Gold Rate Today इन्व्हेस्टमेंट कुठे करायची ? हा प्रश्न सगळ्यांसमोरचं असतो. काही लोक बँकांमध्ये एफडी करतात, तर काही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात. परंतु भारतीय लोकांना सोन्याचं किती आकर्षण आहे, हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्यामुळेचं रोजच्या वापरासाठीचं नाही, तर गुंतवणुकीसाठीही अनेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात.
मागील काही महिन्यांमध्ये सोन्याच्या भावाने उच्चांक गाठलाय. 75 हजार रुपयांपेक्षा जास्त सोन्याचा भाव झाला होता. परंतु अक्षय तृतीया नंतर सोन्याच्या भावात घसरण झाली आणि आता 73 हजार रुपयांच्या आसपास सोनं आहे. मग आजचा सोन्याचा भाव नेमका किती आहे आणि भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये तो किती आहे ? आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
Gold Rate Today
देशाची राजधानी दिल्लीमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव 73 हजार 660 रुपये आहे. तर चांदीचा भाव 88 हजार 100 रुपये प्रति किलो.
ही तर झाली देशाच्या राजधानीची गोष्ट आता देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये सोन्याचा भाव किती आहे, ते जाणून घेऊया. मुंबईमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव आहे 73806 रुपये. तर चांदी 88 हजार 100 रुपयांमध्ये एक किलो मिळतेय.
चेन्नईमधील दहा ग्रॅम प्रति सोन्याचा भाव हा 73 हजार 100 रुपये असून चांदी मुंबईच्या भावातचं 88 हजार 100 रुपये प्रति किलोमध्ये मिळते.
मोबाईल हरवल्यास phone pe आणि google pay अकाउंट कसं बंद करायचं ?
देशातील चौथ महानगर कोलकत्यामध्ये सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव सर्वात कमी आहे आणि सोनं हे 73 हजार 100 रुपयांमध्ये मिळतंय.
म्हणजे एकूणचं देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईत सोन्याचा भाव सर्वात जास्त आहे, तर चांदीचा भाव हा सगळीकडे सारखा आहे. त्यामुळे सध्या सोन्याचा भाव उतरत असल्याने ज्या लोकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी योग्य वेळ आहे असं सांगितलं जातंय.
कारण येणाऱ्या काळात अनेक सणवार येणार आहेत. मग गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी सारख्या सणात सोन्याचा भाव नक्की वाढेल यात शंका नाही.
तर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी सोन्याचा विचार करतात का ? कोणत्या क्षेत्रात तुम्ही गुंतवणूक करणे योग्य मानतात ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !