GPT 4o Launch Open AI या कंपनीने GPT 4o लॉंच केलंय. Chat GPT नंतर Artificial Intelligence च्या क्षेत्रात क्रांती घडली. Chat GPT नंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी सुद्धा यावर काम करण्यास सुरुवात केलीये. परंतु Open AI ही कंपनी आता सर्वांच्या पुढे जाताना दिसतेय. भविष्यात या क्षेत्रात नक्कीचं क्रांती घडेल, असं म्हटलं जातंय.
GPT 4o Launch
आता Open AI ने आपलं नवीन प्रॉडक्ट GPT 4o लॉन्च केलंय. तुम्ही Google चं व्हॉइस असिस्टंट आणि Alexa नक्कीचं वापरत असाल. त्यासारखंच हे नवीन फिचर काम करतं. जर तुम्ही Chat GPT हे ॲप वापरत असाल, तर तुम्हाला GPT 4o वापरण्यासाठी इतर कोणतंही ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाहीये. या ॲपमध्ये तुम्हाला GPT 4o ऑप्शन मिळेल.
या कंपनीने लॉंच केली १५० किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक
Chat GPT मध्ये हेडफोनसारखा एक Icon तुम्हाला दिसेल. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवं ते या व्हॉइस असिस्टंटला विचारू शकता. ते तुमच्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. परंतु गुगलच्या व्हॉइस असिस्टंट किंवा अलेक्सा सारखं ऍक्टिव्हेट करण्यासाठी OK Google किंवा Hey alexa असं बोलण्याची काही गरज नाहीये. ते आधीपासूनचं ऍक्टिव्हेट असेल.
इंग्लिश, हिंदी, मराठी आणि इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये तुम्ही या व्हॉइस असिस्टंटबरोबर बोलू शकता आणि ते तुम्हाला त्याच भाषेमध्ये रिप्लाय करेल. ओपन एआय या कंपनीचा असा प्रयत्न आहे की, जेव्हा तुम्ही या व्हॉइस असिस्टंटबरोबर बोलाल, तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की, हा एखादा कॉम्प्युटर जनरेटेड आवाज आहे. तुम्ही एखाद्या खऱ्या व्यक्तीशी संभाषण करताय, असं तुम्हाला वाटायला हवं.
एकूणच Chat GPT नंतर AI क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. मोठंमोठ्या कंपन्या आपापले प्रोडक्स लॉन्च करत आहेत. AI क्षेत्रात भविष्यात खूप मोठी सुधारणा होईल आणि ते मानवाच्या विकासात योगदान करतील, की आणखीन काय घडेल, हे तर येणारा काळ सांगेल.
तर तुम्हाला काय वाटतं, याबद्दल नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !