Gharoghari Matichya Chuli Serial Cast स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका सुरू झालीय. या मालिकेत रणदिवे या एकत्रित कुटुंबाची खूपच हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात येणार आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य एकमेकांच्या सुखात आणि दुःखात कसे एकमेकांच्या पाठीशी उभे राहून साथ देतात हा या मालिकेचा मुख्य विषय आहे. आजच्या काळात एकत्रित कुटुंबपद्धती नामशेष होत असताना ही मालिका आपल्या परंपरांना समाजात रुजवण्याचा खूप चांगला प्रयत्न करताना दिसतेय.
आज आपण या मालिकेच्या कलाकारांविषयी (Gharoghari Matichya Chuli Serial Cast) माहिती जाणून घेणार आहोत.
Gharoghari Matichya Chuli Serial Cast
1. रेश्मा शिंदे – रेश्मा या मालिकेत जानकी ही मुख्य भूमिका साकारतेय. ती रणदिवे कुटुंबाची मोठी सून आणि कुटुंबाची आधारस्तंभ असणार आहे. रंग माझा वेगळा मालिकेमुळे ती खूप लोकप्रिय झाली.
2. सुमित पुसावळे – सुमित या मालिकेत हृषीकेश रणदिवेची भूमिका साकारणार आहे. तो घरातील मोठा मुलगा आहे. बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतून तो घराघरात प्रसिद्ध झाला.
3. सविता प्रभुणे – त्या या मालिकेत सुमित्रा म्हणजे जानकीच्या सासूबाईंची भूमिका साकारणार आहेत.
4. प्रमोद पवार – हे या मालिकेत नानासाहेबांच्या भूमिकेत दिसतील. ते जानकीच्या सासऱ्यांच्या भूमिकेत दिसतील.
5. आरोही सांबरे – बालकलाकार आरोही या मालिकेत जानकीची मुलगी ओवीच्या भूमिकेत दिसेल.
6. आशुतोष पत्की – आशुतोष या मालिकेत सौमित्रच्या भूमिकेत दिसणार आहे. अगंबाई सासूबाई मालिकेमुळे तो खूप लोकप्रिय झाला.
7. उदय नेने – या मालिकेत उदय हा सारंगच्या भूमिकेत दिसणार आहे.
8. प्रतीक्षा मुणगेकर – प्रतीक्षा या मालिकेत ऐश्वर्याची भूमिका साकारणार आहे. ती मालिकेची मुख्य खलनायिका असणार आहे.
9. नयना आपटे – ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
10. अक्षय वाघमारे – अक्षय या मालिकेत शर्वरीच्या नवऱ्याच्या भूमिकेत आपल्याला दिसेल.
11. भक्ती देसाई – भक्ती या मालिकेत शर्वरीच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
12. सुनील गोडसे – अभिनेते सुनील गोडसे या मालिकेत सयाजीरावच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून खूप लोकप्रिय झाले.
13. गीता निखारगे – या मालिकेत कावेरीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
14. ऋतुजा कुलकर्णी – ऋतुजा या मालिकेत अवंतिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकार
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेची कथा आणि सर्वच कलाकार (Gharoghari Matichya Chuli Serial Cast) प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत. या मालिकेत अनेक उत्तम कलाकारांची फौज असणार आहे.
मनोरंजनविश्वातील अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !