Government Job In Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये भरती सुरु, दहावी पास उमेदवारांनी अर्ज करा

Government Job In Post Office

Government Job In Post Office आज आपल्या देशात नोकऱ्यांसाठी किती मारामारी आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. त्यातचं सरकारी नोकरी मिळवणं तर जवळपास अशक्यचं. त्यामुळे जेव्हा कधी एखाद्या सरकारी नोकरीची भरती सुरू होते, सगळेजण खूप एक्साईटेड असतात. म्हणूनचं आज आम्ही तुमच्यासाठी अशीचं एक सरकारी नोकरी घेऊन आलो आहोत.

Government Job In Post Office

ही सरकारी नोकरी आहे पोस्ट ऑफिसची. पोस्ट ऑफिसची नोकरी म्हणजे केंद्र सरकारची नोकरी. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये पगारही चांगला मिळतो. त्याचबरोबर पेन्शन, पीएफ अशा अनेक सुविधाही मिळतात.

पोस्ट ऑफिसच्या (Government Job In Post Office) कर्नाटक सर्कलमध्ये 27 ड्रायव्हरच्या पदांसाठी नोकर भरती सुरू झाली आहे. या पदासाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आल्यात. त्या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल, तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता.

FD बद्दल संपूर्ण माहिती मराठीत

पोस्ट ऑफिसमधील या पदासाठी उमेदवार कमीत कमी दहावी इयत्ता पास असायला हवा. त्याचबरोबर उमेदवारचे वय हे 18 ते 27 या वयोगटातील असायला हवं. ड्रायव्हर पदाची भरती आहे, म्हणून उमेदवाराला कमीत कमी तीन वर्षांचा जड आणि हलक वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा आणि उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असायला हवं.

पोस्ट ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट जॉब

आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की, या सरकारी नोकरीसाठी कसा आणि कधीपर्यंत अर्ज करता येतो. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 ही आहे. भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या संकेतस्थळावर मिळेल.

https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

जर तुम्हाला नोकरीची गरज असेल, तर तुम्ही नक्कीचं या नोकरीसाठी अर्ज करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला ही माहिती शेअर करू शकता. त्याला हा लेख नक्कीचं शेअर करा.

आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top