गौरव मोरे हा सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर उभा आहे. त्याचं नशीब सध्या खूपच जोरावर आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा गाजवल्यानंतर आता तो ‘मॅडनेस मचाएंगे‘ या हिंदी कॉमेडी शोमध्येही चांगलाच चमकतोय. पण हे एवढं मोठं यश त्याने आपली जबरदस्त विनोदबुद्धी आणि कॉमेडी टायमिंगच्या जोरावर मिळवलं आहे.
कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने आज मनोरंजनसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. पण आज यशस्वी झाल्यानंतरही तो आपले जुने संघर्षाचे दिवस विसरलेला नाही. सध्या तो मॅडनेस मचाएंगे या हिंदी शोमध्ये काम करतोय. या कार्यक्रमादरम्यान त्याने आपल्या पहिल्या गाडीची आठवण सर्व प्रेक्षकांना सांगितली.
गौरव मोरे
प्रत्येक सामान्य माणसाप्रमाणेच आपली स्वतःची चारचाकी गाडी घेण्याचं गौरव मोरे चंही स्वप्न होतं.
त्याने सांगितलं की, बाहेर फिरायला गेल्यावर नेहमी असं वाटायचं की आपल्याकडे गाडी असायला पाहिजे. बस, ट्रेनचा प्रवास मला आवडतो. आतासुद्धा मी तसा प्रवास करू शकतो. माझे वडील नेहमी म्हणायचे आपल्या घरात चारचाकी गाडी पाहिजे. तेव्हा मी ठरवलं होतं की, सेकंड हँड असली तरी आपल्या घरात चारचाकी गाडी आली पाहिजे. कारण लोकांना वाटतं ज्याच्या घरासमोर कार आहे तो मोठा माणूस आहे.
Gaurav More Dream Car
एका शोमध्ये मी काम करत होतो. तिथे काम करून मी पैसे साठवले आणि गाडी घ्यायचं ठरवलं. तेव्हा समोरचा माणूस दीड लाखात कार देईन असं बोलला. मी त्याला म्हणालो, माझ्याकडे 1 लाख 10 हजार आहेत त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. मी माझ्या आईला त्याच्याकडे घेऊन गेलो, निदान आईचं ऐकून तरी तो पैसे कमी करेल. त्याला बोललो काहीही करून मला ही गाडी पाहिजे.
चला हवा येऊ द्या नंतर श्रेया बुगडे आता काय करते
माझी आईपण त्याला बोलली आम्हाला गाडी घ्यायचीच आहे. त्यावेळी गाडी पाहण्यासाठी मी आणि आई ऐरोलीला गेलो होतो. बाबांची इच्छा म्हणून गाडी घेतली पण तो आनंद पाहण्यासाठी माझे बाबा नव्हते. 2015 साली माझे बाबा गेले, मी गाडी थोडी उशिरा घेतली. कधी कधी वाईट वाटतं आज माझे बाबा सोडून सगळेजण माझ्या गाडीत बसतात. आपण नवीन गोष्टी विकत घेतो. पण आपण ज्यांच्यासाठी या गोष्टी घेतो ते लोक तरी आपल्याबरोबर पाहिजेत.
आता नवीन गाडी घेतल्यावर माझ्या बाबांचा फोटो माझ्याबरोबर ठेवतो असं तरी एकत्र फिरुया असा विचार करून स्वतःचं समाधान करून घेतो. आज फक्त बाबांच्या आशीर्वादामुळे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. असं गौरव म्हणाला.
गौरव मोरे च्या संघर्षाच्या काळातील हा अनुभव ऐकून उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं आणि सगळे भावूकही झाले होते.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !