवाद !