EPFO ने बंद केली महत्त्वाची सुविधा. कोरोना महामारी हे नाव जरी काढलं, तरी अनेकांच्याही कटू आठवणी जाग्या होतात. या काळात अनेकांनी वाईट दिवस पाहिले आहेत. जवळच्या माणसांना गमावलंय. परंतु तेव्हा सर्वात मोठ संकट होतं, ते म्हणजे आर्थिक संकट. अनेकांना घरात रहावं लागल्यामुळे पैशांची अडचण निर्माण झाली होती. सरकारी नोकरांचे पगार चालू होते, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे कर्मचारी आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.
त्यामुळेचं कोरोनाच्या काळात सरकारने ईपीएफओ म्हणजेचं कर्मचारी भविष्य निधीमध्ये एक तरतूद केली होती. कोरोना ऍडव्हान्स म्हणून तुम्हाला ईपीएफओमधून पैसे काढता येत होते. अनेकांनी या गोष्टीचा लाभ मिळवला आणि ईपीएफओ मधून पैसे काढले. परंतु आता कोरोना महामारी संपली आहे. त्यामुळे सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
EPFO ने बंद केली महत्त्वाची सुविधा
कर्मचारी भविष्य निधीमध्ये यानंतर कोरोना ऍडव्हान्सची सुविधा नसेल. तुम्हाला या सुविधेअंतर्गत ॲडव्हान्स पैसे काढता येणार नाही. कर्मचारी भविष्य निधी ही खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर भविष्यासाठी पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा हे उपाय
या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना कर्मचारी पैसे काढू शकतात. त्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. काही खास कारणांमध्ये पैसे काढता येतात. कोरोना ऍडव्हान्स म्हणून दिली जाणारी सुविधा मात्र आता सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर तुम्ही ईपीएफओमध्ये पैसे जमा करता का ? तुम्ही कोरोना काळामध्ये या सुविधेचा उपयोग घेतला होता का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !