First Love Letter Marathi Story शिल्पा मागील दोन तासांपासून विचार करत बसली होती की, प्रेमपत्र लिहायला कशी सुरुवात करावी ? दीपकच्या प्रेमपत्राला उत्तर कसं द्यावं, हाच प्रश्न तिच्यासमोर होता.
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असलेली शिल्पा खूप सुंदर होती. कॉलेजमधील अनेक मुलांनी तिला विचारलं होतं, माझं तुझ्यावर प्रेम आहे. परंतु तिने सर्वांना नकार दिला होता. परंतु कॉलेजच्या दीड वर्षानंतर दीपकने तिला विचारलं आणि ती काहीच बोलू शकली नाही. कारण तिचंही दीपकवर प्रेम होतं.
कॉलेजच्या पहिल्या दिवशीचं दीपक आणि शिल्पाची पहिली भेट झाली होती. दोघेही एकाचं वर्गात होते आणि शेजार शेजारच्या बाकावरचं बसले होते. शिल्पा ही आई वडिलांचा धाक असलेली संस्कारी मुलगी होती. तर दीपक हा सुद्धा एक हुशार मुलगा होता, जो आपल्या अभ्यासाची पुस्तकं सोडून इकडे तिकडे पाहतही नव्हता.
First Love Letter Marathi Story
दीपकने आपला परिचय देताना सांगितलं की, तो खूप छान कविता करतो. शिक्षकांनी त्याला एक कविता म्हणायला लावली तर, त्याने खूपच सुंदर कविता म्हणून दाखवली आणि ही कविता ऐकताचं शिल्पा खूप इम्प्रेस झाली होती आणि हळूहळू मग ती त्याच्या प्रेमातचं पडली.
तसा दीपकसुद्धा दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे डोळे वर करून पाहत नव्हता. परंतु शिल्प होतीचं एवढी सुंदर आणि सोजवळ की, तोही हळूहळू तिच्या प्रेमात पडत गेला आणि नंतर तर त्याच्या अनेक कविता आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल आणि शिल्पावरचं बेतलेल्या असायच्या.
परंतु तरीही या दोघांमध्ये खूपचं मोजकं बोलणं व्हायचं, तेही अभ्यासाबद्दलं. दोघे एकमेकांकडे चोरून पाहायचे, परंतु एकमेकांशी बोलण्याची त्यांची कधी हिंमत होत नव्हती. आता मात्र दीपकने हिंमत केली होती आणि चक्क शिल्पाला एक प्रेम पत्र लिहिलं होतं. शिल्पाबद्दल त्याला काय वाटतं, हे सगळं त्याने त्या पत्रात मांडलं होतं.
हे पत्र वाचून शिल्पासमोर हाचं प्रश्न होता की, दीपकच्या त्या पत्राला कसं उत्तर द्यावं. बऱ्याचं मेहनतीनंतर ती विचार करते आणि आपलं पहिला शब्द लिहिते, ‘प्रिय दीपक. खरं सांगायचं तर मी सुद्धा जेव्हा तुझी कविता पहिल्यांदा ऐकली होती, तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले होते. परंतु मला हे मान्य करायला जवळपास दीड वर्ष लागलं. मी अनेकवेळेस तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, हिम्मतचं झाली नाही.
माझं पहिलं प्रेमपत्र मराठी गोष्ट
दीपक तुझ्या कविता खूप छान असतात आणि तू माझ्यासाठी ज्या कविता करतोस, त्या तर मला खूपचं आवडतात. First Love Letter Marathi Story पण असं नको समजू की, मला फक्त तुझ्या कविता आवडतात, तर मला तुही खूप आवडतो. कॉलेजमध्ये अशी अनेक टवाळखोर मुलं आहेत, जी दिवसभर काही न करता अशीचं फिरत असतात. पण तू तसा नाहीस. दिवसभर तुझं अभ्यासात लक्ष असतं. वर्गातही तू पहिला येतोस. आजच्या काळातही तुझ्यासारखी चांगली मुलं आहेत. यावर माझा विश्वासचं बसत नाही.
दीपक मला तुला एक सांगायचंय, मला विश्वास आहे, तू नक्कीचं समजून घेशील. तू तुझ्या पत्रामध्ये लिहिलं होतं की, तू माझ्यावर प्रेम करतोस. तसंच मीही तुझ्यावर प्रेम करते. परंतु यापेक्षा जास्त आपल्यामध्ये काही होऊ शकेल, असं मला वाटत नाही. कारण माझे बाबा, माझं कुटुंब हे खूप कडक आहे. मी कडक शिस्तीत वाढलेले आहे. त्यांना असं प्रेम वगैरे नाही आवडायचं.
त्यामुळे तू मला पाठवलेलं आणि मी तुला हे पाठवलेलं हे आपलं पहिलं आणि शेवटचं प्रेमपत्र आहे. यानंतर असं कोणतंही प्रेम पत्र मला पाठवू नकोस. कारण जर ते माझ्या बाबाच्या आणि कुटुंबाच्या हाती सापडलं, तर तो माझ्या कॉलेजचा शेवटचा दिवस असेल. दुसऱ्या दिवशी माझे बाबा माझं लग्न करून देतील.
Marathi Goshta
फक्त तीच एक भीती नाहीये, तर मला कोणालाही दुखवायचं नाहीये. माझ्या आई-बाबांनी खूप कष्टातून मला वाढवलंय, मोठं केलंय. ते माझं शिक्षण करत आहेत आणि असं प्रेम वगैरे करून मला त्यांना मान खाली घालायला नाही लावायची. मी त्यांच्या मर्जीनेचं लग्न करेल. ते ज्या मुलाशी म्हणतील, त्या मुलाशी मी लग्न करेल. First Love Letter Marathi Story
मला आधी असं वाटायचं की, प्रेम वगैरे संकल्पना फक्त चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्येचं असतात, खऱ्या आयुष्यात नसतात. परंतु प्रेम असतं, हे मला आता पटतंय. तू एखादा दिवस कॉलेजमध्ये नाही आला, तर माझी नजर दिवसभर तुला शोधत असते. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे, पण आपल्यात यापेक्षा जास्त काहीही होऊ शकत नाही, हेही तेवढचं खरं आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कदाचित अशी वेळ येतचं असेल की, पहिलं प्रेम होतं परंतु ते कधीही आयुष्यभरासाठी नसतं. First Love Letter Marathi Story. त्यामुळे तू मला विसरून जा. मीही तुला विसरून जाईल. हो मला माहित आहे, आपल्याला खूप त्रास होईल. परंतु माझ्या कुटुंबासाठी आणि आई बाबांसाठी मला हे सहन करावंच लागेल.
दीपक मला माहित आहे, तुला वाईट वाटत असेल की, पहिल्याचं प्रेम पत्रात First Love Letter Marathi Story मी तुझ्याशी हे बोलतेय. परंतु तू माझी बाजू समजून घे. तुला नक्कीच माझ्यापेक्षाही जास्त सुंदर आणि चांगली मुलगी मिळेल. पण मलाही माहित आहे की, तुझ्यासारखा दुसरा चांगला मुलगा मला नाही भेटणार. प्लीज मला माफ कर.
हे पत्र First Love Letter Marathi Story लिहीत असताना शिल्पाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. परंतु प्रेम वगैरे आपण नाही करू शकत, हेही तिला माहीत असतं आणि ती या पत्राचा शेवट करते.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला First Love Letter Marathi Storyआजची कथा. नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा. धन्यवाद !