महाभारतात भानुमती कोण होती ? मराठीमध्ये अनेक म्हणी प्रचलित आहेत. या म्हणींचा अर्थ आणि त्या मागची गोष्टसुद्धा खूप इंटरेस्टिंग असते. हिंदीमध्येही अशीचं एक म्हण आहे, “कही की इट, कही का रोडा, भानुमतीने कुणबा जोडा.”
या म्हणीचा अर्थ असा होतो की, जोडतोड करून, काहीतरी करून एखादी गोष्ट घडवून आणणे. आणि या म्हणीचा संबंध आहे महाभारताशी. महाभारतातील भानुमती या व्यक्तीशी. मग ही भानुमती आहे तरी कोण ? महाभारतात अनेकांनी तिचं नावही ऐकलं असेल. परंतु ती खूप महत्त्वपूर्ण होती. तिची गोष्ट सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. आपण ती जाणून घेऊया.
महाभारतात भानुमती कोण होती
महाभारतामध्ये भानुमती कंबोजचा राजा चंद्रवर्मा यांची मुलगी होती. ती अतिशय सुंदर होती. भानुमती ही विवाह योग्य झाल्यानंतर राजा चंद्रवर्मा यांनी तिच्या लग्नासाठी स्वयंवराचं आयोजन केलं आणि या स्वयंवरात दुर्योधन आणि कर्ण हे दोघेही पोहोचले. तेव्हा भानुमतीला पाहताचं दुर्योधन तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि काही करून तिच्याशी लग्न करायचं त्याने ठरवलं.
जेव्हा हातात वरमाला घेऊन भानुमती प्रत्येक राजासमोरून जात होती. तेव्हा तिला दुर्योधन आवडला नाही आणि ती दुर्योधनच्या पुढे निघून गेली. हे पाहून दुर्योधन खूप चिडला आणि त्याने जबरदस्तीने भानुमतीच्या हातून स्वतःच्या गळ्यात वरमाला टाकून घेतली.
Bhanumati In Mahabharat
हे भानुमतीलाही आवडलं नाही आणि इतर राजांना सुद्धा. त्यांनी या गोष्टीला विरोध केला. तेव्हा दुर्योधनने त्यांना युद्ध करण्याचं आमंत्रण दिलं आणि कर्णाला त्यांच्याशी युद्ध करण्यास सांगितलं. कर्ण हा तर सूर्यपुत्र महाबली होता. त्याने सर्व राजांना हरवलं. त्यामुळे भानुमतीला नाईलाजाने लग्न करावं लागलं.
परंतु लग्नानंतर भानुमती दुर्योधनच्या प्रेमात पडली. त्यांचा संसार सुखी झाला. त्यांना लक्ष्मण नावाचा एक मुलगा आणि लक्ष्मणा नावाची एक मुलगी झाली. असं म्हटलं जातं की, भानुमती ही खूप हुशार होती. गोष्टींची जोडतोड करणं तिला जमायचं. त्यामुळे जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू झालं, तेव्हा तिला माहीत होतं की कौरव हे हरणार आहेत. परंतु कौरवाना वाचण्यासाठी त्यांनी आपली मुलगी लक्ष्मणाचं लग्न कृष्णाच्या मुलाशी करण्याचा डाव ठरवला होता. यानंतरचं “कही की इट, कही का रोडा, भानुमतीने कुणबा जोडा.” ही म्हण सगळीकडे प्रचलित झाली.
तर तुम्हाला भानुमतीची ही गोष्ट माहीत होती का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !