Education Loan Information मित्रांनो गरीब घरात जन्माला यायचं की श्रीमंत घरात हे आपल्याला हातात नसतं पण गरीब घरात जन्माला येऊनही आपण आपलं नशीब बदलू शकतो. नशीब बदलण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण.
शिक्षण हे आपल्या हातातील महत्वपूर्ण शस्त्र आहे ज्यामुळे आपण आयुष्यात काहीही मिळवू शकतो. आयुष्यात काहीही साध्य करू शकतो.
Education Loan Information
शिक्षण मिळवणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे पण दिवसेंदिवस वाढत्या शैक्षणिक फीमुळे सध्याच्या काळात प्रत्येकालाच आवडीचं शिक्षण घेणं शक्य होत नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागतं आणि त्यांची स्वप्ने अपुरी राहतात.
पण यावर उपाय म्हणून आपण शैक्षणिक कर्जसुद्धा (Education Loan Information) घेऊ शकतो आणि आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. आधीपेक्षा आता शैक्षणिक कर्ज घेणं खूप सोपं झालं आहे. अनेक बँका शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतात. आज आपण त्याबद्दलचं माहिती जाणून घेणार आहोत.
शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती :
दहावी बारावीनंतर तुम्हाला उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेता येतं.
भारतात किंवा भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज (Education Loan Information) मिळतं.
अनेक बँका तुम्हाला शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतात.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एका वर्षाची मुदत दिली जाते आणि त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला कर्जाची परतफेड म्हणून हफ्ता भरावा लागतो.
शैक्षणिक कर्जात (Education Loan Information) खालील खर्चांसाठी कर्ज मिळते :
कॉलेजची फी,
होस्टेल फी
परीक्षा फी,
कॉम्प्युटर खरेदीसाठी फी
पुस्तके, युनिफॉर्म खरेदी
लायब्ररी फी
प्रोजेक्ट फी
शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी लागणारी पात्रता :
शैक्षणिक कर्ज (Education Loan Information) मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे :
1. शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा.
2. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
3. विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
4. विद्यार्थ्याने यापूर्वी कोणतेही कर्ज घेतलेले नसावे.
5. अर्जदार विद्यार्थ्याचे शिक्षण किमान 10 वी, 12 वी झालेलं असावं आणि शैक्षणिक रेकॉर्डही चांगलं असावं.
शैक्षणिक कर्ज किती मिळू शकते ?
प्रत्येक बँक आपल्या नियमांप्रमाणे शैक्षणिक कर्ज (Education Loan Information) देते.
बँका भारतात शिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त 10 लाख रुपये कर्ज देतात.
तर बँका परदेशात शिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त 30 लाख रुपये कर्ज देतात.
शैक्षणिक कर्जासाठी व्याजदर किती असतो :
शैक्षणिक कर्जासाठी (Education Loan Information) प्रत्येक बँकेत वेगवेगळा व्याजदर असतो :
SBI बँकेत शैक्षणिक कर्जासाठी 8.55% व्याजदर आहे.
HDFC बँकेत 9.50% व्याजदर आहे.
Punjab National Bank 8.55% व्याजदर आहे.
Bank of baroda 9.15% व्याजदर आहे.
Canara bank 9.25% व्याजदर आहे.
तुम्ही बँकेत कॉन्टॅक्ट केल्यानंतर याबद्दल योग्य माहिती मिळेल.
शैक्षणिक कर्जासाठी (Education Loan Information) लागणारी कागदपत्रे :
1. शैक्षणिक संस्थेचं प्रवेश पत्र आणि संस्थेची संपूर्ण माहिती
2. तुमची मार्कशीट
3. कोर्सच्या फीबद्दल माहिती, कोर्सबद्दल माहिती
3. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड
4. पॅनकार्ड
5. मतदानकार्ड
6. ड्रायव्हिंग लायसेन्स
8. राष्ट्रीय बँकेत खातं
9. पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा, सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट
10. पासपोर्ट साईझ फोटो
11. अल्पसंख्याक / मागासवर्गीय जात प्रमाणपत्र
12. परदेशात अभ्यासक्रमासाठी जात असाल तर पासपोर्ट आणि व्हिसाची कॉपी
शैक्षणिक कर्जाचे (Education Loan Information) प्रकार :
स्वदेशी शिक्षण कर्ज
भारतात शिक्षण घेण्यासाठी हे शैक्षणिक कर्ज मिळू शकतं.
यासाठी भारतीय शिक्षणसंस्थेतच अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा लागेल आणि सर्व अटी पूर्ण केल्यानंतर हे कर्ज मिळेल.
परदेशी शिक्षण कर्ज
परदेशात शिक्षण घेण्यासाठी हे कर्ज दिलं जातं.
परदेशातील कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आणि सर्व अटी पूर्ण केल्यानंतर हे कर्ज मिळतं.
या कर्जात शैक्षणिक शुल्क, राहण्याचा खर्च आणि विमान भाडं दिलं जातं.
शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा :
तुम्ही शैक्षणिक कर्जासाठी (Education Loan Information) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता :
शैक्षणिक कर्जासाठी आवेदन करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचं आहे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आणि सोबत महत्त्वाची कागदपत्रे जोडून द्यायची आणि फॉर्म सबमिट करायचा. त्यानंतर बँकेचे कर्मचारी पुढील प्रक्रियेसाठी तुमच्याशी संपर्क करतील.
तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकता.
यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल. तिथे फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून फॉर्म जमा करावा लागेल. त्यानंतर शैक्षणिक कर्जाची (Education Loan Information) प्रक्रिया सुरू होईल.
शैक्षणिक कर्जाची फेड :
तुमचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आणि तुम्हाला नोकरी मिळाल्यानंतर या शैक्षणिक कर्जाची परतफेड सुरू होते.
वेगवेगळ्या मार्गाद्वारे तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकता :
डेबिट कार्ड – रिकरिंग पेमेंट सेट केल्यानंतर दर महिन्याला EMI तुमच्या बँक अकाऊंटमधून कट होतील.
चेक – दर महिन्याला तुम्ही EMI चा चेक बँकेत डिपॉसीट करू शकता.
इंटरनेट बँकिंग – तुम्ही बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन एका ठरलेल्या तारखेला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमाने EMI भरू शकता.
शैक्षणिक कर्जाचे अनेक फायदे आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कर्ज फेडावं लागतं. कर्जाची परतफेड सुद्धा दर महिन्याला EMI च्या स्वरूपात करू शकता.
शैक्षणिक कर्जामुळे (Education Loan Information) होतकरु गरीब विद्यार्थ्यांची खूपच मदत होते. या आर्थिक मदतीमुळे विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करून आपली स्वप्ने पूर्ण करू शकतात. शिक्षणाच्या जोरावर ती आपलं आयुष्य घडवू शकतात.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल उपयोगी वाटला असेल तर आमचे दुसरे आर्टिकल सुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !