Father Daughter Marathi Story मुलगी विकणे आहे ! जन्मदात्या बापाने मुलीबरोबर असं का केलं ?

Father Daughter Marathi Story 

Father Daughter Marathi Story प्रथमेश आणि प्रतीक्षाचं आज लग्न होतं. दोघेही खूप खुश होते. या दोघांची कॉलेजमधली ओळख. प्रथमेश हा प्रतीक्षापेक्षा दोन वर्षांनी सीनियर होता. ज्या दिवशी प्रतीक्षाने पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाय ठेवला आणि प्रथमेशची नजर तिच्यावर पडली, त्या पहिल्याचं नजरेत तो तिच्या प्रेमात पडला होता.

सहा महिने तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. दिवसेंदिवस तो तिच्या आणखीनचं प्रेमात पडत चालला, परंतु प्रतीक्षाला लग्नाबद्दल विचारायची त्याची हिंमत होत नव्हती. शेवटी एक दिवस त्याने हिम्मत केली आणि प्रतीक्षाला लग्नाबद्दल विचारलं, तेव्हा प्रतीक्षा त्याला म्हणाली, “मी कधीही लव मॅरेज करणार नाही. मी माझ्या बाबांच्या इच्छेनुसारचं लग्न करणार. त्यामुळे जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल, तर माझ्या घरी मला मागणी घालायला ये. जर माझे बाबा हो म्हणाले, तरचं मी तुझ्याशी लग्न करेल.

Father Daughter Marathi Story 

प्रथमेश यासाठी तयार झाला. त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एक चांगली नोकरी मिळाल्यानंतर आपल्या आई-बाबांना घेऊन तो प्रतीक्षाच्या घरी गेला होता. Father Daughter Marathi Story त्याने प्रतीक्षाच्या बाबांकडे प्रतीक्षाचा हात मागितला आणि प्रतीक्षाचे बाबाही या लग्नाला तयार झाले होते. आज या दोघांचं लग्न होत होतं.

प्रतीक्षा आणि प्रथमेश हे दोघेही लग्न मंडपात येतात. दोघेही खूपच सुंदर दिसत असतात. प्रथमेश तर प्रतीक्षा कडे एकटक पाहतचं राहतो. प्रतीक्षा खूप लाजते. दोघे पूजेसाठी शेजारी बसतात. Father Daughter Marathi Story तेवढ्यात मंडपात काहीतरी गडबड गोंधळ सुरू होतो. प्रथमेशचा मोठा भाऊ त्याच्या कानात काहीतरी पुटपुटतो. प्रथमेशला मोठा धक्काचं बसतो आणि तो काही न बोलता लग्न मंडपातून उठून जातो.

प्रतीक्षाला काही समजतचं नाही की, हे काय चाललंय. प्रतिक्षाचे बाबा तेथे येतात आणि ते प्रतीक्षाला म्हणतात, “पोरी माफ कर मला. तुझ्या बापाची लायकी नाहीये, एवढे पैसे देण्याची. तुझा होणारा नवरा आणि त्याचं कुटुंब खूप मोठा हुंडा मागतंय. माझ्याकडे नाहीत तेवढे पैसे. हे लग्न नाही होऊ शकत.” Father Daughter Marathi Story प्रतीक्षाला मोठा धक्काच बसतो. प्रथमेश आपल्याशी लग्न करण्यासाठी बाबांकडून हुंडा मागतोय, यावर तिचा विश्वासचं बसत नाही. ती खूप चिडते आणि विचारते, “बाबा कोठे आहे तो प्रथमेश ? आजच्या काळात तो हुंडा मागत असेल, अशी कुप्रथा पाळत असेल, तर मलाचं त्याच्याशी लग्न करायचं नाहीये.”

असं म्हणून प्रतीक्षा रागारागाने प्रथमेशजवळ जाते. प्रथमेश आपल्या बाबांशी आणि मोठ्या भावाशी बोलत असतो. प्रतीक्षा त्याला म्हणते, “मला नव्हतं वाटलं, तू इतका नालायक असशील. तू माझ्यावर प्रेम करायचा ना, Father Daughter Marathi Story लग्नाची मागणी घातली होतीस मला आणि आता तूचं माझ्याशी लग्न करायला हुंडा मागतोय का ? तुझी हिम्मत कशी झाली असं करायला ? मी तुला नाही सोडणार. तुझ्यासारख्या माणसांना तर पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे.

प्रथमेश म्हणतो, “बस झालं प्रतीक्षा. तोंडाला येईल ते बोलू नकोस. आणि काय बोललीस तू, आम्ही तुझ्या बाबांकडून हुंडा मागितला का ? तुला खरं सांगायची वेळ आली आहे. Father Daughter Marathi Story आम्ही नाही तर तुझ्या बाबांनीचं आमच्याकडून हुंडा मागितलाय आणि दिवसेंदिवस त्यांच्या डिमांड वाढतचं चालल्यात.”

हे ऐकून प्रतीक्षाला जबर धक्काचं बसतो आणि ती म्हणते, “हे काय बोलतोयस तू ? माझ्या बाबांनी तुमच्याकडून हुंडा मागितला, Father Daughter Marathi Story हे कसं शक्य आहे. आत्ताच त्यांनी मला सांगितलं की, तू आणि तुझं कुटुंब आमच्याकडे हुंडा मागतंय आणि आता मी पोलिसांची धमकी दिली, त्यामुळे तू लगेचं आमच्यावरचं आरोप लावतोयस का, खोटारडा कुठला.”

प्रथमेश म्हणतो, “तुला आम्हीचं खोटं वाटतोय ना. मला माहीतचं होतं. तुझा बाप असंच काहीतरी करणार आणि तुझा आमच्यावर विश्वास नाही बसणार. थांब तुला पुरावे दाखवतो.” असं म्हणून प्रथमेश प्रतीक्षाला एक व्हिडिओ दाखवतो. यामध्ये तिला दिसतं की तिचे बाबा प्रथमेशच्या बाबांना म्हणताय की, Father Daughter Marathi Story ‘जर तुम्हाला आज माझ्या मुलीला तुमची सून म्हणून इथून घेऊन जायचं असेल, हे लग्न लावायचं असेल, तर आत्ताच्या आत्ता मला पाच लाख रुपये द्यावे लागतील आणि दर महिन्याला पन्नास हजार रुपये द्यावे लागतील.”

हा व्हिडिओ पाहून प्रतीक्षाच्या पायाखालची जमीनचं सरकते. तिचा विश्वासचं बसत नाही की, आपले बाबा असं बोलताय. Father Daughter Marathi Story त्यांनी अशी मागणी केलीये. प्रतीक्षा विचारते, “प्रथमेश हे काय आहे, हा व्हिडिओ खरा आहे का ?”

प्रथमेश म्हणतो, “मला कळतंय प्रतीक्षा, तुझा विश्वास बसत नसेल, परंतु हे पूर्ण सत्य आहे. आजपर्यंत एक गोष्ट तुझ्यापासून मी लपवली होती, आम्ही सगळ्यांनीच लपवली होती. Father Daughter Marathi Story परंतु आता तुला सत्य सांगावचं लागेल. तुझे गैरसमज दूर करावेचं लागतील.”

मराठी गोष्ट

प्रतीक्षा म्हणते, “प्रथमेश जे काही सत्य आहे, ते मला सांग. मला अंधारात ठेवू नकोस.” प्रथमेश म्हणतो, “जेव्हा मी आणि माझे आई-बाबा तुझ्या घरी आलो होतो, तुझ्या बाबांकडे तुझा हात मागण्यासाठी, Father Daughter Marathi Story लग्नाची मागणी घालण्यासाठी. तेव्हा तुझ्या बापाने आमच्याकडे विचित्र मागणी केली. ते म्हणाले की, जर तुम्हाला माझ्या मुलीला लग्न करून घेऊन जायचं असेल, तर मला दहा लाख रुपये द्यावे लागतील.”

हे ऐकून आम्हालाही धक्का बसला होता. आम्हाला आधी तर वाटलं, ते चेष्टा करताय. परंतु नंतर आम्हाला कळलं, तुझे बाबा खरं बोलत होते. ते आमच्याकडे हुंडा मागत होते. ते म्हणाले की, माझी एकुलती एक मुलगी आहे ती. Father Daughter Marathi Story मला मुलगा नाही, मग ती सासरी गेल्यावर माझा सांभाळ कोण करेल ? मी तिला शिकवलं, वाढवलं, मग तिने मला पैसे द्यायला हवेत ना.” असं म्हणून त्यांनी माझ्याकडे पैशांची मागणी केली. नाहीतर हे लग्न होणार नाही. असही ते म्हणाले.

आधी तर आम्ही यासाठी नकार दिला. परंतु तुझ्याशिवाय जगणं मला शक्य नव्हतं. म्हणून माझे आई-बाबा यासाठी तयार झाले आणि आम्ही तुझ्या बाबांना दहा लाख रुपये दिले.” प्रतीक्षाला या सगळ्या गोष्टींवर विश्वासचं बसत नाही. Father Daughter Marathi Story प्रतीक्षाचे सासरे प्रतीक्षाला तिच्या बाबांच्या अकाउंटवर दहा लाख रुपये ट्रान्सफर केल्याचं प्रूफ दाखवतात. तेव्हा कुठे तिचा विश्वास बसतो

प्रथमेश म्हणतो, “आजपर्यंत सगळं ठीक होतं. आम्हाला वाटलं, जाऊ द्या जे झालं ते झालं. परंतु तुझ्या बाबांची डिमांड आज खूपचं वाढली. या व्हिडिओत तू जे पाहिलं, ते अर्ध सत्य आहे. त्यांनी आमच्याकडे पाच लाख रुपये तर मागितलेचं, Father Daughter Marathi Story परंतु त्याचबरोबर ते म्हणाले की, जर मी माझ्या मुलीचं लग्न केलं नाही आणि ती माझ्याचं घरी राहून नोकरी करत राहिली, तर दर महिन्याला पाच-पन्नास हजार रुपये कमवेल. मला काम करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्ही मला दर महिन्याला 50 हजार रुपये द्यायचे. Father Daughter Marathi Story आम्हाला हे शक्य नव्हतं, म्हणून आम्ही हे लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळेचं सगळा गोंधळ सुरू आहे.

हे सगळं सत्य ऐकून प्रतीक्षाला आपल्या बाबांचा खूप राग येतो आणि ती बाबांजवळ जाते. ती सगळ्या वऱ्हाडी मंडळीसमोर बाबांना जाब विचारते, “तुम्ही हे का केलं बाबा ?” प्रतीक्षाच्या बाबांना समजतं की, “प्रथमेशने तिला सगळं सत्य सांगितलंय.” Father Daughter Marathi Story प्रतीक्षाचे बाबा म्हणतात, “माझं काय चुकलं बेटा ? आता तू लग्न करून त्या घरात जाशील, मग मी काय उपाशी राहायचं का ? आता जर तू त्या घरी सून म्हणून गेलीस, Father Daughter Marathi Story एखादी नोकरी केलीस, तर तुझे पैसे हे लोक वापरतील ना. मग जावयाचे थोडेफार पैसे मी वापरले तर माझं काय चुकलं ?”

प्रतीक्षाला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, “बाबा मी तुम्हाला काही वाईटही बोलू शकत नाही. तुम्ही माझे जन्मदाते आहात आणि तुमची विचारसरणी इतकी चुकीची आहे की, Father Daughter Marathi Story तुम्हाला कितीही समजावून सांगितलं तरी तुम्हाला समजणार नाही, तुम्ही कधी सुधारणार नाही.

मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय, तुम्ही जे करताय, ते खूप चुकीचं केलं आणि मी प्रथमेशशी लग्न करणार आहे. मी सज्ञान आहे. लग्न माझ्या इच्छेने होणार आणि यानंतर मला तुमच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आणि तुम्ही कधी माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या सासरच्याना पैशाची मागणी करायची नाही. Father Daughter Marathi Story माझ्याशी आणि माझ्या सासरच्या लोकांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर मी तुमच्या विरोधात तक्रार करेल, हे लक्षात ठेवा.

प्रतीक्षाच्या बाबांना मोठा धक्काचं बसतो आणि ते म्हणतात, “हे काय बोलतेस तू, मी तुला जन्म दिला, वाढवलं, तुझं शिक्षण तुझं पूर्ण केलं आणि आज तू या मुलासाठी माझ्यावरचं उलटलीस का ? प्रतीक्षा म्हणते, Father Daughter Marathi Story “बाबा तुम्हाला म्हटलं ना, मला तुम्हाला काही नाही सांगायचंय. कोणता उपदेश नाही द्यायचा. कारण तुम्हाला कधी समजणार नाही.

प्रतीक्षा प्रथमेशचा हात धरते आणि म्हणते, “चल प्रथमेश आपण लग्न करूया. मला माफ कर, मी तुला चुकीचं समजले. परंतु नेहमीचं मुलाच्या कुटुंबाची आणि मुलाची चूक असते, Father Daughter Marathi Story असं नाही तर कधी कधी मुलीचे आई बाळ आणि त्यांचे कुटुंब ही चुकीचं असू शकतं.

प्रथमेश आणि प्रतीक्षा त्यादिवशी लग्न करतात आणि त्यानंतर प्रतीक्षा Father Daughter Marathi Story आपल्या बाबांबरोबर कोणताही संबंध ठेवत नाही परंतु आपले बाबा असं वागले, याची सल आयुष्यभर तिच्या मनाला टोचत राहते.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top