Gold Mines In India : आपल्या भारतात या ठिकाणी आहेत सोन्याच्या खाणी, दरवर्षी एवढं सोनं निघतं की ….

Gold Mines In India

Gold Mines In India भारतीयांना सोनं या धातूची किती आवड आहे, हे काही वेगळ सांगण्याची गरज नाही. फक्त भारतीय स्त्रियाचं नाही, तर भारतीय पुरुषसुद्धा सोनं घालून मिरवतात. मग ते आपले लाडके बप्पी लहरी असो किंवा मग अनेक गोल्डमॅन. आपल्या देशात किती सोनं आहे, हे जर सांगायचं झालं, तर एका अहवालानुसार भारतीय स्त्रियांकडे 21000 टन सोन आहे आणि एवढं सोनं जगभरातील सर्वात मोठ्या पाच बँकांकडे सुद्धा नाही.

Gold Mines In India 

दरवर्षी भारतात जवळपास 800 टन सोन्याची खरेदी विक्री केली जाते. परंतु आपल्या देशातील खाणींमधून फक्त 2 टन सोनच मिळतं. म्हणजे 800 टन सोन हे आपल्या देशाला दुसऱ्या देशातून आयात करावं लागतं.

सोन्याचा भाव कोण ठरवतं ?

जगभरात सोन्याच्या जेवढ्या खाणी आहेत, त्यातून दरवर्षी 3000 टन सोन्याचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यापैकी जवळपास 27 ते 30 टक्के सोनं हे एकटं आपल्या देशात आयात केलं जातं. त्यामुळेच सोन्याच्या भावात जे चढ-उतार होत असतात, ते आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतं.

आपल्या भारतात या ठिकाणी आहेत सोन्याच्या खाणी

आता आम्ही तुम्हाला सांगतो की, आपल्या देशात सोन्याच्या खाणी कोठे कोठे (Gold Mines In India) आहेत. भारतातील सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन कर्नाटक राज्यात होतं. कर्नाटकातील कोलार एहूट्टी आणि उटी या दोन प्रमुख सोन्याच्या खाणी आहेत.

कर्नाटकशिवाय झारखंड आणि आंध्रप्रदेश येथे हिराबुद्दीनी आणि केंदृकोचा या सोन्याच्या खाणी आहेत.

तसं पाहायला गेलं, तर आपल्या देशामध्ये सोन्याच्या खाणींची संख्याही कमी (Gold Mines In India) आहेत आणि त्यातून उत्पादन होणारं सोनही कमी आहे. परंतु भारतीयांची सोन्याची आवड लक्षात घेता आपल्याला दरवर्षी विदेशातून शेकडो टन सोन आयात करावंच लागतं. कारण भारतात सोन्याला एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय समजलं जातं आणि आपल्या परंपरेमध्ये सोन्याला विशेष महत्त्वही आहे.

तर वाचकहो तुम्हाला (Gold Mines In India) सोनं घ्यायला आणि घालायला आवडतं का ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top