Father Sacrifice Marathi Story “बाबा तुम्ही फक्त माझे वडील नाही, तर देव आहात माझ्यासाठी देव. आज तुम्ही मला दुसऱ्यांदा जन्म दिला आहे. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही.” असं म्हणून कृष्णा त्याच्या बाबांच्या दिनकररावांच्या पायावर डोकं ठेवतो आणि रडू लागतो.
दिनकरराव त्याला म्हणतात, “अरे बाळा बाप आहे मी तुझा. जन्माला आला तेव्हा एवढासा होतास, तुला हातात घेतलं आणि ठरवलं होतं की, याला आयुष्यात कधीही कोणती अडचण येऊ द्यायची नाही. आयुष्याच्या कोणत्याही संकटात याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि आता तर खरी वेळ आहे तुला साथ देण्याची. मग अशावेळेस तुझा हा बाप नाही उभा राहणार तुझ्या पाठीशी, तर कोण राहणार ?”
Father Sacrifice Marathi Story
कृष्णाची बायको तनवी पुढे येते आणि म्हणते, “बाबा तुम्ही देवासारखे धावून आला आहात. तुम्ही म्हणताय की, तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही पूर्ण करताय, परंतु जेव्हा आम्हाला कळलं, कृष्णाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत Father Sacrifice Marathi Story आणि लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन करावं लागेल, कमीत कमी एक किडनी त्याचा बसवावी लागेल, तेव्हा आम्ही पूर्णपणे हादरून गेलो होतो. आम्ही किडनीसाठी किती लोकांच्या हाता पाया जोडल्या. कितीही पैसे द्यायला आम्ही तयार होतो. पण कुणीही तयार झालं नाही. पण तुम्ही तयार झालात. आता तुमचंही वय झालंय. Father Sacrifice Marathi Story हे किडनीचं ऑपरेशन तुमच्याही जीवावर बेतू शकतं. परंतु स्वतःच्या जीवाचा विचार न करता तुम्ही हो म्हटलात. तुम्ही खरंच आमच्यावर खूप उपकार केले आहेत.” असं म्हणून तनवी दिनकरावांच्या पाया पडते.
दिनकररावांची बायको आणि कृष्णाची आई सावित्री म्हणते, “सुनबाई आई वडील कधीही त्यांच्या मुलांवर उपकार नाही करत, Father Sacrifice Marathi Story फक्त प्रेम करतात, माया करतात. आता नाही कळायचं तुला. जेव्हा तुला मुलं होतील ना, तेव्हा कळेल.”
असं म्हणून सावित्री तनवीला जवळ घेते. दिनकरराव कृष्णाला मिठी मारतात. पुढील काही दिवसांमध्ये कृष्णा आणि दिनकरराव या दोघांचंही ऑपरेशन होतं. Father Sacrifice Marathi Story दिनकररावांची एक किडनी काढून कृष्णाच्या शरीरात बसवली जाते. त्यामुळे कृष्णाचा जीव वाचतो आणि त्याच्या आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात होते.
कृष्णा आणि तन्वी दोघेही शहरात एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करायचे. तर दिनकरराव आणि सावित्री रिटायर शिक्षक. शहराजवळील एका मोठ्या गावात राहायचे. Father Sacrifice Marathi Story तेथे त्यांचा ऐसपैस बंगला होता, पैसा अडका होता. त्यामुळे शहरात मुलाकडे येऊन रहायचा, त्यांचा कोणताही विचार नव्हता. परंतु दर पंधरा दिवसाला ते नक्कीच त्यांना भेट द्यायचे.
दूर राहत असल्यामुळे त्या सर्वांमध्ये चांगलं प्रेमही होतं. त्यांचं एकमेकांशी पटायचं आणि आता दिनकररावांनी इतका मोठा त्याग केल्यामुळे तर कृष्ण आणि तन्वी साठी ते देवचं बनले होते. Father Sacrifice Marathi Story या घटनेला एक वर्ष उलटून जातं. सगळे खुश असतात. पण एक दिवस अचानक कृष्णाची आई सावित्री चक्कर येऊन पडते.
दिनकरराव खूप घाबरतात आणि सावित्रीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. सावित्रीच्या सगळ्या टेस्ट केल्या जातात. Father Sacrifice Marathi Story तेव्हा समजतं की, सावित्रीला ब्रेन ट्युमर झाला आहे आणि लवकरात लवकर तिची सर्जरी करावी लागेल. दिनकरराव डॉक्टरांना म्हणतात, “डॉक्टर आजचं स्थिती सर्जरी करा. लागेल तितका पैसा द्यायला मी तयार आहे. पण तिला काही व्हायला नको.”
डॉक्टर म्हणतात, “मी तुम्हाला तेच सांगणारचं होतो. त्यांची सर्जरी खूप खर्चिक असणार आहे. जवळपास 70 ते 80 लाख रुपये लागतील.” हे ऐकून दिनकररावांच्या पायाखालची जमीनचं सरकते. डॉक्टर म्हणतात, Father Sacrifice Marathi Story “हा खर्च तुम्हाला जास्त वाटत असेल, परंतु ही एक युनिक केस आहे यासाठी आम्हाला शहरातून मोठ्या डॉक्टरांना बोलवावं लागेल.” दिनकरराव म्हणतात, “तुम्ही तयारी करा, मी लवकरात लवकर पैसे अरेंज करतो.”
दिनकरराव घरी येतात आणि विचार करू लागतात की, आता पैशांचं काय करायचं ? ते स्वतः आणि सावित्री रिटायर झाल्यानंतर त्यांनी फंड आणि ग्रॅज्युटीचा पैसा कृष्णाला शहरात फ्लॅट घेण्यासाठी दिला होता Father Sacrifice Marathi Story आणि कृष्णाने शहराच्या मध्यवर्ती भागात एक कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला. आता या दोघांकडे थोडेफार पैसे, सोनं आणि महिन्याकाठी मिळणारी पेन्शनचं होती. त्यामुळे 70-80 लाख रुपये जमा होणं अशक्य होतं.
दिनकरराव विचार करतात की, “त्यांचं गावातील राहतं घर विकून टाकावं. परंतु या घराचेही चाळीस-पन्नास लाखाच्या वर कुणी द्यायला तयार नव्हतं. त्यामुळे दिनकरराव ठरवतात, कृष्णाशी बोलावं. Father Sacrifice Marathi Story असा विचार करून ते कृष्णाच्या घरी पोहोचतात. बाबांना पाहून कृष्णा आणि तनवीला खूप आनंद होतो आणि ते विचारतात, “बाबा असे अचानक कसे आलात आणि एकटेच आलात का ? आई कुठे आहे ?”
दिनकरराव खूप घाबरलेले असतात. ते म्हणतात,”कसं सांगावं कळत नाहीये. आज सकाळी तुझ्या आईला चक्कर आली. मी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. Father Sacrifice Marathi Story सगळ्या टेस्ट झाल्या, तर तिला ब्रेन ट्यूमर आहे असं कळलं आणि लवकरचं तिचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च 70-80 लाख रुपये सांगितला आहे.”
हे ऐकून कृष्णा आणि तनवीलाही मोठा धक्काचं बसतो. दिनकरराव म्हणतात, “माझं गावाकडचं राहतं घर आणि आमचं जे काही सेविंग आहे, Father Sacrifice Marathi Story त्यात मी 50 लाखाच्या आसपास जमवेल. पण वीस पंचवीस लाख रुपये कमी पडत आहे. एवढ्या लवकर दुसर कोणी पैसे देणार नाही. पण तुम्हाला दोघांना नक्कीचं सोय करता येईल.”
कृष्णा आणि तन्वी एकमेकांकडे पाहू लागतात. कृष्णा म्हणतो, “बाबा पण एवढ्या लवकर पैशांची सोय आम्ही तरी कशी करणार ?” दिनकरराव म्हणतात, “का नाही जमायचं ? Father Sacrifice Marathi Story आजकाल तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असतात. प्रॉव्हिडंट फंड वर तुम्हाला ऑनलाईन कर्ज घेता येतं. पर्सनल लोन आहे. एवढचं नाही तर तुमच्या कंपनीमध्येसुद्धा इमरजन्सी फंड असतात ना, त्यातून तुम्हाला पैसे काढता येतील. तुम्ही जर प्रयत्न केले, तर उद्या दुपारपर्यंत नक्कीच पैशांची सोय होऊ शकते.”
तनवी म्हणते, “बाबा तुम्ही खरं बोलताय, परंतु तुम्ही स्वतःच म्हणालात ना की, तुमच्याकडे आता फक्त 50 लाख रुपये आहेत. Father Sacrifice Marathi Story त्यातही तुम्ही राहता घर विकताय, सोनं, सेविंग सगळं देताय. मग आम्ही जे वीस पंचवीस लाखांचं लोन काढू, त्याचं काय ? ते कोणी फेडायचं ?” हे एकूण दिनकररावांना मोठा धक्काचं बसतो आणि ते विचारतात, “कोणी फेडायचं म्हणजे ? स्वतःच्या आईसाठी तुम्ही एवढही करू शकत नाही का ?”
कृष्णा घाबरत म्हणतो, “बाबा करू शकतो ना, परंतु आता कुठे आमच्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. Father Sacrifice Marathi Story आम्हाला अजून बाळ व्हायचंय. आमची किती हौस बाकी आहे. आम्ही वीस पंचवीस लाखाचं लोन फेडत बसलो, तर आमची सेविंग कशी होणार, आमच्या आयुष्यात पुढे काय होणार ?”
दिनकररावांना खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात, “कृष्णा हे तुझं राहतं घर मी तुला एक कोटी रुपयांना घेऊन दिलंय. ते एक कोटी रुपये जर मी माझ्याकडे ठेवले असते ना, Father Sacrifice Marathi Story तर आज तुझ्यासमोर असे हात पसरायची वेळ नसती आली माझ्यावर. जेव्हा तुला किडनीची गरज होती, तेव्हा तुला मी दिली नसती, तर तुला बाहेरून 25-30 लाख रुपयाला किडनी विकत घ्यावी लागली असती. तेव्हा ते पैसे दिलेचं असते ना रे तू.”
कृष्णा मान खाली घालतो. तर तन्वी चिडून म्हणते, “बाबा तेव्हा तर तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतात की, Father Sacrifice Marathi Story आम्ही आईबाप आहोत. आम्ही आई बापाचं कर्तव्य करतोय. आई बाप मुलांवर उपकार करत नाही. मग आता कशाला बोलून दाखवताय ?”
दिनकरराव म्हणतात, “कारण तुम्ही नालायकासारखे वागताय. जसं आई बापाचं कर्तव्य असतं ना, ते आपल्या मुलांवर कधी उपकार नाही करत. तसंचं मुलांचंही कर्तव्य असतं. त्यांनी स्वतःच्या हौसेचा, Father Sacrifice Marathi Story भविष्याचा विचार न करता आई बापासाठी करायचं असतं. तुझ्या जागी जर मी असतो ना आणि माझ्या आईला अशी गरज असती, तर हे राहतं घर विकलं असतं, पण आई बापाला गावाकडचं घर विकू दिलं नसतं. कारण तुझ्यासमोर अजून संपूर्ण आयुष्य बाकी आहे. तसं आमच्या आयुष्याचे शेवटचे दिवस आहेत.”
कृष्णा म्हणतो, “तेच तर बाबा, आमचं संपूर्ण आयुष्य बाकी आहे. आम्हाला पैशाची, या घराची जास्त गरज आहे. तुमचं आणि आईचं आयुष्य झालंय जगून.” Father Sacrifice Marathi Story कृष्णाचे हे शब्द दिनकररावांच्या कानात गरमागरम तेल ओतल्यासारखे पडतात. त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते म्हणतात, “मग तुला काय म्हणायचंय, तुझ्या आईला तसचं मरू देऊ का ? कारण आमचं आयुष्य तर जगून झालंय ना. आता तिचं ऑपरेशन करून तरी काय फायदा ?”
कृष्णा आणि तन्वी एक शब्दही बोलत नाही. दिनकरराव म्हणतात, “आता तुम्ही काही नाही बोलणार. परंतु तुम्हाला जे बोलायचंय, ते मला कळून चुकलंय. मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला आहे. Father Sacrifice Marathi Story मी एक शिक्षक होतो, परंतु तुम्ही मला आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवलाय आणि तो म्हणजे, आई बापाने मुलांसाठी सगळं करावं. त्यांनी कधी स्वार्थी असू नये. परंतु स्वतःची सोय त्यांनी सर्वात आधी पहावी.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुरेल, एवढ स्वतःजवळ ठेवावं आणि मगच उरलेलं मुलांना द्यावं. Father Sacrifice Marathi Story आजच्या काळाची ती गरज आहे आणि प्रत्येक आई बापाने तसंच करायला पाहिजे.” कृष्णा आणि तन्वी दोघेही मान खाली घालतात. दिनकरराव तेथून निघून जातात.
दिनकरराव हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. आता काय करायचं, एवढे पैसे कुठून आणायचे, हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेवढ्यात ऑपरेशनसाठी शहरातून एक मोठा डॉक्टर तेथे येतो. Father Sacrifice Marathi Story हॉस्पिटलमधील डॉक्टर या शहरातील मोठ्या डॉक्टरांची ओळख दिनकररावांबरोबर करून देतात आणि म्हणतात, “हे आहेत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर तेजस सावंत.”
दिनकरराव डॉक्टरांना हात जोडून नमस्कार करतात. तेव्हा तेजस त्यांच्याकडे पाहून म्हणतो, “तुम्ही दिनकर सर आहात ना, याच गावातील शाळेमध्ये शिकवायचे ?” Father Sacrifice Marathi Story दिनकरराव मान डोलावतात. तर डॉक्टर तेजस चक्क त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, “सर मला नाही ओळखलं का ? मी तेजस सावंत तुमचा विद्यार्थी.”
दिनकरराव त्याला ओळखतात आणि म्हणतात, “हो ओळखलं, डॉक्टर झालास का तू ? खूप हुशार होतास लहानपणापासूनचं.” डॉक्टर तेजस म्हणतो, Father Sacrifice Marathi Story “नाही सर एवढा हुशार नव्हतो मी. तुमच्या एका उपदेशामुळेचं माझ्या आयुष्यात बदल घडला आणि आज मी डॉक्टर बनू शकलो. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. ते सगळं जाऊ द्या, तुम्ही इथे काय करताय ?”
हॉस्पिटलमधील डॉक्टर तेजसला सगळं सांगतात. डॉक्टर तेजस म्हणतो, “सर तुम्ही काळजी करू नका. मी सावित्री मॅडमला काही होऊ देणार नाही. त्यांना नक्कीचं बर करेल.” दिनकरराव हात जोडून म्हणतात, “पण तेजस माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत रे. Father Sacrifice Marathi Story 25 लाख रुपये कमी पडताय. मी माझं घर, सगळी प्रॉपर्टी विकली. तरीही फक्त 50 लाख रुपये जमले. डॉक्टरांनी 75 लाख रुपये खर्च सांगितलाय ऑपरेशनचा.”
तेजस दिनकररावाला म्हणतो, “प्लिज सर तुम्ही हात जोडू नका. तुम्हाला या ऑपरेशनसाठी एक रुपयाही लागणार नाही. Father Sacrifice Marathi Story मी सगळं अरेंज करतो. मी माझी फी घेणार नाही आणि एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ऑपरेशन फ्री होईल, याची काळजी मी घेतो.” हे ऐकून दिनकररावांना खूप आनंद होतो. तेजस ऑपरेशनसाठी जातो.
सलग काही तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टर तेजस ऑपरेशन रूमच्या बाहेर येतो. तेव्हा दिनकरराव विचारतात, “काय झालं ?” तेजस सांगतो, “सर मॅडम पूर्णपणे बऱ्या आहेत. Father Sacrifice Marathi Story तुम्ही थोड्या वेळानंतर त्यांना भेटू शकता. आता त्यांना कोणताही धोका नाहीये.” दिनकररावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते म्हणतात, “तू जरी माझा विद्यार्थी असला, तरी आज माझ्यासाठी देव आहेस.”
डॉक्टर तेजस म्हणतो, “नाही सर, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. आज मी जे काय आहे, ते फक्त तुमच्यामुळे. Father Sacrifice Marathi Story तुमच्यासारखे शिक्षक असतील, तर या जगात प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्ग सापडेल. कोणताही विद्यार्थी कधी भरकटणार नाही.”
काही दिवसानंतर दिनकरराव सावित्रीला घेऊन हॉस्पिटलमधून घरी येतात. सावित्री पूर्णपणे बरी झालेली असते. त्या दिवसानंतर ते पुन्हा कधीही कृष्ण आणि तनवीचं तोंड पाहत नाही. Father Sacrifice Marathi Story तर दुसरीकडे कृष्णाला जी दिनकररावांची किडनी बसवलेली असते. ती पुन्हा एकदा फेल होते आणि नवीन किडनी बसवण्यासाठी कृष्णा आणि तन्वीला त्यांचं राहतं घर विकावं लागतं आणि ते भाड्याच्या घरात राहतात.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !