Forehead Tanning Home Remedies मे महिना सुरू आहे आणि सूर्य आग ओकतोय. अनेकवेळेस तुम्हाला सल्ले दिले जात असतील की, उन्हामध्ये बाहेर निघू नका. परंतु अशी काही महत्त्वाची काम असतात, ज्यामुळे उन्हात बाहेर निघावंच लागतं. किंवा काही लोकांना नोकरीसाठी दिवसभर फिरावं लागतं. अशावेळेस घराबाहेर निघण्याशिवाय पर्याय नसतो.
परंतु उन्हात बाहेर फिरल्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि एक अशीच समस्या म्हणजे “कपाळ काळवंडण किंवा कपाळाचं टॅनिंग होण. (Forehead Tanning Home Remedies) अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. म्हणूनचं आज आम्ही तुम्हाला कपाळाचं टॅनिंग दूर कसं करायचं, याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत, घरगुती उपाय सांगणार आहोत.
Forehead Tanning Home Remedies
कपाळ काळवंडण किंवा कपाळाचं टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती उपाय
1) चेहऱ्यावर तजेलदारपणा आणण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे “दूध आणि हळद यांचा लेप लावणं.” हळद किती गुणकारी असते, हे सर्वांनाचं माहित आहे. कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट असले तरी त्यामध्ये हमखास हळदीचा वापर होतोचं. म्हणूनचं तुम्ही हळद आणि दुधाचा लेप 15 ते 20 मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवला आणि मग धुतला, तर कपाळ टॅनिंगच्या समस्येत तुम्हाला फायदा होऊ शकतो.
2) हळद आणि दुधाप्रमाणेचं लिंबाचा रस आणि मध या दोघांचं मिश्रणसुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं. हळद आणि दुधाचं मिश्रण जसं १५ मिनिट त्वचेवर लावलं जातं, तसंच लिंबाचा रस आणि मधाचा एक फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावायचा आणि पंधरा मिनिटांनी धुऊन टाकायचा, याचाही फायदा तुमचा चेहरा उजळण्यास होतो.
3) एकूणचं सध्या सगळेचं आयुर्वेदिक आणि नॅचरल गोष्टींकडे वळत आहे. फळांचे फेसपॅकही चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतात. आपण मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे फ्रुट फेसपॅक पाहतो. परंतु यामध्ये खरोखरचं फळ वापरली आहेत की नाही, कोणास ठाऊक ? त्यामुळे घरोघरी सहज उपलब्ध असणारी पपई आणि काकडी यांसारख्या फळांचा घरही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. ते खूप फायदेशीर असतं. ज्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार दिसेल.
परंतु हे सगळे उपाय झाले कपाळ काळवंडल्यानंतर किंवा टॅनिंग झाल्यानंतरचे. परंतु असं होऊ नये, हे वाटत असेल तर सनस्क्रीन हे नेहमी वापरत जा. म्हणजे ही समस्या उद्भवणारचं नाही.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, ही Forehead Tanning Home Remedies माहिती फायदेशीर वाटली असल्यास नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !